Thursday 30 April 2015

सुन्दर कविता जिसके अर्थ काफी गहरे हैं...

  • मैंने .. हर रोज ..
जमाने को .. रंग बदलते देखा है ....
उम्र के साथ .. जिंदगी को ..
ढंग बदलते देखा है .. !!
  • वो .. जो चलते थे ..
तो शेर के चलने का .. होता था गुमान..
उनको भी .. पाँव उठाने के लिए .. सहारे को तरसते देखा है !!
  • जिनकी .. नजरों की ..
चमक देख .. सहम जाते थे लोग ..
उन्ही .. नजरों को ..बरसात ..की तरह ~~ रोते देखा है .. !!
  • जिनके .. हाथों के ..
जरा से .. इशारे से ..
टूट जाते थे ..पत्थर ..
उन्ही .. हाथों को .. पत्तों की तरह ..
थर थर काँपते देखा है .. !!
  • जिनकी आवाज़ से कभी ..          
बिजली के कड़कने का .. होता था भरम ..
उनके .. होठों पर भी .. जबरन ..
चुप्पी का ताला .. लगा देखा है .. !!
  • ये जवानी ..
ये ताकत .. ये दौलत ~~
सब कुदरत की .. इनायत है ..
इनके .. रहते हुए भी .. इंसान को ~~
बेजान हुआ देखा है ... !!
  • अपने .. आज पर .. इतना ना .. इतराना ~~
मेरे .. यारों .. वक्त की धारा में .. अच्छे अच्छों को ~~
मजबूर हुआ देखा है .. !!!
  • कर सको......  तो किसी को खुश करो......
दुःख देते ........ तो हजारों को देखा है....

Monday 27 April 2015

🔘 मोदी यांच्या सरकारने ऑनलाईन सेवा सुरु केली 🔘

* प्राप्त :-
1. जन्म दाखला
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=1
2. जातीचा दाखला http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=4
3. टोळी प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=8
4. अधिवास प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=5
5. वाहन चालक परवाना
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=6
6. विवाह प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=3
7. मृत्यू प्रमाणपत्र http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=2

अर्ज करा :-
1. पॅन कार्ड
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15
4. पासपोर्ट http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=2
5. मतदार याद्या नाव नोंदणे
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=10

नोंदणी :-
1. जमीन / मालमत्ता
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=9
3. राज्य रोजगार एक्सचेंज http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=12
4. नियोक्त्याची म्हणून http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=17
चेक / ट्रॅक :-
1. केंद्र सरकारने गृहनिर्माण यादी स्थिती प्रतीक्षा
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=9
2. चोरीला वाहनांची स्थिती http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1
3. भूमि अभिलेख http://www.india.gov.in/landrecords/index.php
4. भारतीय न्यायालयांच्या कॉजलिस्ट यादी http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7
5. न्यायालयांच्या निकालांच्या (JUDIS)
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24
6. दैनिक कोर्ट ऑर्डर / प्रकरण स्थिती http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21
7. भारतीय संसद कायदे http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13
8. परिक्षा परिणाम http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16
9. स्पीडपोस्ट स्थिती http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10
10. ऑनलाइन शेती बाजार भाव http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6

पुस्तक / चित्र / लॉज :-
1. ऑनलाईन रेल्वे तिकीट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5
4. केंद्रीय दक्षता आयोगाचे तक्रार (CVC हा) http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14

योगदान :-
1. पंतप्रधान मदत निधी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=11

इतर :-
1. इलेक्ट्रॉनिक पत्रे पाठवू
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=20

ग्लोबल नेव्हिगेशन :-
1. नागरिक
http://www.india.gov.in/citizen.php
2. व्यवसाय (नवीन विंडो मध्ये उघडेल बाह्य वेबसाइट)
http://business.gov.in/
3. ओव्हरसीज http://www.india.gov.in/overseas.php
4. सरकार http://www.india.gov.in/govtphp
5. भारत जाणून http://www.india.gov.in/knowindia.php
6. क्षेत्रांमध्ये http://www.india.gov.in/sector.php
7. संचयीका http://www.india.gov.in/directories.php
8. दस्तऐवज http://www.india.gov.in/documents.php

Saturday 25 April 2015

‘अवर इंडस्ट्री डज नॉट रिस्पेक्‍ट ट्रॅडिशन - इट ओन्ली रिस्पेक्‍ट्‌स इनोव्हेशन.’

  •  चाळिशी मायक्रोसॉफ्टची...!
                                                                     ‘विंडो’ उघडल्याशिवाय कॉम्प्युटरच्या दुनियेची सकाळ होत नाही. एवढी सर्वव्यापी बनलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला नुकतीच (४ एप्रिल) चार दशकं पूर्ण झाली. संपूर्ण जगाला नवी दिशा देणाऱ्या या कंपनीचा प्रवास थक्क करणारा आहे, तसंच खूप काही शिकवणाराही. संगणकांच्या सॉफ्टवेअर क्षेत्रात ही कंपनी अद्याप ‘दादा’ आहे; पण हीच स्थिती कायम राहणार का? मायक्रोसॉफ्टच्या कामगिरीचा मागोवा...
                                                                          ‘अवर इंडस्ट्री डज नॉट रिस्पेक्‍ट ट्रॅडिशन- इट ओन्ली रिस्पेक्‍ट्‌स इनोव्हेशन.’ मायक्रोसॉफ्टचा सीईओ म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सत्या नडेला यांच्या पहिल्या भाषणातलं हे विधान खूपच गाजलं. ‘परंपरा विसरा, नव्याचा शोध घ्या’ असा अर्थ कुणी काढला, तर काहींनी त्याकडं आणखी वेगळ्या नजरतून पाहिलं.

                                                                             आपणास ‘एमएस डॉस’ माहिती आहे का? बरं, विंडोज वन माहितेय का? बरं जाऊ द्या, विंडोज ९५, ९८. पण विंडोज एक्‍सपी निश्‍चितच माहिती असणार, कारण ते अलीकडेच ‘आउटडेटेड’ झालं आहे.
                                              या प्रश्‍नांची उत्तरं शोधताना सत्या नडेला यांच्या विधानामध्ये किती तथ्य आहे, हेच अधोरेखित होईल. कारण दिवसभर संगणकविश्‍वात रमणाऱ्या आजच्या पिढीला ‘एमएस डॉस’ माहितीच नाही, त्यात त्यांना रसही नाही. मात्र पुढं काय येत आहे जेणेकरून माझं आजचं काम अधिक सुलभ कसं होईल, याकडं मात्र त्यांचं लक्ष आहे. म्हणूनच ‘इनोव्हेशन्स’ला या क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व आहे.


                                                      सत्या यांच्या विधानाकडं चिकित्सकदृष्ट्या पाहिलं तर लक्षात येईल की, संगणकीय दुनियेत निजदिनी नावीन्यकरणाला महत्त्व आहे. जो यात मागे पडला, तो स्पर्धेतून बाद झाला. ‘जुने जाऊ द्या मरणालागूनि’ ही उक्ती इथं रोजच लागू आहे. येणारा प्रत्येक दिवस काही तरी नवं घेऊन येत आहे, त्याचबरोबर जुन्या अनेक बाबी, मग त्या चांगल्या असल्या तरी बाद होत आहेत. मायक्रोसॉफ्ट या स्पर्धेत खूपच आघाडीवर होती, अद्यापही आहे. कसा झाला हा प्रवास?
                                                         बिल गेट्‌स आणि पॉल ॲलन यांनी १९७५ मध्ये मोजक्‍या कर्मचाऱ्यांसह ‘मायक्रोसॉफ्ट’ची स्थापना केली. अल्टेअर ८८०० या डेस्कटॉप कॉम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर बनविण्याचं काम त्यांना मिळालं होतं, तेव्हापासून या कंपनीचं मुख्य लक्ष्य सॉफ्टवेअर निर्मिती हेच राहिलं ते २०१२ पर्यंत. विशेषत: ऑपरेटिंग सिस्टीम हेच त्यांचे प्रमुख सॉफ्टवेअर राहिलं. १९८०मध्ये बिल आणि पॉल यांनी सर्व प्रकारच्या आयबीएम कॉम्प्युटरसाठी ‘एमएस डॉस’ हे सॉफ्टवेअर बाजारात आणलं. २८६, ३८६ ते ४८६ प्रोसेसरपर्यंत ‘डॉस’ आणि नंतर विंडोजशिवाय कॉम्प्युटरचं पान हलत नसे.



