Friday, 8 May 2015

अपंगत्व म्हणजे काय..?

‘एखादया आजारामूळे किंवा कुपोषणामूळे व्यक्तींची किंवा त्याच्या इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे यांस ‘अपंगत्व ‘असे म्हणतात.’
अपंगत्वाचे प्रकार :-
1.मतिमंदत्व:-
          मति म्हणजे बुध्दी व मंद म्हणजे कमी असणे. ज्या व्यक्तीची बुध्दी प्रत्येक कामात कमी आहे, अशा व्यक्तीस ‘मतिमंद’ म्हटले जाते.
          सर्वसामान्य मुलांपेक्षा बुध्यांक कमी असतो. 70 पेक्षा कमी बुध्यांक असलेल्या मुलांना शिक्षण घेणे अवघड जाते. 70 ते 90 या स्तरातील विदयार्थी प्रयत्नाने शिक्षण घेवू शकतात. गंभीर स्वरूपाच्या मानसिक अपंगांना दैनंदिन क्रियाही शिकवाव्या लागतात.

2.अंधत्व:-
          दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टीहीन असणे. दृष्टी सुधारण्यासाठीच्या भिंगाच्या मदतीने त्यातल्या त्यात चांगल्या डोळयासाठी दृष्टी तीक्ष्णता जास्तीत जास्त 60/600 अथवा 20/200 स्नेलन इतक्या प्रमाणातील असणे. दृष्टीक्षेपाची मर्यादा 20 किंवा त्याहून कमी अंशाच्या कोनाइतकी खराब असलेली व्यक्ती यापैकी कोणतेही नेत्रविकार असलेली व्यक्ती ही ‘अंधत्व’ या सदरात येते.
          ज्या व्यक्तीचा दृष्टीदोष शस्त्रक्रिया किंवा चष्मा/कॉन्टॅक्ट लेन्स यासारख्या उपकरणांच्या सहाय्याने कमी झाला असून जी व्यक्ती दैनंदिन व्यवहार करू शकते परंतु दृष्टीदोषाचे प्रमाण 40%पेक्षा अधिक आहे. अशा व्यक्ती ‘कमी दृष्टीच्या व्यक्ती’ म्हणून संबोधल्या जातात.

3.कर्णबधिरत्व:-
          ज्या व्यक्तीचा चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास 60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना ‘कर्णबधिर व्यक्ती’ म्हणतात.
          सहजपणे लक्षात न येणारे परंतु गंभीर स्वरूपाचे अपंगत्व. बहिरेपणा किंवा कर्णबधिरत्व जन्मापासून असेल तर भाषा वाढीवर परिणाम होतो. वाचाही सदोष राहते व त्यामुळे संवाद साधण्यात अडथळा येतो.

4.चलनवलन विषयक विकलांगत्व:-
           चलनवलन विषयक विकलांगत्व म्हणजेच अस्थिव्यंगत्व. अस्थिव्यंग मुले म्हणजे अशी मुले की, ज्यांची हाडे, सांधे व स्नायु हे योग्यप्रकारे कार्य करत नाहीत. अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले’ असे म्हणतात.
          हे सहज दिसणारे अपंगत्व आहे. या मुलांची हालचालींवरील मर्यादेची त्रुटी दूर केल्यास ती सर्व-सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण घेवू शकतात. मैदानी खेळ, हस्तकौशल्य याकडे विशेष लक्ष्य पुरवावे लागते.

5.मेंदूचा पक्षाघात:-
           मेंदूचा पक्षाघात म्हणजे मेंदूवर झालेला आघात वा अपघातामुळे मेंदूच्या विकास प्रक्रियेवर परिणाम होउन शरीराच्या एका किंवा अनेक भागाचे नियंत्रण कमी झाल्याने बहुविध प्रकारची विविधांगी विकलांगता असलेली व्यक्ती होय.

6.मानसिक आजार:-
           मतिमंदत्वाखेरीज मेंदूमध्ये अन्य कोणत्याही कारणाने आलेला आजार व त्यामुळे सकारात्म्क वा नकारात्मक ‘मानसिक आजार असणारी व्यक्ती’ होय.

7.कुष्ठरोग बरी झालेली व्यक्ती:-
           ज्या व्यक्तीचा कुष्ठरोग वैदयकियदृष्टया बरा झालेला आहे तथापि हातापायाच्या संवेदना कमी झालेल्या आहेत आणि डोळयांच्या वरच्या भागावरदेखील दृष्टी स्वरूपात कमतरता भासते परंतु प्रत्यक्षात मात्र यापैकी काहीही कमतरता नसते. कुष्ठरोग्याच्या आघातामुळे हातापायात विकृती दिसते. परंतु अशा व्यक्तीच्या हातापायात प्रत्यक्ष कार्यशक्तीमुळे अर्थार्जनासाठी काम करण्याची शक्ती असते. या प्रकारच्या व्यक्ती ‘कुष्ठरोग मुक्त व्यक्ती’ होत.

8.वाचादोष:-
           अडखळत बोलणे, अस्पष्ट बोलणे, शब्दांची तोडफोड करणे, बोलतांना शब्द मागे-पुढे करणे त्यात तारतम्य नसणे यालाच ‘वाचादोष‘ असे म्हणतात.

9.अपस्मार:-
          अपस्मार या शब्दाचा अर्थ झटका येणे, मिरगी येणे किंवा आकडी येणे असा होय.
          अचानक, अनियंत्रित, अतिशय प्रमाणाबाहेर अमर्याद मनावर आघात करणाऱ्या घटना की ज्यामुळे अबोध वर्तनात बदल होतात.
          अपस्मार हा आजार नसून तर एक साचेबदध किंवा रासायनिक विकृतीचे लक्षण आहे. अपस्माराची कक्षा  सामान्यपासून तीव्रपर्यंत असू शकते.

10.स्वमग्नता:-
           स्वमग्नता ही एक अशी मानसिक गुंतागुंतीची अवस्था किंवा विकासात्मक विकृती आहे. त्यात 2.5 ते 3 वर्षाची मुले येतात. या अवस्थेने ग्रस्त मुलांचा शारिरीक व मानसिक विकास होत नाही. त्याचबरोबर त्यांचे भाषिक कौशल्य विकसित होत नाही. अशा मुलांना आपल्या आई-वडीलांची जवळीक हवी नसते. ते नेहमी स्वत:च्याच भाव-स्वप्न विश्वात रमून गेलेले असतात. म्हणून या अवस्थेस ‘स्वमग्नता’ असे म्हणतात.

