Monday 29 February 2016

कर्ण आणि श्रीकृष्ण संवाद

कर्णाचे रथाचे चाक ज्या वेळी युद्धभूमीवर रुतते त्यावेळचा श्रीकृष्ण आणि कर्ण संवाद , सध्याच्या काळात पण विचार करायला लावतो..
श्रीकृष्ण - " हे कर्ण . . जी विद्या अनीतीच्या मार्गाने प्राप्त केली जाते , ती संकटाच्या वेळी आपली साथ सोडून देते . आणि हा भगवान परशुरामाचा शाप नाही तर निसर्गाचा नियम आहे . "
कर्ण - " परंतु वसुदेव , मी ही विद्या प्राप्त करायला अथक परिश्रम घेतले आहेत . प्रचंड यातना सहन केल्या आहेत . मग मला का विद्येचे विस्मरण होईल .
श्रीकृष्ण - " विद्या प्राप्त करायचा प्रयत्न का केला होतास अंगराज ? . . विद्येचे महत्व जाणून घेतले होतेस का ?. . विद्या प्राप्त करून समाजाला लाभ द्यायचा अशी इच्छा होती का तुझी ? का फक्त आपल्या अपमानाचा बदला हाच विषय आपल्या मस्तकात ठेवून तू विद्या प्राप्त केलीस ?
वास्तवात विद्या प्राप्त करायला श्रमाची आवश्यकताच नसते . फक्त एकाग्रता आणि समर्पण पुरेसे आहे . ज्ञान तर आत्म्याचा मुलभूत गुण आहे . आणि हे अंगराज तू तर बुद्धिमान आहेस . मला सांग विद्या प्राप्त करताना मन एकाग्र का राहत नाही .
ज्या वेळी माणूस ज्ञानाला एक साधन मानतो , कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी बाहेर पडतो , त्यावेळी ज्ञान प्राप्त होत असतना त्याचे मन स्थिर नसते . ज्ञान त्याच्या आत्म्याचा गुण नाही बनू शकत . जसा 'रंग ' हा कुठल्याही वस्त्राचा स्वताचा गुण नसतो , तसे सूर्य तापून रंग सोडून देतो . तसे जी व्यक्ती ज्ञानाचे महत्व जाणून ज्ञान प्राप्त करतो तो सर्वोत्तम बनतो .
परंतु जी व्यक्ती काहीतरी फायद्यासाठी ज्ञान मिळवत राहते , ती व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर श्रेष्ठ राहण्याच्या स्पर्धेत राहते . पण सर्वोत्तम नाही बनत .
तसे हे अंगराज , तू सुद्धा ज्ञान प्राप्त केलेस , ते कुठल्यातरी स्वफायद्यासाठी . प्रत्यक्ष परशुरामाच्या सान्निध्यात राहून पण तुझे मन शांत नाही झाले . तू स्पर्धा करत राहिलास , कुठेतरी दूर असलेल्या अर्जुना बरोबर . ज्ञान मिळवण्याचा तुझा अर्थच चुकीचा होता . तर ह्या विद्येचे विस्मरण कसे काय होणार नाही अंगराज ?"
कर्ण - कसे काय मी स्पर्धा करू शकत नव्हतो वासुदेव ? मी माझ्या आयुष्यात माझ्याशी कसा काय समझौता करू शकत होतो . ? ह्या समाजाने नेहमीच माझ्यावर अन्याय केला आहे . माझ्या शक्तीला इथे कधीच सन्मान नाही मिळाला . माझ्या आपल्यांनी मला स्वीकारले नाही . सदैव सूतपुत्र म्हणून ह्या समाजाने मला हिणवले आहे . ईश्वराने मला एका घरात कर्म दिले . पण हा समाज एखाद्याचा मुलभूत अधिकारापासून कसा काय वंचीत ठेवू शकतो वासुदेव ?
श्रीकृष्ण - राधेय , बरोबर हा घोर अपराध आहे . जात पात मानणे , संपूर्ण समाजाला ज्ञान , संपत्ती , अधिकार, सन्मान . . यापासून दूर ठेवणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे .
कर्ण - मग माझा दोष काय वासुदेव ? जर माझ्यात असंतोष जन्माला आला , जर मी स्पर्धा केली , जर मी बलपूर्वक स्वतःचा अधिकार खेचून घेतला तर माझा काय दोष वसुदेव ?
श्री . कृष्ण - हे राधेय , त्रेतायुगात , पृत्वीर चा मुलगा कार्तिविर अर्जुन या क्षत्रिय राजाने , महर्षी जमदग्नी यांची हत्या केली . महर्षींच्या मुलाने काय केले माहित आहे का राधेय तुला ? त्याने आपल्या वेदेनेत सुद्धा विचार केला . . का माझ्या वडिलांची हत्या केली गेली ? कुठे झाला होता अधर्म ? त्याने पूर्ण वेदेनेचे विस्मरण केले , संपूर्ण समाजाच्या वेदेनेची स्वतःची वेदना बनवली . आणि अधर्मी क्षत्रियांचा सर्वनाश करून संपूर्ण आर्यावर्त शुद्ध करण्याचा जीवनमंत्र बनवला . ते जर प्रतिशोध हा विषय डोक्यात घेवून बसले असते तर आज  परशुराम म्हणून ओळखले नसते गेले .
