Wednesday, 16 September 2015

ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता

  • लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता सांगताहेत यशाचा नवाकोरा फॉम्यरुला..

एरवी हे सारं जर दुसरं कुणी सांगितलं असतं,
तर त्यावर सहजी विश्वास ठेवायला मन धजावलं नसतं!
पण जेव्हा ‘त्या’ तिघी हे सांगतात,
तेव्हा विश्वास ठेवा,
ते सारं खरंच असतं!
नव्हे ते खरंच असतं, म्हणून तर त्या तिघी यशाच्या शिखरावर पोहचूनही
तेच सांगत असतात की,
तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या उणिवा वाटतात,
त्याच गोष्टी तुमची ताकद बनू शकतात!
फक्त तुमची त्यांच्याकडे पाहायची नजर बदलायला हवी!
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या स्पर्धेत 
पहिल्या तीन क्रमांकावर बाजी मारणा:या त्या तिघी.
ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता.
त्या सांगतात,
कशाला हवं कोचिंग क्लासचं स्तोम?
कुणी सांगितलं की, मेट्रो शहरातल्या महागडय़ा क्लासेसला गेलं तरच
तुम्ही यूपीएससी क्रॅक करू शकता?
कोण म्हणतं की, इंग्रजीच यायला हवं?
बाकीच्या भारतीय भाषांचा हात सोडून फाडफाड इंग्रजी आलं तरच मुलाखतीत टिकता येतं?
कोण म्हणतं की, चोवीसपैकी पंचवीस तास अभ्यास केला आणि कोंडून घेतलं स्वत:ला तरच 
ही परीक्षा यशाचा दरवाजा दाखवते.?
हे सगळेच गैरसमज आहेत!
या सगळ्याला पुरून उरते ती एकच गोष्ट, ती म्हणजे आत्मविश्वास!
त्याच्या जोरावर स्वत:च्या भाषेत स्वत:चे विचार मांडण्याची
उत्तम हातोटी.
स्वत: अभ्यास करून कमावलेली मतं
आणि त्याला अनुभवाची जोड!
- एवढं असलं तरी आपण ही परीक्षा सहज क्रॅक करू शकतो!
आणि हे सारं तर आपल्याकडे असतंच,
पण त्याची आपण किंमत करत नाही.
उलट त्याला आपण कमतरता समजतो आणि भलत्याच गोष्टींच्या मागे धावतो!
हे धावणं आधी थांबवा. 
आणि शांतपणो विचारा स्वत:ला की,
हे सारं मी करतोय माझं ध्येयं काय?
त्याचं उत्तर तुमच्या जिद्दीला बळ देईल!
***
ते बळ मिळवण्यासाठी काय करायचं हेच सांगणा:या या तिघींच्या विशेष मुलाखती पान 4-5 वर!
लोकोमोटर डिसअॅबिलिटीनं अपंग असलेली ईरा, नुस्ती देशात पहिलीच आलेली नाही तर तिथं व्यवस्थेशी एक मोठी लढाई लढून हे सिद्ध केलंय की, कार्यक्षमतेवर जुनाट विचार मर्यादा नाही लादू शकत!
दुसरी रेणू, डॉक्टर झालेली, केरळातल्या छोटय़ा गावातली, मल्याळम भाषेवर प्रेम करणारी,
आपल्या भाषेचा हात न सोडता यश मिळवता येतं, हे ती सांगते तेव्हा कळते, भाषेला ताकद मानण्याचं एक सूत्र!
आणि तिसरी निधी. एकदा नाही पाचदा अटेम्प्ट करून तिनं जिद्दीनं यश खेचून आणलं. ती सांगते सतत प्रयत्नांतल्या सातत्याचं यश!
***
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर
या तिघींची तयारी एक समृद्ध, सकस दृष्टिकोन नक्की देईल.
आणि नसाल,
तर जिंकण्याची एक नवीन, पॉङिाटिव्ह गोष्ट 
मनात नक्की घर करेल!
त्या गोष्टीसाठी, पान उलटाच.
...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

मुलाखती आणि लेखन- राजानंद मोरे (राजानंद ‘लोकमत’च्या पुणे  आवृत्तीत उपसंपादक/बातमीदार)

No comments:

Post a Comment