                                                         मायक्रोसॉफ्टचा व्याप वाढत जाऊ लागला तसा, गेट्‌स यांना हार्वर्डचा आपला जुना मित्र स्टीव्ह बाल्मरची आठवण झाली आणि गेट्‌स व पॉल यांनी बाल्मरला कंपनीत घेतले, १९८० चा तो काळ होता. इथून पुढं या त्रिकुटानं ‘कॉम्प्युटिंग’ दुनियेत मोठी क्रांती केली. पहिलं विंडोज सॉफ्टवेअर आलं १९८३ मध्ये. त्याची कथाही रंजक आहे. वास्तविक हार्डवेअर आणि प्रोगॅम्स या दोन्हींमध्ये इंटरफेस सॉफ्टवेअर (सांधणारा दुवा) निर्माण करण्यासाठीच मायक्रोसॉफ्टचा जन्म झाला होता, त्यामुळं नव्या सॉफ्टवेअरला ‘इंटरफेस मॅनेजर’ असेच संकेतनाम (कोडवर्ड) देण्यात आलं होतं. परंतु या प्रणालीचं दृश्‍य स्वरूप एका पाठोपाठ एक करत उघडणारे ‘बॉक्‍सेस’ असं असल्यानं गेट्‌स यांनी त्याचं नामकरण ‘विंडोज’ असं केलं. पहिलं विंडोज सॉफ्टवेअर ‘डॉस’ आधारित होतं. ते अधिक सुलभ झालं १९८५ मध्ये ‘विंडोज १’च्या सादरीकरणानंतर. रायटर, नोटपॅड, कॅल्क्‍युलेटर, कॅलेंडर आदी सुविधा त्यात देण्यात आल्या. ‘डॉस कमांड’ऐवजी माउसनं टिचकी मारून विविध ‘विंडो’मधून प्रवास करता येऊ लागला. त्याच्या लोकप्रियतेमुळे विंडोज २ आलं, सोबत ‘कंट्रोल पॅनल’ घेऊनच. ते इंटेल २८६ प्रोसेसरवर चालणारे होते. पुढे प्रोसेसरमध्ये संशोधन होत गेलं तसे विंडोजदेखील नव्या रूपात अवतरू लागले आणि अखेर ती वेळ आली. १९८८ मध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये जगातली सर्वांत मोठी कंपनी म्हणून ‘मायक्रोसॉफ्ट’ची इतिहासात नोंद झाली.
  • जमाना ‘विंडोज ९५’चा
                                                              ऑगस्ट १९९५ मध्ये ‘विंडोज ९५’ची घोषणा करण्यात आली. विंडोजचा हा नवा अत्याधुनिक अवतार होता. पहिल्यांदाच त्यात इंटरनेट सुविधेसोबतच फॅक्‍स, मोडेम, ई-मेलसाठी ‘आउटलूक एक्‍स्प्रेस’ आणि मल्टिमीडिया गेम्सदेखील होते. याशिवाय ‘प्लग एन प्ले’ सुविधेमुळं कोणतेही अन्य सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये सहज लोड करता येत होते. एव्हाना कॉम्प्युटर आणि विंडोज हे समीकरण बनलं, पुढं विंडोज ९८, विंडोज २००० आणि विंडोज एक्‍सपी आलं. ‘एक्‍सपी’ सर्वाधिक काळ स्थिर राहिलेलं व वापरलं जाणारं सॉफ्टवेअर ठरले. त्यात सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी होत्या, त्यासाठी ‘विंडोज व्हिस्टा’ मोठ्या जाहिरातबाजीनं सादर करण्यात आले. मात्र कंपनीची अडचण इथंच झाली. ‘व्हिस्टा’मधल्या अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या. कॉम्प्युटर ग्राहक नाराज होऊ लागले व अन्य पर्यायांचा शोध घेऊ लागले. कोणी लिनक्‍सकडं वळले, तर कोणी ‘ॲपल’कडं. ‘विंडोज’ किलकिल्या होऊ लागल्या. म्हणून गडबडीनं विंडोज -७ आणलं. व्हिस्टाचा अनुभव जमेशी असल्यानं ‘विंडोज -७’ची चाचणी तब्बल ८० लाख ग्राहकांनी ऑनलाइन घेतल्याचा कंपनीचा दावा आहे. दोनच वर्षांनी विंडोज ८ सीरिज आली. सध्या मायक्रोसॉफ्टची ‘विंडोज क्रांती’ ८.१ पर्यंत येऊन थांबलेली आहे. सॉफ्टवेअरखेरीज कंपनीची इतरही अशा स्वरूपाची उत्पादने आहेत, उदा. बिझनेस एंटरप्राईस सोल्युशन्स, क्‍लाउड कॉम्प्युटिंग इत्यादी, मात्र ‘एक्‍स बॉक्‍स’ हे गेमिंग कन्सोल ‘विंडोज’नंतर सर्वाधिक लोकप्रिय ठरले.
