Sunday, 3 May 2015

हसाल तर ध्येय गाठाल...!

  • हसत खेळत व्यक्तिमत्व विकासाचे धडे ….!

देव : काय पाहिजे तुला??
सुरेश : देवा देवा मला पैशाने भरलेली बॅग दे ...१ मोठी गाडी....आणि त्यामध्ये खूप साऱ्या सुंदर-सुंदर मुली...
.देव (विचार करून) : तथास्तू....
आणि आज सुरेश लेडीज स्पेशल बस मध्ये कंडाक्टर आहे.

(तात्पर्य काय : आपले ध्येय स्पष्ट शब्दात लिहून काढा व मांडा. तुम्हाला आयुष्यात नक्की काय हवे आहे ते आत्ताच ठरवा.) 
---------------------------------
एकदा अकबर ने बिरबल ला विचारले..
'असं काही तर सांग कि जे सुखात ऐकल्यानंतर वाईट वाटेल आणि दुःखात ऐकल कि चांगल वाटेल'

बिरबल उत्तरतो.. "हे दिवस निघुन जातील"
(तात्पर्य काय : ज्यांना हे एक वाक्य समजल त्यांनी आपलं आयुष्यच जिंकल...) ---------------------------------
एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.
वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
.ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात;
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..

(तात्पर्य काय : शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो.) ---------------------------------
१ मुलगा १ मुलीँवर खुप प्रेम करत असतो,
१ मुलगा १ मुलीँवर खुप प्रेम करत असतो, परंतु ते सांगायला तो घाबरत असतो..
१ दिवस तो तिला i luv u बोलायच ठरवतो ,
आणि देवाला प्रार्थना करुन सांगतो कि, मी तिला एकदाच आणि शेवटचा प्रप्रोज
करेल, प्लिझ तिच उत्तर हो असु दे....

त्या राञी तिला तो 'I LUV U' मॅसेज टायप करुन तीचा नंबर वर पाठवतो आणि झोपतो.
काहि वेळाने त्याचा मोबाईल वर मॅसेज टोन वाजते,
पण तो मॅसेज उद्या सकाळी उठून अंघोळ करुन देवाच दर्शन घेउन झाल्यावरच वाचेल अस ठरवितो आणि झोपुन जातो..
राञभर तो त्या मुलीचे स्वप्न बघतो ..सकाळी देवाचं दर्शन झाल्यावर तो मॅसेज वाचतो तर त्यात लिहल असत …

A/C balance is insufficient. Main bal is Rs. 0.08.
Msg can not be delievered. . . . ..

(तात्पर्य काय : ध्येयाचा नेहमी मागोवा घेत रहा. कुठे चुकले, कुठे काय राहिले हे पाहत राहा. नुसते स्वप्न पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करा व कृतीचा अपेक्षीत परिणाम मिळत नसेल तर त्वरित कृती बदला.)
------------------------------
---
एकदा एक मुलगा त्याच्या कॉलेजच्या वर्गातील एका मुलीवर खूप प्रेम करत असतो. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एके दिवशी तो हिम्मत करून तिला प्रपोज करतो. पण ती रागावते आणि त्याच्यावर डोळे वटारून निघून जाते.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षातील शेवटच्या आठवड्यात ती मुलगी त्याच्याकडून एक पुस्तक घेते आणि एक चिट्ठी लिहून त्यात ठेवते. त्यात लिहिलेले असते, "I Love You - मी पण तुझ्यावर प्रेम करते."
पण मुलगा ती चिठ्ठी पाहतच नाही. तो घाबरून त्या मुलीशी वर्षभर कधीच बोललेला नसतो व तसेच घाबरून शेवटच्या आठवड्यातही तो तिच्याशी बोलत नाही. कॉलेज संपल्यानंतर दोन वर्ष उलटतात. शेवटी ती मुलगी तिच्या लग्नाची पत्रिका त्याला कुरियरने पाठवते.
(तात्पर्य काय : पुस्तक नेहमी वाचत जावी. कमीतकमी वर्षातून एकदा तरी पुस्तके उघडून पहावीत.)
------------------------------
---
एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका वस्तीतून जाताना नळावरील चाललेल्या दोन मुलींचे भांडण ऐकतात.
पहिली मुलगी : माझी बादली भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी लंगड्या भिकार्याशी लावेल.
दुसरी मुलगी : नाही, माझी अगोदर भरू दे, नाहीतर तुझं लग्न मी आंधळ्या भिकार्याशी लावेल.
दोघे भिकारी : आम्ही थांबायचं की जायचं?

(तात्पर्य काय : Don't Lose Hope, Wait for the Better Prospect.)
------------------------------
---
एकदा एक Handsome मुलगा एका २५ मजली इमारतीवर जातो, खाली वाकून पहाताना पाय घसरून पडतो !! पडता पडता त्याला २० व्या मजल्यावर एक मुलगी पकडते - अन विचारते की हे Handsome माझ्याशी लग्न करशील का?

मुलगा नाही म्हणतो - मुलगी त्याचा हात सोडून देते ... मुलगा पुन्हा खाली पडतो ….१५ व्या मजल्यावर पुन्हा तेच घडते, तीही मुलगी हात सोडून देते.
१२ व्या मजल्यावर पुन्हा त्याला एक मुलगी पकडते अन काही बोलणार इतक्यात तो मुलगाच तीला म्हणतो, ‘मी तुझ्याशीच लग्न करीन, जन्म भर सेवा करीन’... पण ती विवाहित असते अन भलतंच काही घडू नये म्हंणून ती त्याचा हात सोडून देते.... अन तो खाली पडतो....
(तात्पर्य काय : संधी एकदा फारतर दोनदा दरवाजा ठोठावेल पण सारखी-सारखी नाही. तेव्हा मिळालेल्या पहिल्याच संधीचा फायदा घ्यायला शिका.)

No comments:

Post a Comment