11.अतिक्रियाशिलता किंवा अतिचंचलता:-
           बालकातील अतिक्रियाशिलता, अतिचंचलता, क्षणभरही शांत किंवा स्वस्थ न बसणे, सतत हालचाल करणे, चौफेर घोडे उधळावित तसे काहीसे त्यांचे वर्तन असते. म्हणून या वर्तनाला ‘अतिक्रियाशिलता किंवा अतिचंचलता’ असे म्हणतात.

12.मस्कुलर डिस्ट्रोफी:-
           हा आजार स्नायुंशी संबंधित आहे. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या शरिरातील, ठराविक भागातील, अवयवांतील स्नायुंचे तंतु कमजोर होउ लागतात. किंबहूना नष्ट होउ लागतात. यास ‘मस्कुलर डिस्ट्रोफी’ असे म्हणतात.

13.डाउन सिंड्रोम:-
           हा अनुवांशिक दोष आहे. याने ग्रस्त मुलांची चेहऱ्याची ठेवण मंगोलियन लोंकासारखी असते. रूंद चेहरा, चपटे नाक, गालावर आलेली हाडे, उतरल्यासारखे डोळे, उघडे तोंड व त्यातून जाडशी जीभ सतत आत बाहेर आलेली दिसते. हस्तरेषांमध्ये sinion रेषा फक्त तळहातावर असते.

14.जलमस्तिष्कता:-
          मेंदूमध्ये cerebro spinal fluid नावाचा तरल पदर्थाचा साठा वाढल्यामुळे डोक्यातंर्गत दाब वाढून मेंदूची कवटीही वाढते. त्यामुळे मेंदूच्या कार्यात दोष येतो. यालाच ‘जलमस्तिष्कता’ असे म्हणतात.

15.लहानमस्तिष्कता:-
           अपसामान्य लहान डोक्या सोबतच मतिमंदत्व येण्यास ‘लहानमस्तिष्कता’ असे म्हणतात.

अपंगत्वाची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय :-
अनुवांशिक कारणे :-
       अ) रंगसुत्रे :-
पुरूष व स्त्रीयांमध्ये ज्या 23 रंगसुत्रांच्या जोडया असतात. यामध्ये पुरूषांमधील 23 पैकी    22 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या असतात. या 22 जोडयांना ‘ॲटोझोमल क्रोमोझोम’ असे म्हणतात. तर 23 वी जोडी ही लिंगनिश्चितीची म्हणजेच ‘सेक्स डिटरमाईन’ असते. ती क्षक्ष (xx) किंवा क्षय (xy) परंतु स्त्रीयांमधील 23 च्या 23 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या  असतात. मुलगा किंवा मुलगी होणे हे पूर्णंत: पुरूष्याच्या 23 व्या जोडीवर अवलंबून असते. 23 रंगसुत्रांच्या जोडयातील 21 व्या जोडीमध्ये एक अतिरिक्त रंगसुत्र  आल्यास डाउन सिंड्रोम ही स्थिती उदभवते.

       ब) गुणसुत्रे :-
ज्याप्रमाणे रंगसुत्राच्या जोडया असतात त्याचप्रमाणे गुणसुत्रांच्याही जोडया  असतात.

       क) नात्यातील लग्न :-
समान रक्त संबंधातील व्यक्तीशी विवाह संबंधातून जन्मास येणारे मुल अपंग असू शकते.

सभोवतालच्या वातावरणातील कारणे :-
E जन्मपूर्व अवस्थेतील कारणे (Pre-natal Causes):-
•      स्त्री-पुरूष वय
•      ‘क्ष‘ किरण तपासणी
•      विषबाधा
•      अमली पदार्थांचे सेवन
•      अनियमीत रक्तदाब
•      शारिरीक अथवा मानसिक आघात / अपघात
•      गर्भपात करण्याचा प्रयत्न
•      मधुमेह
•      स्त्रीला रूबेलाची लागण
•      अपस्मार
•      संसर्गजन्य आजार‍
•      हायपोझिया
•      डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन
•      गर्भवती स्त्रीचा आहार

E प्रसुती होतांनाची कारणे (Natal Causes):-
•      कमी दिवसाचे बाळ
•      कमी वजनाचे बाळ
•      श्वासावरोध  (Asphyxia)
•      प्रसुती कालावधी
•      एकापेक्षा जास्त बाळ जन्मल्यास
•      अपसामान्य सादरीकरण
•      अवजार व हत्याऱ्याच्या सहाय्याने होणारी प्रसुती
•      प्रसुतीचे ठिकाण
•      नाळ आधी बाहेर येणे
•      काविळ
•      स्त्रीला झटके येणे (अपस्मार)
•      रक्तस्त्राव
•      अनियमीत रक्तदाब
•      संसर्गजन्य रोगाची लागण / आजार (Herpes Infection)
•      श्वसनात अडचण
•      ऑक्सिजनचा पुरवठा
•      मेंदूला इजा झाल्यास

     
E प्रसुतीनंतरची कारणे (Post-natal Causes):-

•      दुग्धपान
•      काविळ
•      आघात / जखम
•      संसर्ग
•      झटके  येणे
•      श्वसनात अडचण
•      मेंदूला सूज आल्यास
•      टि. बी झाल्यास
•      विषबाधा झाल्यास
•      योग्य आहार
•      लसीकरण

E मनोसामाजिक कारणे (Psychosomatic Causes):-
·मानसिक – शारिरीक आघात, ताण- तणाव


💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Wednesday, 6 May 2015

Special Day in Our Life..!

                                                                             " It's a greatful day for us..Last ten years made various changes in my life..! Me & My wife Yogita are going through very difficulties in that ten years..! Now, this day coming in our life again & gives us lot of happiness..! On this day, we hopeful to all of your best wishes are with us...."

Thanx to All...!

Sunday, 3 May 2015

हसाल तर ध्येय गाठाल...!

