Saturday, 15 August 2015

जनरल नालेज...adsir

1. भारतीय संसदीय व्यवस्थेचा _____________ हा केंद्रबिंदू आहे.
उत्तर >> पंतप्रधान

2. महाराष्ट्र शासनाने लोकशाही विकेंद्रीकरण समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती ?
उत्तर >> वसंतराव नाईक

3. खालीलपैकी कोणत्या दिवशी घटना समितीने भारतीय राज्यघटनेला मान्यता दिली ?
उत्तर >> 26 नोव्हेंबर 1949

4. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पध्दती __________ रोजी सुरू झाली.
उत्तर >> 1 मे 1962

5. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत _________ सभासद संख्या आहे.
उत्तर >> २८८

6. भारतीय संविधानाने एका ___________________ निर्मिती केली आहे.
उत्तर >> प्रबळ संघराज्याची

7. राष्ट्रपती पदाच्या उमदेवाराने वयाची _____ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
उत्तर >> 35

8. भारतीय राज्य घटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे ?
उत्तर >> जम्मू आणि काश्मीर

9. ग्रामपंचायतीच्या पंचांची निवडणूक ________ पध्दतीने होते.
उत्तर >> प्रौढ मतदान

10. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे ___________ कार्य आहे.
उत्तर >> कल्याणकारी

11. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात ?
उत्तर >> C-14

12. जपानमध्ये आढळलेला मिनामाटा आजार ___________ मुळे झाला.
उत्तर >> पारा (Hg) विषबाधा

13. लोखंडाचा सर्वात शुध्द प्रकार _______ हा आहे.
उत्तर >> रॉट आयर्न

14. खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरीत्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात ?
उत्तर >> Pt,Au

15. गवत-नाकतोडा-बेडूक-साप-गरूड या अन्नसाखळीस काय म्हणतात ?
उत्तर >> गवताळ परिसंस्था

16. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?
उत्तर >> आयाम

17. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो ?
उत्तर >> 76 सेमी | 29.9 इंच | 1013.2 मिलीबार

18. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भौतिकशास्त्राचे नोबेल परितोषिक मिळाले नाही ?
उत्तर >> जगदीशचंद्र बोस

19. भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन (Nuclear Fuel) भारताच्या समुद्र किनाऱ्यावरच्या मोनाझाईट वाळूत सापडते. या अणुइंधनाचे नाव काय आहे ?
उत्तर >> थोरीयम

20. ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्ट करता येत नाही परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते हा थर्मोडायनॅमिक्सचा कोणता नियम आहे ?
उत्तर >> पहिला नियम