Friday, 8 April 2016

“...विचारांची गोष्ट...”

             चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.
तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो.



              चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.)
                   अशाप्रकारे, पाडव्याची पार्श्वभूमी आपणाला माहितीच आहे. पाडव्यापासून मराठी नववर्षास सुरवात होते. साडेतीन मुहूर्तापैकी पाडव्याचा मुहूर्त महत्वाचा मानला जातो. या दिवशी खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार केलेले शुभ समजले जाते. प्रत्येकजण नवीन वर्षानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात. अशाच या पाडव्याच्या दिवशी मागील वर्षी2015 मनामध्ये आपण एक BLOG सुरु करावा, असे मनात आले. आणि कोणतीही technical माहिती नसतांना PC समोर जाऊन बसलो, Blog बाबत internet वरून माहिती मिळवत एक-एक step पुढे जात, internet रेंजचा आमच्या ग्रामीण भागातील अडथळा बाजूला करून 10 ते 11 तासांच्या अथक प्रयत्नातून मी माझा हा Blog (dongaread.blogspot.in ) आपणासमोर आणला आहे. या घटनेला आज पूर्ण एक वर्ष लोटले. या एक वर्षात आपण माझ्या Blog ला केलेल्या visit आणि नोंदविलेल्या प्रतिक्रिया माझ्या प्रयत्नांना उभारी आणणाऱ्या आहेत.
या ब्लॉगवरील ज्या पोस्ट आहेत, त्या सर्व आपणासाठी सदासर्वदा useful अशाच आहे आणि त्याप्रमाणेच त्या टाकण्यात आल्या आहे. ( Select the Best ) कामाचा व्याप, नोकरीतील वाढती धावपळ आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे बऱ्याच पोस्ट संकलित आहे. पण, यापुढच्या नवीन वर्षात मनामध्ये अजूनही खूप काही करण्याचा मानस आहे. Blog संदर्भात अजूनही बरीच improvement करावयाची आहे. रतन टाटा यांचे एक वाक्य नेहमी माझ्या विचारांमध्ये ‘घोळत’ असते, “satisfied logo se duniya nahi banti.” जीवनामध्ये Extension महत्वाचे असते. या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कुठेतरी प्रत्येकाने आपला space निर्माण करावा, असे मला वाटते. असो......
यानिमित्ताने आपणाबरोबर काही विचार share करता आले. अजूनही आपणामधील संवाद वाढावा यासाठीचाच प्रयत्न माझा असेल. “ विचारांची गोष्ट ” मलातरी वाढवायची आहे...!
आपणास गुढी-पाडव्याच्या मनापासून खूप-खूप शुभेच्छा..!                from - adsir..!