  • नवं धोरण
                                                                    दरम्यानच्या काळात, गुगलच्या अँड्रॉईडने मोबाईल फोन्सच्या क्षेत्रात धुमाकूळ घातला. अँड्रॉईड मोबाईलने एवढी लोकप्रियता मिळवली, की तो संगणकाला पर्याय ठरू लागला. टॅबलेट मोबाईल आल्यानंतर तर डेस्कटॉप कॉम्प्युटरची दुनिया छोटी होऊ लागली, याची जाणीव मायक्रोसॉफ्टला २०१२ मध्ये झाली आणि त्यांनी नोकिया या मोबाईल फोनच्या उद्योगातल्या मोठ्या ब्रॅंडचा ताबा घेतला. आपण सॉफ्टवेअरसोबत उपकरणांच्या क्षेत्रातही उतरण्याची गरज आहे, असा साक्षात्कार या कंपनीला झाला. ‘विंडोज मोबाईल’ मार्केटमध्ये उतरवण्यात आला. ॲपलचे जसे अत्यंत निष्ठावान वापरकर्ते आहेत, तसेच विंडोज मोबाईलचेही आहेत. मात्र ॲपल पीसी आणि मोबाईल ग्राहकांच्या तुलनेत मायक्रोसॉफ्टकडं अशा ग्राहकांची संख्या खूपच कमी आहे. नोकियावर ताबा मिळवण्यापूर्वी कंपनीनं सरफेस टॅबलेट पीसी आणला होता, मात्र टॅबलेटच्या दुनियेत खूपच पर्याय उपलब्ध असल्यानं त्याचा फारसा टिकाव लागला नाही.
  • मायक्रोसॉफ्टचं अर्थकारण
                                                                        २००९ आणि २०१३ वगळता मायक्रोसॉफ्टचा विकास वेगानं झाला आहे. या दोन्ही वर्षांत मात्र कंपनीची घसरण झाल्यानं महसूल वाढीचा दर (उणे) घटला होता. २००५ मध्ये कंपनीने तब्बल ५० टक्के विकासदर गाठला होता, तेवढा वेग नंतर कधीही गाठता आलेला नाही. अलीकडच्या काळात तर तो १ ते ५ टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. २००० मध्ये गेट्‌स बाजूला झाले आणि त्यांनी बाल्मर यांच्या खांद्यावर अध्यक्ष व सीईओपदाची धुरा सोपवली. बाल्मर यांचा कालखंड प्रचंड स्पर्धेचा राहिला. त्यांनी पदभार स्वीकारला त्या वर्षी म्हणजे २००९ मध्ये निव्वळ उत्पन्न १८ टक्‍क्‍यांनी घसरलं होतं. त्यांच्या जागी सत्या नडेला आले तेव्हा कंपनीचे निव्वळ उत्पन्न १४ अब्ज डॉलरवरून २२ अब्ज डॉलरवर गेलं होतं. तब्बल १ लाख २३ हजार कर्मचारी असलेल्या या कंपनीच्या उत्पन्नाचा सर्वांत मोठा वाटा ‘ओएस’ (ऑपरेटिंग सिस्टीम) विक्रीतूनच येतो. त्यानंतर क्रमांक आहे क्‍लाउड आणि सर्व्हरचा. इंटरनेट, सॉफ्टवेअर, ऑनलाइन सोल्युशन्समध्ये मायक्रोसॉफ्टला गुगल मोठा स्पर्धक आहे, फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गुगलचं गेल्या आर्थिक वर्षाचं निव्वळ उत्पन्न १५ अब्ज डॉलरच्या घरात होतं. हार्डवेअर व सॉफ्टवेअरमधील सर्वांत मोठी स्पर्धक असलेली जगातील बलाढ्य कंपनी ‘ॲपल’नं मायक्रोसॉफ्टला केव्हाच मागं टाकत निव्वळ उत्पन्नाचा ४९ अब्ज डॉलरचा पल्ला गाठला आहे. सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखाली ‘मायक्रासॉफ्ट’ची सफर कशी होते हेच आता पाहायचे आहे. चाळिशीनंतर मानवी आयुष्यात सेकंड इनिंग सुरू होते असं मानतात. मायक्रोसॉफ्ट आता महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. नडेला कंपनीला कुठं नेतात, ते पाहणं उत्कंठावर्धक ठरेल.

