Tuesday 29 September 2015

तेहतीस कोटी देव कोणते ?

आपणास हे माहित आहे का ?
प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?
उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो . पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. कल्पना अशी आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत .
प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे.
अष्टवसूंची नावे - आप,धृव,सोम,धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास . अकरा
रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू.
असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३. आपल्या ग्रुप वर असे काय तरी चांगले share करा...जेणे करून सर्वाना माहिती मिळत जाईल..!

                                                                         धन्यवाद..!

Tuesday 22 September 2015

Worlds 8 superb sentences..!

--------------<>-------------
Shakespeare :👌
Never  play  with the feelings
of  others  because  you may
win the  game but the  risk is
that  you  will surely  lose
the person  for a  life time.
--------------------------------
Napoleon.👌
The world  suffers  a  lot. Not
because  of  the  violence  of
bad people, But because   of
the silence of good people!
--------------------------------
Einstein :👌
I  am  thankful  to  all those
who  said  NO  to  me   It's
because  of  them  I  did  it
myself.
--------------------------------
Abraham Lincoln :👌
If friendship is your weakest
point  then  you  are  the
strongest  person  in the
world.
--------------------------------
Shakespeare :👌
Laughing  faces  do  not
mean that  there is  absence
of sorrow!  But it means that
they  have the ability to deal
with it.
--------------------------------
William  Arthur : 👌
Opportunities   are  like
sunrises, if  you  wait too
long  you  can miss them.
------------------------------
Hitler : 👌
When  you  are  in  the light,
Everything follows  you, But
when  you  enter  into   the
dark, Even your own shadow
doesn't  follow  you.
--------------------------------
Shakespeare : 👌
Coin  always  makes  sound
but  the  currency  notes are
always  silent.  So  when  your value  increases
keep quiet....!
--------------------------------

Wednesday 16 September 2015

ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता

  • लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता सांगताहेत यशाचा नवाकोरा फॉम्यरुला..

एरवी हे सारं जर दुसरं कुणी सांगितलं असतं,
तर त्यावर सहजी विश्वास ठेवायला मन धजावलं नसतं!
पण जेव्हा ‘त्या’ तिघी हे सांगतात,
तेव्हा विश्वास ठेवा,
ते सारं खरंच असतं!
नव्हे ते खरंच असतं, म्हणून तर त्या तिघी यशाच्या शिखरावर पोहचूनही
तेच सांगत असतात की,
तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या उणिवा वाटतात,
त्याच गोष्टी तुमची ताकद बनू शकतात!
फक्त तुमची त्यांच्याकडे पाहायची नजर बदलायला हवी!
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या स्पर्धेत 
पहिल्या तीन क्रमांकावर बाजी मारणा:या त्या तिघी.
ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता.
त्या सांगतात,
कशाला हवं कोचिंग क्लासचं स्तोम?
कुणी सांगितलं की, मेट्रो शहरातल्या महागडय़ा क्लासेसला गेलं तरच
तुम्ही यूपीएससी क्रॅक करू शकता?
कोण म्हणतं की, इंग्रजीच यायला हवं?
बाकीच्या भारतीय भाषांचा हात सोडून फाडफाड इंग्रजी आलं तरच मुलाखतीत टिकता येतं?
कोण म्हणतं की, चोवीसपैकी पंचवीस तास अभ्यास केला आणि कोंडून घेतलं स्वत:ला तरच 
ही परीक्षा यशाचा दरवाजा दाखवते.?
हे सगळेच गैरसमज आहेत!
या सगळ्याला पुरून उरते ती एकच गोष्ट, ती म्हणजे आत्मविश्वास!
त्याच्या जोरावर स्वत:च्या भाषेत स्वत:चे विचार मांडण्याची
उत्तम हातोटी.
स्वत: अभ्यास करून कमावलेली मतं
आणि त्याला अनुभवाची जोड!
- एवढं असलं तरी आपण ही परीक्षा सहज क्रॅक करू शकतो!
आणि हे सारं तर आपल्याकडे असतंच,
पण त्याची आपण किंमत करत नाही.
उलट त्याला आपण कमतरता समजतो आणि भलत्याच गोष्टींच्या मागे धावतो!
हे धावणं आधी थांबवा. 
आणि शांतपणो विचारा स्वत:ला की,
हे सारं मी करतोय माझं ध्येयं काय?
त्याचं उत्तर तुमच्या जिद्दीला बळ देईल!
***
ते बळ मिळवण्यासाठी काय करायचं हेच सांगणा:या या तिघींच्या विशेष मुलाखती पान 4-5 वर!
लोकोमोटर डिसअॅबिलिटीनं अपंग असलेली ईरा, नुस्ती देशात पहिलीच आलेली नाही तर तिथं व्यवस्थेशी एक मोठी लढाई लढून हे सिद्ध केलंय की, कार्यक्षमतेवर जुनाट विचार मर्यादा नाही लादू शकत!
दुसरी रेणू, डॉक्टर झालेली, केरळातल्या छोटय़ा गावातली, मल्याळम भाषेवर प्रेम करणारी,
आपल्या भाषेचा हात न सोडता यश मिळवता येतं, हे ती सांगते तेव्हा कळते, भाषेला ताकद मानण्याचं एक सूत्र!
आणि तिसरी निधी. एकदा नाही पाचदा अटेम्प्ट करून तिनं जिद्दीनं यश खेचून आणलं. ती सांगते सतत प्रयत्नांतल्या सातत्याचं यश!
***
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर
या तिघींची तयारी एक समृद्ध, सकस दृष्टिकोन नक्की देईल.
आणि नसाल,
तर जिंकण्याची एक नवीन, पॉङिाटिव्ह गोष्ट 
मनात नक्की घर करेल!
त्या गोष्टीसाठी, पान उलटाच.
...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

मुलाखती आणि लेखन- राजानंद मोरे (राजानंद ‘लोकमत’च्या पुणे  आवृत्तीत उपसंपादक/बातमीदार)

Monday 7 September 2015

☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆★

१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा
२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे
३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी
४) शहाजीराजे - होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक)
५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)
६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर
७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड
८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड
९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल
१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरले पुत्र)- वडू कोरेगाव
११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर
१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र)- साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातील मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी
१४) मकुबाई (शिवरायांच्या भावजयी, संभाजीराजे शिवरायांचे थोरले बंधू) - जिंती, ता. करमाळा, जि. सोलापूर
१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
      प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, हंबिरराव मोहिते- तळकीड, ता. कराड
१६) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)
१७) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक
१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप (गाधवड, जि. पुणे)
१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -उमरळ
२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)- पारगड
२१) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता. आटपाटी, जि. सांगली
२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ - परळी (रायगडाजवळ)
२३) शिवा काशिद - पन्हाळगड
२४) कान्होजी जेधे आणि जिवा महा- कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे
२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर
२६) संभाजी कावजी - कोंडावळे, ता.मुळशी, जि. पुणे
२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग (चाकण) पुणे
२८) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)
२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड
३०) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू) निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.
३१) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर
३२) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच नावाने आहे) - बीड
३३) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर 
३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा 
३५) हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद 
३६) अन्नूबाई (पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.उस्मानाबाद 
                                                           आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत. त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील पिढीला प्रेरणा देणारी असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे...!