Wednesday 30 December 2015

..चिऊताई दार उघड..

                                                                                             आपल्या मनाविरुद्ध काही झालं कि काही काही व्यक्ती खूप नाराज होतात, स्वतः वर चिडतात, आत्मविश्वास गमवून बसतात. सगळ्या जगाकडे पाठ करून, स्वतःच एकलकोंड असं जग बनवून बसतात.  अश्या लोकांसाठी, एका चिमणीला उद्देशून मंगेश पाडगांवकर यांनी एक छान कविता लिहिली आहे.
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
दार उघड
चिऊताई दार उघड !
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
दार उघड
चिऊताई दार उघड !
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
दार उघड
चिऊताई दार उघड !
- मंगेश पाडगावकर

Saturday 26 December 2015

नील आर्मstrong..!

  • नील आर्मस्ट्राँग ...., चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव..
                                          पण, तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं? अनेकांना हे ठाऊक नाही .... मला ही माहीत नव्हतं !!
                          ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन, अपोलो मिशन चा पायलट ... तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.
नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता.... त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.
जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , "Pilot First".
पण एडविन थबकला,
"काय होईल पुढे ",
"मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे....."
हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा ...

मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले ...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला ...!!
मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला...!!
हा जागतिक इतिहास बदलला एका क्षणात ....
एडविन कडे जरी गुणवत्ता होती... त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती ....,
परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही ...!!

जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं ....
हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने, करु का नको या विचारात संधी कशी गमावतो याचं ....
जेव्हा जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल, तेव्हा हे आठवा ...
क्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं...!!

आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा ... घाबरण्याचा ... संकोचाचा ... लाजाळुपणाचा ... तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो ...!!
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात पण आपण विचारायला घाबरतो, अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाला दाद द्यायला चुकतो, आणि कदाचित अनेकजण हा संदेश पुढे पाठविण्यात ही चालढकल करतील ....!!
जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो... अडखळलो... घाबरलो... , तर बहुधा आपण फार मोठी चुक करीत आहोत नाही का ...???

Tuesday 22 December 2015

Only Give 30 minutes to Ourself

  • 30 मिनीट चालण्याचे ३० फायदे...
                                                                      जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन, कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.
                            दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन संतुलित ठेवण्याचा चालणे हा उत्तम मार्ग आहे
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

Friday 18 December 2015

I am proud to be on my "teacher's" job

हाँ मैं शिक्षक हूँ। - हाँ मैं शिक्षक हूँ।
उन डाक्टरो के पीछे ; मैं था ।
उन अर्थशास्त्रीयो के पीछे ; मैं था ।।
उन अंतरिक्ष विज्ञानियो के पीछे ; मैं था ज्ञान का प्रकाश लेकर ।।;
भले ही वे मेरा मजाक उङाये।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।।।
मेरे पास महंगा घर नही है ; पर हाँ मैं शिक्षक हूँ ।।।।
कभी कभी मैं उलझ जाता हूँ मेरे अधिकारी और राजनेताओ की बदलती नीतियो में ।
जो बताते हैं कि मुझे कैसे पढ़ाना है ।।।
पर फिर भी मैं शिक्षक हूँ और पढा रहा हूँ।।।
जिस दिन वेतन मिलता है ,मैँ औरो की तरह नही हँस पाता हूँ ।
पर अगले दिन मुझे मुस्कुराके जाना होता है उनके लिये जिन्हे मैं पढ़ाता हूँ ।।
क्योकि मै शिक्षक हँ ।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।
मेरे संतोष का कारण है जब मैं देखता हूँ 
अपने छात्रों को आगे बढते हुए , सफल होते हुए , 
सब कुछ प्राप्त करते हुए , दुनिया का मुकाबला करते हुए।।।
और मैं कहता हूँ गुगल के जमाने में भी मैंनें पढ़ाया है ।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।।
कोई बात नहीं वो मुझे किस नजर से देखते हैं ।
कोई बात नहीं वो मुझसे कितना ज्यादा कमाते हैं ।
कोई बात नहीं वो मेरी कितनी इज्जत करते हैं और मानते है।।
वो कारों में घूमते हैं , मैं पैदल चलता हूँ क्योंकि मैं शिक्षक हूँ ।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।।  हाँ मैं शिक्षक हूँ ।।।
इसे सभी शिक्षकों के सम्मान मे जन जन तक पहुंचाये ।।।।।।।।

(It's not my created poem. I read it some where; and I like)