  • आता विंडोज टेन
                                                                     कॉम्प्युटर विश्‍वातील ‘ओएस’ विकासाच्या स्पर्धेला टक्कर देण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं जानेवारीच्या अखेरीस ‘विंडोज १०’ सादर केलं. विंडोज ८ च्या तुलनेत यात खूपच बदल करण्यात आले आहेत आणि विशेष म्हणजे ‘स्टार्ट मेनू’ पुन्हा ‘स्टार्ट’ बटनवर देण्यात आला आहे. विंडोज ७ आणि विंडोज ८ साठी विंडोज १० चे अपडेट मोफत असेल. त्यात इंटरनेट एक्‍स्प्लोररचा अत्याधुनिक अवतार ‘इंटरॲक्‍टिव्ह’ करण्यात आला आहे. नेटविश्‍वात फिरताना तुम्हाला आवडलेल्या साईट्‌स, फोटो किंवा अन्य काही तुम्ही अधोरेखित करू शकाल आणि इतरांना पाठवू शकाल.
  • ‘क्रांतिकारी’ हॉलोलेन्स
                                                                          हा एक विलक्षण चष्मा आहे, तो परिधान केला की नवे आभासी जग तुमच्यासमोर उभे राहील, ते तुम्ही केवळ तुम्ही पाहूच शकणार नाही, तर त्यात स्वत: सहभागी होऊ शकाल. कोणाला गुगल ग्लास वाटेल पण त्यापेक्षा खूप पुढचं हे प्रकरण आहे. विंडोज १० सादर करताना आभासी विश्‍व उभे करणारा ‘हॉलोलेन्स’ हा जादूई चष्माही सादर करण्यात आला. सत्या नडेला यांनी सीईओ म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर या दोन मोठ्या घोषणा आहेत. विंडोजनं संगणक क्षेत्रात क्रांती केली. आता आभासी विश्‍वात हॉलोलेन्स नक्कीच क्रांती करतील अशी आशा आहे. गुगल ग्लास किंवा ॲक्‍युलस रिफ्टपेक्षा हॉलोलेन्स खूप वेगळा चष्मा आहे. ग्लास किंवा ॲक्‍युलसला कॉम्प्युटर - मोबाईल कनेक्‍शनची गरज लागते. हॉलोलेन्स स्वतंत्र आहे, त्याला बाहेरच्या कनेक्‍शनची गरज नाही. शिवाय तो हातवारे आणि आवाज ओळखतो व कमांड स्वीकारतो. या चष्म्याद्वारे रिकाम्या पोकळीत (हवेत), भिंतीवर किंवा कोणत्याही वस्तूवर ‘थ्री-डी’ स्क्रीन निर्माण करता येतो. तुम्ही जिकडे जाल तिकडे हा स्क्रीन तुमच्या सोबतच येतो. या चष्म्यासाठी खास ‘हॉलो स्टुडिओ’ही बनवण्यात आला आहे. विंडोजमधील पेंटब्रशची ही अत्याधुनिक ‘थ्री-डी’ आवृत्ती आहे. त्यात तुम्ही आभासी दुनियेत कोणत्याही स्वरूपाचं डिझाईन बनवू शकता, एवढेच नाही तर ते ‘सेव्ह’ करून त्याची थ्री-डी प्रिंटही घेता येऊ शकते. म्हणूनच ते क्रांतिकारी ठरेल, असा नडेला यांचा विश्‍वास आहे. या चष्म्याची विक्री एप्रिलअखेर सुरू होण्याची शक्‍यता आहे.


  • मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्‌स आपला सहकारी पॉल ॲलनसमवेत..!
  •  
  •  
  •  
  •  
  • I read above story about 'Microsoft' in Sakal marathi daily news-paper. This is very inspirable to youngs. So, I tried to give the story as it is given in " Sakal-Saptarang " suppliment..! I request to all my faithful friends for reading this story carefully & tried to make our own opinion about ourself future..!
  • thanx to Sakal and Mr. Nandkumar Sutar sir..! 

Thursday 23 April 2015

LOVE is BLIND..कारण की,

💕" एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी लपा-छपी खेळायचे ठरवले,💖💖

💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३ ....असे आकडे म्हणू लागला,💖
💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची जागाच मिळत नव्हती, 💖 💕वेड्याचे आकडे जेव्हा संपत आले तेव्हा प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात उडी टाकली,💞 💕 ते झुडूप गुलाबांच्या फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं...💖💖 💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं, पण प्रेम काही मिळाले नाही,💖 💕शेवटी स्वताहाची हार सहन न झाल्या मुळे वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात जोराने काठी खुपसली व बाहेर काढली ........💖
💕बाहेर काढल्या नंतर काठीला लागलेलं रक्त बघून वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये वाकून बघितलं,💖 💕तेव्हा तिथे त्याला हसत असलेल प्रेम दिसलं,💖
💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या डोळ्यात खुपसली गेली होती..💖
💕ते पाहून वेड खूप रडला आणि त्याने प्रेमाला वचन दिले कि इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी बघशील💖
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी तुझ्या बरोबर राहीन.......💖
💖तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे. गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका सोय म्हणून सहज असं तोडू नका रक्ताचं नाही म्हणून,  कवडीमोल ठरवू नका..! "
 

 🐾🌸 भावनांचं मोल जाणा , मोठेपणात हरवू नका. आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं,
🐾🌸 जन्मभर पुरेल इतकं भरून  प्रेम मिळत असतं, तुम्ही फक्त ओंजळ पुढे  करुन पहा,
🐾🌸 कमीपणा मानू नका, व्यवहारातलं देणं घेणं  फक्तं मध्ये आणू नका.. मिळेल तितकं घेत रहा,  जमेल तितकं देत रहा,
🐾🌸 समाधानात तडजोड असते  फक्त जरा समजून घ्या 'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घ्या..
🐾🌸 विश्वासाचे चार शब्दं .. दुसरं काही देऊ नका जाणीवपूर्वक 'नातं' जपा..  मध्येच माघार घेऊ नका...
🌸🐾 🌸. शब्दांना  भावरूप  देते, . . .  तेच  खरे  पत्र ॥ नात्यांना  जोडून  ठेवते, तेच  खरे  गोत्र ॥
           नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,   खरे  नेत्र ॥ दूर  असूनही  दुरावत  नाही,तेच  खरे  मित्र. ॥॥

जनरल Knowledge साठी Current माहिती...!