  • हसत खेळत व्यक्तिमत्व विकासाचे धडे ….!

देव : काय पाहिजे तुला??
सुरेश : देवा देवा मला पैशाने भरलेली बॅग दे ...१ मोठी गाडी....आणि त्यामध्ये खूप साऱ्या सुंदर-सुंदर मुली...
.देव (विचार करून) : तथास्तू....
आणि आज सुरेश लेडीज स्पेशल बस मध्ये कंडाक्टर आहे.

(तात्पर्य काय : आपले ध्येय स्पष्ट शब्दात लिहून काढा व मांडा. तुम्हाला आयुष्यात नक्की काय हवे आहे ते आत्ताच ठरवा.) 
---------------------------------
एकदा अकबर ने बिरबल ला विचारले..
'असं काही तर सांग कि जे सुखात ऐकल्यानंतर वाईट वाटेल आणि दुःखात ऐकल कि चांगल वाटेल'

बिरबल उत्तरतो.. "हे दिवस निघुन जातील"
(तात्पर्य काय : ज्यांना हे एक वाक्य समजल त्यांनी आपलं आयुष्यच जिंकल...) ---------------------------------
एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.
वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
.ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात;
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..

(तात्पर्य काय : शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो.) ---------------------------------
१ मुलगा १ मुलीँवर खुप प्रेम करत असतो,
१ मुलगा १ मुलीँवर खुप प्रेम करत असतो, परंतु ते सांगायला तो घाबरत असतो..
१ दिवस तो तिला i luv u बोलायच ठरवतो ,
आणि देवाला प्रार्थना करुन सांगतो कि, मी तिला एकदाच आणि शेवटचा प्रप्रोज
करेल, प्लिझ तिच उत्तर हो असु दे....

त्या राञी तिला तो 'I LUV U' मॅसेज टायप करुन तीचा नंबर वर पाठवतो आणि झोपतो.
काहि वेळाने त्याचा मोबाईल वर मॅसेज टोन वाजते,
पण तो मॅसेज उद्या सकाळी उठून अंघोळ करुन देवाच दर्शन घेउन झाल्यावरच वाचेल अस ठरवितो आणि झोपुन जातो..
राञभर तो त्या मुलीचे स्वप्न बघतो ..सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर तो मॅसेज वाचतो तर त्यात लिहल असत …

A/C balance is insufficient. Main bal is Rs. 0.08.
Msg can not be delievered. . . . ..

(तात्पर्य काय : ध्येयाचा नेहमी मागोवा घेत रहा. कुठे चुकले, कुठे काय राहिले हे पाहत राहा. नुसते स्वप्न पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा व कृतीचा अपेक्षीत परिणाम मिळत नसेल तर त्वरित कृती बदला.)
------------------------------
---
एकदा एक मुलगा त्याच्या कॉलेजच्या वर्गातील एका मुलीवर खूप प्रेम करत असतो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एके दिवशी तो हिम्मत करून तिला प्रपोज करतो. पण ती रागावते आणि त्याच्यावर डोळे वटारून निघून जाते.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षातील शेवटच्या आठवड्यात ती मुलगी त्याच्याकडून एक पुस्तक घेते आणि एक चिट्ठी लिहून त्यात ठेवते. त्यात लिहिलेले असते, "I Love You - मी पण तुझ्यावर प्रेम करते."
पण मुलगा ती चिठ्ठी पाहतच नाही. तो घाबरून त्या मुलीशी वर्षभर कधीच बोललेला नसतो व तसेच घाबरून शेवटच्या आठवड्यातही तो तिच्याशी बोलत नाही. कॉलेज संपल्यानंतर दोन वर्ष उलटतात. शेवटी ती मुलगी तिच्या लग्नाची पत्रिका त्याला कुरियरने पाठवते.
(तात्पर्य काय : पुस्तक नेहमी वाचत जावी. कमीतकमी वर्षातून एकदा तरी पुस्तके उघडून पहावीत.)
------------------------------
---
एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका वस्तीतून जाताना नळावरील चाललेल्या दोन मुलींचे भांडण ऐकतात.
पहिली मुलगी : माझी बादली भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी लंगड्या भिकार्याशी लावेल.
दुसरी मुलगी : नाही, माझी अगोदर भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी आंधळ्या भिकार्याशी लावेल.
दोघे भिकारी : आम्ही थांबायचं की जायचं?

(तात्पर्य काय : Don't Lose Hope, Wait for the Better Prospect.)
------------------------------
---
एकदा एक Handsome मुलगा एका २५ मजली इमारतीवर जातो, खाली वाकून पहाताना पाय घसरून पडतो !! पडता पडता त्याला २० व्या मजल्यावर एक मुलगी पकडते - अन विचारते की हे Handsome माझ्याशी लग्न करशील का?

मुलगा नाही म्हणतो - मुलगी त्याचा हात सोडून देते ... मुलगा पुन्हा खाली पडतो ….१५ व्या मजल्यावर पुन्हा तेच घडते, तीही मुलगी हात सोडून देते.
१२ व्या मजल्यावर पुन्हा त्याला एक मुलगी पकडते अन काही बोलणार इतक्यात तो मुलगाच तीला म्हणतो, ‘मी तुझ्याशीच लग्न करीन, जन्म भर सेवा करीन’... पण ती विवाहित असते अन भलतंच काही घडू नये म्हंणून ती त्याचा हात सोडून देते.... अन तो खाली पडतो....
(तात्पर्य काय : संधी एकदा फारतर दोनदा दरवाजा ठोठावेल पण सारखी-सारखी नाही. तेव्हा मिळालेल्या पहिल्याच संधीचा फायदा घ्यायला शिका.)

Saturday, 2 May 2015

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे....!

  • राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली..?
                                                          राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारतातील प्रत्येक भाषेतील , प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते. पण आजवर ती कुणी लिहिली , तेच ठाऊक नव्हते. अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील. परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले. त्याची ही शोधकथा... देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ? कधी लिहिली ? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली , याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही. मीही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो.
                                                         बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की , त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे , कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल , असा प्रश्न पडला होता. मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे. परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही. पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना , विद्वानांना , पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना , शिक्षणमंत्री , साहित्यिक , लेखक , अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य , तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली. काहींनी सानेगुरुजी , यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले. पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे ' प्रतिज्ञा ' नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही. पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की , ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली , याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल! परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले. ' भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत... ' ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणाऱ्या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून मी या प्रतिज्ञेच्या जनकाचा प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोहोचलो! 
                                                      आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली. परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही , याची खंत वाटते. आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत , तेलगू , इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणूनही परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम् जिल्ह्याचे अनेक वर्षं ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ' कालाभरवाहू ' नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले , स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये लिहिली.           
                                                                        त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखविली. शिक्षणमंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षणखाते कार्य करीत असते. या खात्याच्या वतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी ' डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया ' या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची ३१वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ला बेंगळुरू येथे झाली होती. या मिटिंगच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया - ए हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ एज्युकेशन डॉक्युमेंट बिफोर अॅण्ड आफ्टर इंडिपेन्डन्ट - या पुस्तकाच्या पान १४० वर) मुद्दा क्र. १८ मध्ये उल्लेख आढळतो की , विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनसुरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आले की , ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी. या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तसंच , या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता , तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा १९६२ मध्ये प्रथम तेलगू भाषेत लिहिली होती.
                                                                            २६ जानेवारी २०१२ला या प्रतिज्ञेचा सुवर्ण महोत्सव सुब्बारावांच्या मित्र परिवाराने साजरा केला. तेव्हा ' टाइम्स ऑफ इंडिया ' आणि दैनिक ' हिंदू ' या इंग्रजी वृत्तपत्रांत त्याविषयीची छोटीशी बातमी प्रकाशित झाली. या बातमीमुळेच माझ्यासारख्या आजच्या पिढीतील अनेकांना आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा खरा लेखक कोण , याची माहिती मिळाली.
                                                                            आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसे अनुक्रमे रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चटर्जी यांच्या नावे ओळखले जाते. तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञाही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखली जायला हवी. सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे. कारण प्रतिज्ञेचा जो आशय आहे , जे विचार आहेत ते प्रचंड विवेकवादी , समतावादी , एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शवितात. हा राष्ट्रीय प्रतिभेचा अमूल्य वारसा या प्रतिज्ञेच्या माध्यमातून भविष्यातही भावी पिढ्यांसाठी आपण जतन करणार आहोतच. यासाठी तरी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या प्रतिभेचा सम्मान म्हणून या प्रतिज्ञेच्या खाली त्यांची नाममुद्रा असणे गरजेचे वाटते , म्हणजे भविष्यात आपल्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण ? हा प्रश्न इतरांना पडणार नाही. याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल. (संग्रहातून)

Thursday, 30 April 2015

सुन्दर कविता जिसके अर्थ काफी गहरे हैं...

  • मैंने .. हर रोज ..
जमाने को .. रंग बदलते देखा है ....
उम्र के साथ .. जिंदगी को ..
ढंग बदलते देखा है .. !!
  • वो .. जो चलते थे ..
तो शेर के चलने का .. होता था गुमान..
उनको भी .. पाँव उठाने के लिए .. सहारे को तरसते देखा है !!
  • जिनकी .. नजरों की ..
चमक देख .. सहम जाते थे लोग ..
उन्ही .. नजरों को ..बरसात ..की तरह ~~ रोते देखा है .. !!
  • जिनके .. हाथों के ..
जरा से .. इशारे से ..
टूट जाते थे ..पत्थर ..
उन्ही .. हाथों को .. पत्तों की तरह ..
थर थर काँपते देखा है .. !!
  • जिनकी आवाज़ से कभी ..          
बिजली के कड़कने का .. होता था भरम ..
उनके .. होठों पर भी .. जबरन ..
चुप्पी का ताला .. लगा देखा है .. !!
  • ये जवानी ..
ये ताकत .. ये दौलत ~~
सब कुदरत की .. इनायत है ..
इनके .. रहते हुए भी .. इंसान को ~~
बेजान हुआ देखा है ... !!
  • अपने .. आज पर .. इतना ना .. इतराना ~~
मेरे .. यारों .. वक्त की धारा में .. अच्छे अच्छों को ~~
मजबूर हुआ देखा है .. !!!
  • कर सको......  तो किसी को खुश करो......
दुःख देते ........ तो हजारों को देखा है....

Monday, 27 April 2015

🔘 मोदी यांच्या सरकारने ऑनलाईन सेवा सुरु केली 🔘

* प्राप्त :-
1. जन्म दाखला
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=1
2. जातीचा दाखला http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=4
3. टोळी प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=8
4. अधिवास प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=5
5. वाहन चालक परवाना
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=6
6. विवाह प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=3
7. मृत्यू प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=2

अर्ज करा :-
1. पॅन कार्ड
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15
4. पासपोर्ट http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=2
5. मतदार याद्या नाव नोंदणे
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=10

नोंदणी :-
1. जमीन / मालमत्ता
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=9
3. राज्य रोजगार एक्सचेंज http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=12
4. नियोक्त्याची म्हणून http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=17
चेक / ट्रॅक :-
1. केंद्र सरकारने गृहनिर्माण यादी स्थिती प्रतीक्षा
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=9
2. चोरीला वाहनांची स्थिती http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1
3. भूमि अभिलेख http://www.india.gov.in/landrecords/index.php
4. भारतीय न्यायालयांच्या कॉजलिस्ट यादी http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7
5. न्यायालयांच्या निकालांच्या (JUDIS)
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24
6. दैनिक कोर्ट ऑर्डर / प्रकरण स्थिती http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21
7. भारतीय संसद कायदे http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13
8. परिक्षा परिणाम http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16
9. स्पीडपोस्ट स्थिती http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10
10. ऑनलाइन शेती बाजार भाव http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6

पुस्तक / चित्र / लॉज :-
1. ऑनलाईन रेल्वे तिकीट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5
4. केंद्रीय दक्षता आयोगाचे तक्रार (CVC हा) http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14

योगदान :-
1. पंतप्रधान मदत निधी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=11

इतर :-
1. इलेक्ट्रॉनिक पत्रे पाठवू
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=20

ग्लोबल नेव्हिगेशन :-
1. नागरिक
http://www.india.gov.in/citizen.php
2. व्यवसाय (नवीन विंडो मध्ये उघडेल बाह्य वेबसाइट)
http://business.gov.in/
3. ओव्हरसीज http://www.india.gov.in/overseas.php
4. सरकार http://www.india.gov.in/govtphp
5. भारत जाणून http://www.india.gov.in/knowindia.php
6. क्षेत्रांमध्ये http://www.india.gov.in/sector.php
7. संचयीका http://www.india.gov.in/directories.php
8. दस्तऐवज http://www.india.gov.in/documents.php

Saturday, 25 April 2015

‘अवर इंडस्ट्री डज नॉट रिस्पेक्‍ट ट्रॅडिशन - इट ओन्ली रिस्पेक्‍ट्‌स इनोव्हेशन.’

