Wednesday, 15 April 2015

It's for your kind Information..!

" गावाचं नाव पुट्टमराजू कंद्रिगा... वस्ती जेमतेम ४०० लोकांची... रस्ता
नाही की शौचालय नाही... कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत...
अवघ्या चार महिन्यांपूर्वीचं हे चित्र. पण हेच गाव आज राष्ट्रीय चर्चेचा
केंद्रबिंदू बनलं आहे. कारण, अवघ्या चार महिन्यांत देशातील
महानगरांनाही हेवा वाटेल असा या गावाचा कायापालट झालाय
आणि यामागं आहे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व खासदार सचिन रमेश तेंडुलकर .
क्रिकेट जगतात स्वत:चं आगळंवेगळं स्थान निर्माण करणारा सचिन
राजकारणाच्या मैदानावरील इनिंगलाही वेगळ्या उंचीवर नेऊन
ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टमराजू कंद्रिगा
गावाचा चेहरामोहरा बदलून सचिननं याचा शुभारंभ केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सांसद आदर्श ग्राम योजने'ची घोषणा
केल्यानंतर अनेक खासदारांनी आपापल्या पसंती गावं दत्तक घेतली
होती. बहुतेक खासदारांनी हायप्रोफाइल गावांना प्राधान्य दिलं
होतं. सचिननं मात्र हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या पुट्टमराजू
कंद्रिगा गावाची निवड केली होती.
अन्य खासदारांच्या दत्तक गावांमध्ये अद्याप कामाला सुरुवातही
झालेली नसताना सचिननं स्थानिक प्रशासन, केंद्र सरकारकडं
पाठपुरावा करून पुट्टमराजू गावात चार महिन्यांच्या आतच
विकासाची गंगा आणली आहे. गावात सांडपाण्याच्या
निचऱ्यासाठी भूमिगत गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक
घरात २४ तास पाणी, वीज उपलब्ध करून देण्यात आलीय. खेळासाठी
खास मैदान बनविण्यात आलंय. काँक्रिटच्या रस्त्याबरोबरच
समाजमंदिर व सुसज्ज हॉस्पिटलही उभारण्यात आलं आहे. स्वत:च्या
खासदार निधीतून २.७९ कोटी खर्च करून तसेच केंद्र सरकारकडून ३ कोटी
रुपये मिळवून सचिननं या गावाचं रूपडंच बदलून टाकलं आहे.
गावावर विकासाच्या जादूची कांडी फिरल्यामुळं गावकरीही हरखून
गेले असून त्यांनी सचिनला धन्यवाद दिले आहेत. सचिननं घालून दिलेल्या
या आदर्शापासून अन्य खासदार काही बोध घेणार का, असा प्रश्न
आता विचारला जात आहे...! "