Monday, 4 September 2017

कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स


कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स या दोन गोष्टींबद्दल कुठेना कुठे चर्चा आपण ऐकतोच. कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स असू नये असं नेहमी सांगितलं जात. ते योग्यही आहे कारण ओव्हर कॉन्फिडन्सने नुकसान आपलंच होतं. आज स्पर्धेच्या युगात तुम्हाला यश संपादन करण्यासाठी तुम्ही करताहात त्या विषयाबद्दल किंवा त्या कामाबद्दल आणि स्वत:बद्दल कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. 
                                                                                                              जर तुमच्यात कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही या शर्यतीत बाहेर पडलात म्हणून समजा. कॉन्फिडन्स असणारे लोक काय करतात, हाही एक महत्त्वाचा विषय आहे. हे लोक स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून असतात आणि त्या विश्वासाच्या सोबतीने ते यश मिळवण्याची शाश्वती ठेवतात. कॉन्फिडन्स असणारे लोक काय करत नाहीत, यावर एक नजर टाकुयात. त्याचा तुम्हालाही नक्की फायदा होईल.  
 
1) _कारणे देत नाहीत_ - वेगवेगळी कारणं देऊन पळवाटा काढणारे लोक खूप असतात. ज्या लोकांकडून काहीच होऊ शकत नाही, ते लोक पळवाटा शोधत असतात. कॉन्फिडन्स असणारे लोक जे करतात आणि जे वागतात, ते स्वत:च्या विचारांनी वागतात. त्याची जबाबदारी घेतात. 

2) _तुलना करीत नाहीत_ - आत्मविश्वासू लोक कधीच दुस-याची स्वत:शी तुलना करत बसून वेळ वाया घालवत नाहीत. ते आपण काय करत आहोत किंवा आपल्याला काय करायचे आहे, याचा विचार करीत असतात. दुस-यांनी काय केले किंवा दुसरे काय करणार आहे. यापेक्षा आपल्याला काय करायचे आहे, यावर ते जास्त लक्ष केंद्रित करतात. 

3) _कम्फर्ट झोनमध्ये अडकत नाहीत_ - कम्फर्ट झोनमध्ये माणूस आळशी होतो. आत्मविश्वासू लोक कम्फर्ट झोनमध्ये कधीच स्वत:ला अडकवून घेत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं की कम्फर्ट झोन हा आपल्या स्वप्नांना मारून टाकतो.

4) _कामे पुढे ढकलत नाहीत_ - आत्मविश्वासू माणसे कधीही आजची कामे दुस-या दिवसावर ढकलत नाहीत. ते कधीही योग्य वेळेची किंवा योग्य परिस्थितीची वाट बघत बसत नाहीत. ते आजची कामं आजच करण्यात विश्वास ठेवतात. कारण त्यांना माहीत असतं की यातच प्रोग्रेस आहे.

5) _गॉसिप्सचा विचार करत नाहीत_ - आत्मविश्वासू लोक कधीच इतरांच्या वाईट गॉसिप्समध्ये सहभागी होत नाहीत. ते स्वत:ला स्वत:च्या कामात गुंतवून ठेवतात. आपल्याबद्दल कोण काय बोलतात, याचा कधीही हे लोक विचार करत नाहीत.

6) _पुढे-पुढे करत बसत नाहीत_ - प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीला आपण चांगलेच वाटायला हवे किंवा त्यांच्याशी अधिक जवळीक साधायला हवी, असं आत्मविश्वासू लोकांना वाटत नाही. प्रत्येक भेटणाऱ्याच्या होत हो ते मिळवत नाहीत. 

7) _बडेजाव नाकारतात_ - आत्मविश्वासू लोकांना सतत दुस-याकडून स्वत:चा मोठेपणा ऐकण्याची गरज किंवा सवय नसते. त्यांना माहिती असतं की, जीवन हे कधीच सरळ नसतं. जे आता आहे, ते नेहमीसाठी तसंच राहील याची शाश्वती नसते. असे लोक त्यांची शक्ती-बुद्धिमत्ता सकारात्मक पद्धतीने कामी लावतात. 

8) _अडचणींना घाबरत नाहीत_ - जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून पळून न जाता, समोर आलेल्या अडचणीने आयुष्य आणखी अवघड होऊ न देता, धैर्याने त्याचा सामना करण्याची शक्ती आत्मविश्वासू लोकांकडे असते. जीवन जगत असताना किंवा काम करत असताना काय अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज त्यांना असतो. त्यानुसार ते आधीच उपाययोजना करून ठेवतात.

9) _कुणाची वाट बघत नाहीत_ - आत्मविश्वासू लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी कधीही कुणाच्या सांगण्याची गरज पडत नाही. ते बिनधास्तपणे त्यांना जे करायचे आहे ते करतात. प्रत्येक दिवशी ते स्वत:ला आठवण करून देतात की, ‘जर मी नाही करणार तर कोण?’.

10) _हे-ते करता येत नाही असं बोलत नाही_ - आत्मविश्वासू लोक कधीच स्वत:ला एका लहान टूलबॉक्समध्ये बांधून ठेवत नाहीत. ते काहीही करताना त्यांच्या अंगी असलेले सर्व गुण प्रभावीपणे वापरतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ते स्वत: जवळ असलेले सगळे ज्ञान ते यश मिळवण्याचे नियोजन करण्यात करतात. हे करणार नाही, ते करता येत नाही, असं ते कधी म्हणत नाहीत.

11) _डोळे झाकून विश्वास ठेवत नाही_ - आत्मविश्वासू लोक एखाद्या लेखकाने लिहिलेल्या किंवा मांडलेल्या विचारावर डोळेझाकपणे विश्वास ठेवत नाहीत. ते स्वत:च्या विचाराने जे लिहिले आहे, ते तपासून बघतात. त्यांना माहिती असतं की कुणी काय लिहिलं आहे आणि त्यांनी जे सांगितले आहे, त्यानुसार वागावे की नाही, याचा अधिकार फक्त आपणच करू शकतो. कारण आत्मविश्वासू लोकांना आत्मविश्वास काय असतो, हे चांगलेच माहिती असते.