  •  चाळिशी मायक्रोसॉफ्टची...!
                                                                     ‘विंडो’ उघडल्याशिवाय कॉम्प्युटरच्या दुनियेची सकाळ होत नाही. एवढी सर्वव्यापी बनलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नुकतीच (४ एप्रिल) चार दशकं पूर्ण झाली. संपूर्ण जगाला नवी दिशा देणाऱ्या या कंपनीचा प्रवास थक्क करणारा आहे, तसंच खूप काही शिकवणाराही. संगणकांच्या सॉफ्टवेअर क्षेत्रात ही कंपनी अद्याप ‘दादा’ आहे; पण हीच स्थिती कायम राहणार का? मायक्रोसॉफ्टच्या कामगिरीचा मागोवा...
                                                                          ‘अवर इंडस्ट्री डज नॉट रिस्पेक्‍ट ट्रॅडिशन- इट ओन्ली रिस्पेक्‍ट्‌स इनोव्हेशन.’ मायक्रोसॉफ्टचा सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सत्या नडेला यांच्या पहिल्या भाषणातलं हे विधान खूपच गाजलं. ‘परंपरा विसरा, नव्याचा शोध घ्या’ असा अर्थ कुणी काढला, तर काहींनी त्याकडं आणखी वेगळ्या नजरतून पाहिलं.

                                                                             आपणास ‘एमएस डॉस’ माहिती आहे का? बरं, विंडोज वन माहितेय का? बरं जाऊ द्या, विंडोज ९५, ९८. पण विंडोज एक्‍सपी निश्‍चितच माहिती असणार, कारण ते अलीकडेच ‘आउटडेटेड’ झालं आहे.
                                              या प्रश्‍नांची उत्तरं शोधताना सत्या नडेला यांच्या विधानामध्ये किती तथ्य आहे, हेच अधोरेखित होईल. कारण दिवसभर संगणकविश्‍वात रमणाऱ्या आजच्या पिढीला ‘एमएस डॉस’ माहितीच नाही, त्यात त्यांना रसही नाही. मात्र पुढं काय येत आहे जेणेकरून माझं आजचं काम अधिक सुलभ कसं होईल, याकडं मात्र त्यांचं लक्ष आहे. म्हणूनच ‘इनोव्हेशन्स’ला या क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व आहे.


                                                      सत्या यांच्या विधानाकडं चिकित्सकदृष्ट्या पाहिलं तर लक्षात येईल की, संगणकीय दुनियेत निजदिनी नावीन्यकरणाला महत्त्व आहे. जो यात मागे पडला, तो स्पर्धेतून बाद झाला. ‘जुने जाऊ द्या मरणालागूनि’ ही उक्ती इथं रोजच लागू आहे. येणारा प्रत्येक दिवस काही तरी नवं घेऊन येत आहे, त्याचबरोबर जुन्या अनेक बाबी, मग त्या चांगल्या असल्या तरी बाद होत आहेत. मायक्रोसॉफ्ट या स्पर्धेत खूपच आघाडीवर होती, अद्यापही आहे. कसा झाला हा प्रवास?
                                                         बिल गेट्‌स आणि पॉल ॲलन यांनी १९७५ मध्ये मोजक्‍या कर्मचाऱ्यांसह ‘मायक्रोसॉफ्ट’ची स्थापना केली. अल्टेअर ८८०० या डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर बनविण्याचं काम त्यांना मिळालं होतं, तेव्हापासून या कंपनीचं मुख्य लक्ष्य सॉफ्टवेअर निर्मिती हेच राहिलं ते २०१२ पर्यंत. विशेषत: ऑपरेटिंग सिस्टीम हेच त्यांचे प्रमुख सॉफ्टवेअर राहिलं. १९८०मध्ये बिल आणि पॉल यांनी सर्व प्रकारच्या आयबीएम कॉम्प्युटरसाठी ‘एमएस डॉस’ हे सॉफ्टवेअर बाजारात आणलं. २८६, ३८६ ते ४८६ प्रोसेसरपर्यंत ‘डॉस’ आणि नंतर विंडोजशिवाय कॉम्प्युटरचं पान हलत नसे.