  • जिल्हा आणि पालकमंत्री....
मुंबई - सुभाष देसाई
मुंबई उपनगर - विनोद तावडे
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - गिरीश बापट
पालघर - विष्णू सावरा
बीड-लातूर - पंकजा मुंडे
सांगली-कोल्हापूर - चंद्रकांत पाटील
रायगड - प्रकाश मेहता
परभणी-नांदेड - दिवाकर रावते
रत्नागिरी - रवींद्र वायकर
नाशिक - गिरीश महाजन
जळगाव-बुलढाणा - एकनाथ खडसे
सिंधुदुर्ग - दीपक केसरकर
औरंगाबाद - रामदास कदम
गडचिरोली - अंबरीश आत्राम
वर्धा-चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
भंडारा-उस्मानाबाद - डॉ. दीपक सावंत
गोंदिया - राजकुमार बडोले
जालना - बबनराव लोणीकर
हिंगोली - दिलीप कांबळे
अहमदनगर - राम शिंदे
सातारा - विजय शिवतारे
सोलापूर - विजय देशमुख
अमरावती - डॉ. प्रविण पोटे
अकोला-वाशिम - डॉ. रणजित पाटील
यवतमाळ - संजय राठोड
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे

Friday 17 April 2015

UPSC मैन्स परीक्षेत विचारलेला प्रश्न ?

  • लक्षपूर्वक वाचुन उत्तर द्या :-
एका शेतकऱ्याला ३ मुले असतात.
तिघेही सकाळी शेतावर कामाला जातात.
शेतकर्याची बायको त्यांच्यासाठी भाकरी करून ठेवते.
पहिला मुलगा दुपारी कामावरून
घरी येतो भाकरी पाहतो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाक-याचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
नंतर दुसरा मुलगा येतो . त्याला वाटते आपण
पहिल्यांदाच आलो.
तो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
नंतर तिसरा मुलगा येतो. त्याला वाटते आपण
पहिल्यांदाच आलो तो एक
भाकरी कुत्र्याला टाकतो राहिलेल्या भाकर॒यांचे ३
समान भाग करतो एक भाग खातो अन उरलेले २ भाग
ठेऊन देतो.
सायंकाळी तिघेही घरी येतात झालेला प्रकार
समजतो ते एक भाकरी कुत्र्याला टाकतात .
उरलेल्या भाकर॒यांचे ३ समान भाग करतात अन
प्रत्येकी खातात.
या सर्व प्रकारात
कुठेही भाकर॒यांचे तुकडे करत नाहीत. तर
सकाळी शेतकऱ्याच्या बायकोने किती भाकरी केल्या होत्या..?

Wednesday 15 April 2015

It's for your kind Information..!

