वर्तमानकाळ हा ( म्हणजे मार्च व एप्रिल महिना ) परीक्षांचा काळ म्हणून सर्वज्ञात आहे. या कालावधीत सर्वत्र परीक्षा घेऊन विद्यार्थ्याचा वार्षिक निकाल तयार केला जातो आणि तो ठराविक तारखेला जाहीर केला जातो. विद्यार्थ्याच्या संबंधी संपूर्ण वर्षातील लेखी-तोंडी-प्रात्यक्षिक परीक्षा, तसेच त्याचे संपूर्ण वर्षातील वर्तवणूक लक्षात घेता त्याचे प्रगतिपत्रक शिक्षक याच कालावधीत तयार करतात. हा एप्रिल महिन्याचा काळ विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठी कसोटीचा काळ म्हणून ओळखला जातो. कारण, या प्रगतिपत्रकावरून विद्यार्थ्याला स्व-ची जाणिव होऊन पुढच्या वर्गासाठी त्याला स्वतःला तयार ठेवावे लागते तर शिक्षक या नात्याने प्रत्येक विद्यार्थ्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून ते पालकांच्या हातात सोपविण्याचे महत्वाचे काम शिक्षकांना करावे लागते. या दृष्टीकोनातून शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरतील अशा काही नोंदी इयत्ता १ ली ते ८ वीच्या वर्गासाठीच्या नोंदी याठिकाणी देण्याचा छोटासा प्रयत्न मी माझ्या मित्रांच्या सहकार्यातून देत आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी निश्चितच उपयुक्त अशा वर्णनात्मक नोंदी विषयवार पुढीलप्रमाणे.....