                                                         मायक्रोसॉफ्टचा व्याप वाढत जाऊ लागला तसा, गेट्‌स यांना हार्वर्डचा आपला जुना मित्र स्टीव्ह बाल्मरची आठवण झाली आणि गेट्‌स व पॉल यांनी बाल्मरला कंपनीत घेतले, १९८० चा तो काळ होता. इथून पुढं या त्रिकुटानं ‘कॉम्प्युटिंग’ दुनियेत मोठी क्रांती केली. पहिलं विंडोज सॉफ्टवेअर आलं १९८३ मध्ये. त्याची कथाही रंजक आहे. वास्तविक हार्डवेअर आणि प्रोगॅम्स या दोन्हींमध्ये इंटरफेस सॉफ्टवेअर (सांधणारा दुवा) निर्माण करण्यासाठीच मायक्रोसॉफ्टचा जन्म झाला होता, त्यामुळं नव्या सॉफ्टवेअरला ‘इंटरफेस मॅनेजर’ असेच संकेतनाम (कोडवर्ड) देण्यात आलं होतं. परंतु या प्रणालीचं दृश्‍य स्वरूप एका पाठोपाठ एक करत उघडणारे ‘बॉक्‍सेस’ असं असल्यानं गेट्‌स यांनी त्याचं नामकरण ‘विंडोज’ असं केलं. पहिलं विंडोज सॉफ्टवेअर ‘डॉस’ आधारित होतं. ते अधिक सुलभ झालं १९८५ मध्ये ‘विंडोज १’च्या सादरीकरणानंतर. रायटर, नोटपॅड, कॅल्क्‍युलेटर, कॅलेंडर आदी सुविधा त्यात देण्यात आल्या. ‘डॉस कमांड’ऐवजी माउसनं टिचकी मारून विविध ‘विंडो’मधून प्रवास करता येऊ लागला. त्याच्या लोकप्रियतेमुळे विंडोज २ आलं, सोबत ‘कंट्रोल पॅनल’ घेऊनच. ते इंटेल २८६ प्रोसेसरवर चालणारे होते. पुढे प्रोसेसरमध्ये संशोधन होत गेलं तसे विंडोजदेखील नव्या रूपात अवतरू लागले आणि अखेर ती वेळ आली. १९८८ मध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये जगातली सर्वांत मोठी कंपनी म्हणून ‘मायक्रोसॉफ्ट’ची इतिहासात नोंद झाली.
  • जमाना ‘विंडोज ९५’चा
                                                              ऑगस्ट १९९५ मध्ये ‘विंडोज ९५’ची घोषणा करण्यात आली. विंडोजचा हा नवा अत्याधुनिक अवतार होता. पहिल्यांदाच त्यात इंटरनेट सुविधेसोबतच फॅक्‍स, मोडेम, ई-मेलसाठी ‘आउटलूक एक्‍स्प्रेस’ आणि मल्टिमीडिया गेम्सदेखील होते. याशिवाय ‘प्लग एन प्ले’ सुविधेमुळं कोणतेही अन्य सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये सहज लोड करता येत होते. एव्हाना कॉम्प्युटर आणि विंडोज हे समीकरण बनलं, पुढं विंडोज ९८, विंडोज २००० आणि विंडोज एक्‍सपी आलं. ‘एक्‍सपी’ सर्वाधिक काळ स्थिर राहिलेलं व वापरलं जाणारं सॉफ्टवेअर ठरले. त्यात सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी होत्या, त्यासाठी ‘विंडोज व्हिस्टा’ मोठ्या जाहिरातबाजीनं सादर करण्यात आले. मात्र कंपनीची अडचण इथंच झाली. ‘व्हिस्टा’मधल्या अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या. कॉम्प्युटर ग्राहक नाराज होऊ लागले व अन्य पर्यायांचा शोध घेऊ लागले. कोणी लिनक्‍सकडं वळले, तर कोणी ‘ॲपल’कडं. ‘विंडोज’ किलकिल्या होऊ लागल्या. म्हणून गडबडीनं विंडोज -७ आणलं. व्हिस्टाचा अनुभव जमेशी असल्यानं ‘विंडोज -७’ची चाचणी तब्बल ८० लाख ग्राहकांनी ऑनलाइन घेतल्याचा कंपनीचा दावा आहे. दोनच वर्षांनी विंडोज ८ सीरिज आली. सध्या मायक्रोसॉफ्टची ‘विंडोज क्रांती’ ८.१ पर्यंत येऊन थांबलेली आहे. सॉफ्टवेअरखेरीज कंपनीची इतरही अशा स्वरूपाची उत्पादने आहेत, उदा. बिझनेस एंटरप्राईस सोल्युशन्स, क्‍लाउड कॉम्प्युटिंग इत्यादी, मात्र ‘एक्‍स बॉक्‍स’ हे गेमिंग कन्सोल ‘विंडोज’नंतर सर्वाधिक लोकप्रिय ठरले.
  • नवं धोरण
                                                                    दरम्यानच्या काळात, गुगलच्या अँड्रॉईडने मोबाईल फोन्सच्या क्षेत्रात धुमाकूळ घातला. अँड्रॉईड मोबाईलने एवढी लोकप्रियता मिळवली, की तो संगणकाला पर्याय ठरू लागला. टॅबलेट मोबाईल आल्यानंतर तर डेस्कटॉप कॉम्प्युटरची दुनिया छोटी होऊ लागली, याची जाणीव मायक्रोसॉफ्टला २०१२ मध्ये झाली आणि त्यांनी नोकिया या मोबाईल फोनच्या उद्योगातल्या मोठ्या ब्रॅंडचा ताबा घेतला. आपण सॉफ्टवेअरसोबत उपकरणांच्या क्षेत्रातही उतरण्याची गरज आहे, असा साक्षात्कार या कंपनीला झाला. ‘विंडोज मोबाईल’ मार्केटमध्ये उतरवण्यात आला. ॲपलचे जसे अत्यंत निष्ठावान वापरकर्ते आहेत, तसेच विंडोज मोबाईलचेही आहेत. मात्र ॲपल पीसी आणि मोबाईल ग्राहकांच्या तुलनेत मायक्रोसॉफ्टकडं अशा ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. नोकियावर ताबा मिळवण्यापूर्वी कंपनीनं सरफेस टॅबलेट पीसी आणला होता, मात्र टॅबलेटच्या दुनियेत खूपच पर्याय उपलब्ध असल्यानं त्याचा फारसा टिकाव लागला नाही.
  • मायक्रोसॉफ्टचं अर्थकारण
                                                                        २००९ आणि २०१३ वगळता मायक्रोसॉफ्टचा विकास वेगानं झाला आहे. या दोन्ही वर्षांत मात्र कंपनीची घसरण झाल्यानं महसूल वाढीचा दर (उणे) घटला होता. २००५ मध्ये कंपनीने तब्बल ५० टक्के विकासदर गाठला होता, तेवढा वेग नंतर कधीही गाठता आलेला नाही. अलीकडच्या काळात तर तो १ ते ५ टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. २००० मध्ये गेट्‌स बाजूला झाले आणि त्यांनी बाल्मर यांच्या खांद्यावर अध्यक्ष व सीईओपदाची धुरा सोपवली. बाल्मर यांचा कालखंड प्रचंड स्पर्धेचा राहिला. त्यांनी पदभार स्वीकारला त्या वर्षी म्हणजे २००९ मध्ये निव्वळ उत्पन्न १८ टक्‍क्‍यांनी घसरलं होतं. त्यांच्या जागी सत्या नडेला आले तेव्हा कंपनीचे निव्वळ उत्पन्न १४ अब्ज डॉलरवरून २२ अब्ज डॉलरवर गेलं होतं. तब्बल १ लाख २३ हजार कर्मचारी असलेल्या या कंपनीच्या उत्पन्नाचा सर्वांत मोठा वाटा ‘ओएस’ (ऑपरेटिंग सिस्टीम) विक्रीतूनच येतो. त्यानंतर क्रमांक आहे क्‍लाउड आणि सर्व्हरचा. इंटरनेट, सॉफ्टवेअर, ऑनलाइन सोल्युशन्समध्ये मायक्रोसॉफ्टला गुगल मोठा स्पर्धक आहे, फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गुगलचं गेल्या आर्थिक वर्षाचं निव्वळ उत्पन्न १५ अब्ज डॉलरच्या घरात होतं. हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील सर्वांत मोठी स्पर्धक असलेली जगातील बलाढ्य कंपनी ‘ॲपल’नं मायक्रोसॉफ्टला केव्हाच मागं टाकत निव्वळ उत्पन्नाचा ४९ अब्ज डॉलरचा पल्ला गाठला आहे. सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली ‘मायक्रासॉफ्ट’ची सफर कशी होते हेच आता पाहायचे आहे. चाळिशीनंतर मानवी आयुष्यात सेकंड इनिंग सुरू होते असं मानतात. मायक्रोसॉफ्ट आता महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. नडेला कंपनीला कुठं नेतात, ते पाहणं उत्कंठावर्धक ठरेल.