" गावाचं नाव पुट्टमराजू कंद्रिगा... वस्ती जेमतेम ४०० लोकांची... रस्ता
नाही की शौचालय नाही... कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत...
अवघ्या चार महिन्यांपूर्वीचं हे चित्र. पण हेच गाव आज राष्ट्रीय चर्चेचा
केंद्रबिंदू बनलं आहे. कारण, अवघ्या चार महिन्यांत देशातील
महानगरांनाही हेवा वाटेल असा या गावाचा कायापालट झालाय
आणि यामागं आहे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व खासदार सचिन रमेश तेंडुलकर .
क्रिकेट जगतात स्वत:चं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारा सचिन
राजकारणाच्या मैदानावरील इनिंगलाही वेगळ्या उंचीवर नेऊन
ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टमराजू कंद्रिगा
गावाचा चेहरामोहरा बदलून सचिननं याचा शुभारंभ केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सांसद आदर्श ग्राम योजने'ची घोषणा
केल्यानंतर अनेक खासदारांनी आपापल्या पसंती गावं दत्तक घेतली
होती. बहुतेक खासदारांनी हायप्रोफाइल गावांना प्राधान्य दिलं
होतं. सचिननं मात्र हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या पुट्टमराजू
कंद्रिगा गावाची निवड केली होती.
अन्य खासदारांच्या दत्तक गावांमध्ये अद्याप कामाला सुरुवातही
झालेली नसताना सचिननं स्थानिक प्रशासन, केंद्र सरकारकडं
पाठपुरावा करून पुट्टमराजू गावात चार महिन्यांच्या आतच
विकासाची गंगा आणली आहे. गावात सांडपाण्याच्या
निचऱ्यासाठी भूमिगत गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक
घरात २४ तास पाणी, वीज उपलब्ध करून देण्यात आलीय. खेळासाठी
खास मैदान बनविण्यात आलंय. काँक्रिटच्या रस्त्याबरोबरच
समाजमंदिर व सुसज्ज हॉस्पिटलही उभारण्यात आलं आहे. स्वत:च्या
खासदार निधीतून २.७९ कोटी खर्च करून तसेच केंद्र सरकारकडून ३ कोटी
रुपये मिळवून सचिननं या गावाचं रूपडंच बदलून टाकलं आहे.
गावावर विकासाच्या जादूची कांडी फिरल्यामुळं गावकरीही हरखून
गेले असून त्यांनी सचिनला धन्यवाद दिले आहेत. सचिननं घालून दिलेल्या
या आदर्शापासून अन्य खासदार काही बोध घेणार का, असा प्रश्न
आता विचारला जात आहे...! "

Tuesday 14 April 2015

Google Celebrating Ambedkar’s 124 Birth Anniversary..!


BIO – DATA (1891-1956)

B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D.,L.L.D.,D.Litt., Barrister-at-Law.
B.A.(Bombay University) Bachelor of Arts,
MA.(Columbia university) Master Of Arts,
M.Sc.( London School of Economics) Master Of Science,
Ph.D. (Columbia University) Doctor of philosophy ,
D.Sc.( London School of Economics) Doctor of Science ,
L.L.D.(Columbia University) Doctor of Laws ,
D.Litt.( Osmania University) Doctor of Literature,
Barrister-at-La w (Gray's Inn, London) law qualification for a lawyer in royal court of England.
Elementary Education, 1902 Satara, Maharashtra
Matriculation, 1907, Elphinstone High School, Bombay Persian etc.,
Inter 1909,Elphinston e College,Bombay Persian and English
B.A, 1912 Jan, Elphinstone College, Bombay,
University of Bombay, Economics & Political Science
M.A 2-6-1915 Faculty of Political Science, Columbia University, New York,
Main- Economics Ancillaries-Soc iology, History Philosophy, Anthropology, Politics
Ph.D 1917 Faculty of Political Science, Columbia University, New York,
'The National Divident of India – A Historical and Analytical Study'
M.Sc 1921 June London School of Economics, London 'Provincial Decentralizatio n of Imperial
Finance in British India' Barrister-at- Law 30-9-1920 Gray's Inn, London Law
D.Sc 1923 Nov London School of Economics, London 'The Problem of the Rupee - Its origin and its
solution' was accepted for the degree of D.Sc. (Economics).
L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University, New York For HIS achievements,
Leadership and authoring the constitution of India.
D.Litt (Honoris Causa) 12-1-1953 Osmania University, Hyderabad For HIS achievements,
Leadership and writing the constitution of India...!

विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन


Google Celebrating Ambedkar’s 124 Birth Anniversary..
 Image result for dr.b.r.ambedkar