होय राधेय , तुला जे दुक्ख आन अपमान मिळाला तो वास्तवात आहे . पण त्याच्याकडे तू एक संधी म्हणून बघितले असतेस तर तुझा उद्धार झाला असता आणि समजाचा फायदा झाला असता . तुझ्यासारख्या शक्तिमान पुरुषाचा आधार , जर अन्यायग्रस्त आणि पिडीत जनतेला मिळाला असता तर कितीतरी आयुष्य सुखाने भरलेली असती .
राधेय , त्या पिडीत लोकांची वेदना तू अनुभवली होतीस पण तुझे आयुष्य तू त्यांच्यासाठी नाही दिलेस . तू तुझे आयुष्य समर्पित केलेस ते क्रूर दुर्योधनास , ज्याच्या पक्षात फक्त अधर्म होता बाकी काही नाही . आता बघ तुझी स्थिती , तू दुर्योधनाच्या बाजूने उभे राहिलास , पांचालीच्या वस्त्रहरणाच्या पापतील भागीदार बनलास . स्वताच्या मातेचा सन्मान नाही करू शकलास . स्वताच्या भावांच्या मुलांच्या हत्त्या केल्यास , . . . आणि आज स्वतःचा संतोष , धर्म गमावून स्वताच्या भावाच्या हातून मारण्यास उभा आहेस .
कर्ण - तू योग्य बोलत आहेस वासुदेव , पण मी मित्र दुर्योधांच्या उपकरांचे विस्मरण नाही करू शकत .
श्री . कृष्ण - कुठला उपकार राधेय ? . . तुझी मैत्री झाल्यावर , आर्यावर्तातील सर्व सुतपुत्राना विद्येचा अधिकार मिळाला का ? त्याने सर्व पिडीत आणि शोषित समाजाला आपले बनवले . . नाही . . नाही राधेय त्याने फक्त आपल्या लाभासाठी मित्रता केली . तुझ्या ह्रदयातील अर्जुनाच्या रागाशी मित्रता केली . जर तू तुझे दुक्ख विसरून समजतील दुक्खला जवळ केले असतेस तर , दुर्योधांच्या मैत्रीचे खरे स्वरूप तुला कळले असते . जर दुर्योधनाच्या मनात उपकाराची भावना असती तर तू , त्याचा लाभ समजला दिला असतास त्याला सर्व अधर्म आणि अपराधां पासून मुक्त केले असतेस .
तुझ्यावरील उपकराला काही किंमतच नव्हती .
कर्ण - वासुदेव , मी आयुष्यभर पिडीत आणि शोषित लोकांना दान दिले आहे . माझ्याजवळ काही ठेवले नाही .
श्रीकृष्ण - दानाचा लाभ , दान करण्याला होतो , दान प्राप्त करणार्याला होत नाही . तू तुझ्या शक्तीचा उपयोग शोशिताना स्वतंत्र करण्या करिता केला असतास तर सर्वाना लाभ झाला असता राधेय . तू म्हणत आहेस , समाजाने तुझ्यावर अन्याय केला . पण ईश्वराने जी शक्ती तुला दिली त्याचे तू मुल्य कधी जाणलेस नाही .
एक सत्य जाणून घे - जी व्यक्ती समाजासाठी जगते त्याला स्वतःला फायदा होतो पण जो फक्त स्वतासाठी जगतो त्याचा तोटा स्वातला आणि समाजाला होतो . आज कुरुक्षेत्रावर जो विध्वंस चालू आहे त्याला ना दुर्योधन जबाबदार ना शकुनी .
हे पाप फक्त तीन महावीर लोकांचे आहे , एक महारथी भीष्म , गुरु द्रोण आणि तू राधेय .
जर तुम्ही तिघांनी स्वताच्या मानलेल्या धर्माचा त्याग करून समाजाचा विचार केला असतात तर , दुर्योधनास साथ दिली नसती तर हे युद्धाच झाले नसते .
कर्ण - तू योग्य बोलत आहेस वासुदेव . ह्या समाजाला जेवढी हानी अधर्मी लोकांपासून होते त्याच्या पेक्षा जास्त हानी धर्म जाणणाऱ्या निष्क्रिय लोकांपासून होते . या महायुद्धाचे पाप आमच्या डोक्यावर आहे .
श्रीकृष्ण - अजूनही वेळ आहे राधेय , स्वताची दुखे विसर , धर्माची बाजू घे , आणि आपल्या मृत्यूचा स्वीकार कर, यातच समाजाचे आणि तुझे कल्याण आहे राधेय .
कर्ण - मी तुझा आदेश स्वीकारतो वासुदेव , मृत्यूला मी स्वीकारतो . माझी माता कुंतीला सांग , झालंच तर मला क्षमा कर . पांचाली ला सांग तुझ्या अपमानाला कारणीभूत व्यक्ती , शूर होती . वासुदेव तिला माझ्या शोर्याची कल्पना कधीच होणार नाही का ? .
श्रीकृष्ण - राधेय , ज्या वेळी तुझ्या हातात तुझे धनुष्य नाही . तुझ्या रथाचे चाक जमिनीत रुतले आहे आणि तुला तुझी विद्या आठवत नाहीये . अशा वेळेचा फायदा घेवून तुझा वध करायला लागतो आहे , हेच तुझ्या सामर्थ्याचे प्रमाण नाही का ?