  • आता विंडोज टेन
                                                                     कॉम्प्युटर विश्‍वातील ‘ओएस’ विकासाच्या स्पर्धेला टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं जानेवारीच्या अखेरीस ‘विंडोज १०’ सादर केलं. विंडोज ८ च्या तुलनेत यात खूपच बदल करण्यात आले आहेत आणि विशेष म्हणजे ‘स्टार्ट मेनू’ पुन्हा ‘स्टार्ट’ बटनवर देण्यात आला आहे. विंडोज ७ आणि विंडोज ८ साठी विंडोज १० चे अपडेट मोफत असेल. त्यात इंटरनेट एक्‍स्प्लोररचा अत्याधुनिक अवतार ‘इंटरॲक्‍टिव्ह’ करण्यात आला आहे. नेटविश्‍वात फिरताना तुम्हाला आवडलेल्या साईट्‌स, फोटो किंवा अन्य काही तुम्ही अधोरेखित करू शकाल आणि इतरांना पाठवू शकाल.
  • ‘क्रांतिकारी’ हॉलोलेन्स
                                                                          हा एक विलक्षण चष्मा आहे, तो परिधान केला की नवे आभासी जग तुमच्यासमोर उभे राहील, ते तुम्ही केवळ तुम्ही पाहूच शकणार नाही, तर त्यात स्वत: सहभागी होऊ शकाल. कोणाला गुगल ग्लास वाटेल पण त्यापेक्षा खूप पुढचं हे प्रकरण आहे. विंडोज १० सादर करताना आभासी विश्‍व उभे करणारा ‘हॉलोलेन्स’ हा जादूई चष्माही सादर करण्यात आला. सत्या नडेला यांनी सीईओ म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर या दोन मोठ्या घोषणा आहेत. विंडोजनं संगणक क्षेत्रात क्रांती केली. आता आभासी विश्‍वात हॉलोलेन्स नक्कीच क्रांती करतील अशी आशा आहे. गुगल ग्लास किंवा ॲक्‍युलस रिफ्टपेक्षा हॉलोलेन्स खूप वेगळा चष्मा आहे. ग्लास किंवा ॲक्‍युलसला कॉम्प्युटर - मोबाईल कनेक्‍शनची गरज लागते. हॉलोलेन्स स्वतंत्र आहे, त्याला बाहेरच्या कनेक्‍शनची गरज नाही. शिवाय तो हातवारे आणि आवाज ओळखतो व कमांड स्वीकारतो. या चष्म्याद्वारे रिकाम्या पोकळीत (हवेत), भिंतीवर किंवा कोणत्याही वस्तूवर ‘थ्री-डी’ स्क्रीन निर्माण करता येतो. तुम्ही जिकडे जाल तिकडे हा स्क्रीन तुमच्या सोबतच येतो. या चष्म्यासाठी खास ‘हॉलो स्टुडिओ’ही बनवण्यात आला आहे. विंडोजमधील पेंटब्रशची ही अत्याधुनिक ‘थ्री-डी’ आवृत्ती आहे. त्यात तुम्ही आभासी दुनियेत कोणत्याही स्वरूपाचं डिझाईन बनवू शकता, एवढेच नाही तर ते ‘सेव्ह’ करून त्याची थ्री-डी प्रिंटही घेता येऊ शकते. म्हणूनच ते क्रांतिकारी ठरेल, असा नडेला यांचा विश्‍वास आहे. या चष्म्याची विक्री एप्रिलअखेर सुरू होण्याची शक्‍यता आहे.


  • मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स आपला सहकारी पॉल ॲलनसमवेत..!
  •  
  •  
  •  
  •  
  • I read above story about 'Microsoft' in Sakal marathi daily news-paper. This is very inspirable to youngs. So, I tried to give the story as it is given in " Sakal-Saptarang " suppliment..! I request to all my faithful friends for reading this story carefully & tried to make our own opinion about ourself future..!
  • thanx to Sakal and Mr. Nandkumar Sutar sir..! 

