Saturday 17 September 2016

मला आवडलेली कविता

  • विरामचिन्हांची कविता...   

    ( . ; ".." , : '..' [..] ? / {..} ! _ - | )

" वाक्य पूर्ण झाले
हसून सांगे पूर्णविराम.
दोन छोटया वाक्यांना
सहज जोडे अर्धविराम.
एका जातीच्या शब्दांमध्ये
येऊन बसे स्वल्पविराम.
वाक्याच्या शेवटी बोले
तपशिलात अपूर्णविराम.
प्रश्न पडतो तेव्हा
धावून येई प्रश्नचिन्ह.
भावनांच्या रसात बुडून
उभे राही उदगार चिन्ह.
शब्दावर जोर पाडी
अवतरणचिन्ह एकेरी
कुणी बोले तिथेच दिसे
अवतरणचिन्ह दुहेरी.
कुठे घ्यावा विराम हे
चिन्ह सांगे अचूक
चिन्हांच्या सोबतीने
वाक्य लिहू बिनचूक.
चिन्ह वगळून वाक्य कसे ओंगळवाणे दिसे.
चिन्हांमुळेच वाक्याचा
अर्थ मनी ठसे."
(...मातृभाषा सार्थ अभिमान...)