- एक छोटीशी गोष्ट..
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले की, तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय. सुरक्षा रक्षक म्हणाला, या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की; जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात. पण, संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.
त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की, त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे; एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा. मला नाही माहीत कधी पण तुमच्या आयुष्यात पण असाच एखादा चमत्कार निश्चित घडेल.