Thursday, 23 April 2015

LOVE is BLIND..कारण की,

💕" एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-छपी खेळायचे ठरवले,💖💖

💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला,💖
💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची जागाच मिळत नव्हती, 💖 💕वेड्याचे आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात उडी टाकली,💞 💕 ते झुडूप गुलाबांच्या फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं...💖💖 💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं, पण प्रेम काही मिळाले नाही,💖 💕शेवटी स्वताहाची हार सहन न झाल्या मुळे वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात जोराने काठी खुपसली व बाहेर काढली ........💖
💕बाहेर काढल्या नंतर काठीला लागलेलं रक्त बघून वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून बघितलं,💖 💕तेव्हा तिथे त्याला हसत असलेल प्रेम दिसलं,💖
💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात खुपसली गेली होती..💖
💕ते पाहून वेड खूप रडला आणि त्याने प्रेमाला वचन दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील💖
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर राहीन.......💖
💖तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे. गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका सोय म्हणून सहज असं तोडू नका रक्ताचं नाही म्हणून,  कवडीमोल ठरवू नका..! "
 

 🐾🌸 भावनांचं मोल जाणा , मोठेपणात हरवू नका. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं,
🐾🌸 जन्मभर पुरेल इतकं भरून  प्रेम मिळत असतं, तुम्ही फक्त ओंजळ पुढे  करुन पहा,
🐾🌸 कमीपणा मानू नका, व्यवहारातलं देणं घेणं  फक्तं मध्ये आणू नका.. मिळेल तितकं घेत रहा,  जमेल तितकं देत रहा,
🐾🌸 समाधानात तडजोड असते  फक्त जरा समजून घ्या 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घ्या..
🐾🌸 विश्वासाचे चार शब्दं .. दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक 'नातं' जपा..  मध्येच माघार घेऊ नका...
🌸🐾 🌸. शब्दांना  भावरूप  देते, . . .  तेच  खरे  पत्र ॥ नात्यांना  जोडून  ठेवते, तेच  खरे  गोत्र ॥
           नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,   खरे  नेत्र ॥ दूर  असूनही  दुरावत  नाही,तेच  खरे  मित्र. ॥॥

जनरल Knowledge साठी Current माहिती...!

  • जिल्हा आणि पालकमंत्री....
मुंबई - सुभाष देसाई
मुंबई उपनगर - विनोद तावडे
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - गिरीश बापट
पालघर - विष्णू सावरा
बीड-लातूर - पंकजा मुंडे
सांगली-कोल्हापूर - चंद्रकांत पाटील
रायगड - प्रकाश मेहता
परभणी-नांदेड - दिवाकर रावते
रत्नागिरी - रवींद्र वायकर
नाशिक - गिरीश महाजन
जळगाव-बुलढाणा - एकनाथ खडसे
सिंधुदुर्ग - दीपक केसरकर
औरंगाबाद - रामदास कदम
गडचिरोली - अंबरीश आत्राम
वर्धा-चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
भंडारा-उस्मानाबाद - डॉ. दीपक सावंत
गोंदिया - राजकुमार बडोले
जालना - बबनराव लोणीकर
हिंगोली - दिलीप कांबळे
अहमदनगर - राम शिंदे
सातारा - विजय शिवतारे
सोलापूर - विजय देशमुख
अमरावती - डॉ. प्रविण पोटे
अकोला-वाशिम - डॉ. रणजित पाटील
यवतमाळ - संजय राठोड
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे

Friday, 17 April 2015

UPSC मैन्स परीक्षेत विचारलेला प्रश्न ?

  • लक्षपूर्वक वाचुन उत्तर द्या :-
एका शेतकऱ्याला ३ मुले असतात.
तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात.
शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते.
पहिला मुलगा दुपारी कामावरून
घरी येतो भाकरी पाहतो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाक-याचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण
पहिल्यांदाच आलो.
तो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण
पहिल्यांदाच आलो तो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार
समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात .
उरलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतात अन
प्रत्येकी खातात.
या सर्व प्रकारात
कुठेही भाकर॒यांचे तुकडे करत नाहीत. तर
सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या..?

Wednesday, 15 April 2015

It's for your kind Information..!

" गावाचं नाव पुट्टमराजू कंद्रिगा... वस्ती जेमतेम ४०० लोकांची... रस्ता
नाही की शौचालय नाही... कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत...
अवघ्या चार महिन्यांपूर्वीचं हे चित्र. पण हेच गाव आज राष्ट्रीय चर्चेचा
केंद्रबिंदू बनलं आहे. कारण, अवघ्या चार महिन्यांत देशातील
महानगरांनाही हेवा वाटेल असा या गावाचा कायापालट झालाय
आणि यामागं आहे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व खासदार सचिन रमेश तेंडुलकर .
क्रिकेट जगतात स्वत:चं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारा सचिन
राजकारणाच्या मैदानावरील इनिंगलाही वेगळ्या उंचीवर नेऊन
ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टमराजू कंद्रिगा
गावाचा चेहरामोहरा बदलून सचिननं याचा शुभारंभ केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सांसद आदर्श ग्राम योजने'ची घोषणा
केल्यानंतर अनेक खासदारांनी आपापल्या पसंती गावं दत्तक घेतली
होती. बहुतेक खासदारांनी हायप्रोफाइल गावांना प्राधान्य दिलं
होतं. सचिननं मात्र हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या पुट्टमराजू
कंद्रिगा गावाची निवड केली होती.
अन्य खासदारांच्या दत्तक गावांमध्ये अद्याप कामाला सुरुवातही
झालेली नसताना सचिननं स्थानिक प्रशासन, केंद्र सरकारकडं
पाठपुरावा करून पुट्टमराजू गावात चार महिन्यांच्या आतच
विकासाची गंगा आणली आहे. गावात सांडपाण्याच्या
निचऱ्यासाठी भूमिगत गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक
घरात २४ तास पाणी, वीज उपलब्ध करून देण्यात आलीय. खेळासाठी
खास मैदान बनविण्यात आलंय. काँक्रिटच्या रस्त्याबरोबरच
समाजमंदिर व सुसज्ज हॉस्पिटलही उभारण्यात आलं आहे. स्वत:च्या
खासदार निधीतून २.७९ कोटी खर्च करून तसेच केंद्र सरकारकडून ३ कोटी
रुपये मिळवून सचिननं या गावाचं रूपडंच बदलून टाकलं आहे.
गावावर विकासाच्या जादूची कांडी फिरल्यामुळं गावकरीही हरखून
गेले असून त्यांनी सचिनला धन्यवाद दिले आहेत. सचिननं घालून दिलेल्या
या आदर्शापासून अन्य खासदार काही बोध घेणार का, असा प्रश्न
आता विचारला जात आहे...! "