Sunday 10 April 2016

बदाम

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय  हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे.
•भिजवलेले बदाम का खावेत ?

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून  घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषणता मिळण्यास मदत होते.
 


भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे -:
1.गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ  करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर  स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात. म्हणूनच गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
2. भिजवलेले बदाम पचनशक्ती सुधारण्यास मदत करते
‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.
3. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते
रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील  ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70वयोगटातील पुरूंषांमध्ये  हा फरक प्रामुख्याने आढळून आला.
4. हृद्याचे कार्य सुधारते
जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.
5. शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते
आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळीअवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.  यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे.  बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !
6. वजन घटवण्यास मदत होते 
तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर आहात ? मग नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार  बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.  बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते. जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज !