Sunday, 5 April 2015

गोष्ट तंबाखूची....!



                                                                     तंबाखू मूळची भारतातली नाही. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात भारतात आणली आणि ते पीक इतकं फोफावलं की, तंबाखू उत्पादनात भारत तिसर्या क्रमांकावर आहे. जगात सर्वात जास्त तंबाखू निर्यात करणारा देश म्हणून अग्रस्थानी आहे.
                                                                    तंबाखूच्या शेतीला सर्वात सुरक्षित शेती मानली जातं. खतपाणी दिलं की ते पीक वाढतं आणि प्रचंड  नफा मिळवून देतं. त्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंबाखूच्या शेताला कुंपणाची अजिबात गरज नसते. ना जनावरं पीक खातात ना पक्षी तोंड लावतात. या पृथ्वीतलावर माणूस हा तंबाखू सेवन करणारा एकमेव सजीव प्राणी आहे. ( तंबाखू खाणं अपायकारक आहे हे जनावरांना समजतं ते सर्वात विकसित  झालेल्या माणसाच्या मेंदूला समजत नसावं हे  जगातलं आश्चर्य आहे. )  
                                                                    तंबाखूमध्ये सुमारे साडेचार हजार वेगवेगळी रसायनं असतात आणि बहुतांशी सर्व रसायनं शरीराच्या दृष्टीने त्रासदायक असतात. त्यातलं निकोटिन हे द्रव्य सर्वात घातक मानलं जातं. खरं तर ते विषंच! कारण त्याचा उपयोग प्रामुख्याने कीटकनाशक म्हणून केला जातो. तंबाखूच्या गाळातून निकोटिन सल्फेट नावाचं रसायन बनतं आणि ते रसायन अनेक कीटकनाशकांचा मोठा हिस्सा असतं.
                                                                  ही सारी माहिती मला अगदी नवीन होती; पण ही निकोटिनयुक्त तंबाखू शरीरावर कसकसा परिणाम घडवून आणते त्याबद्दल विशेष माहिती नव्हती. तेच समजून घ्यायला मी माधवसरांकडे गेलो. मुक्तांगणने प्रकाशित केलेली पुस्तिका मी चाळली आहे. पण, मला अजून काही प्रश्न आहेत असं सांगितल्यावर ते म्हणाले,‘ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. व्यसनी माणसे असतात ना त्यांना जास्त माहिती दिली तर त्या माहितीची चिरफाड करतात. आता निकोटिनचा वापर अल्झायमरसाठी  उपचार म्हणून होऊ शकतो असे काही त्यांना कळले तर मला अल्झायमर होऊ नये म्हणून मी तंबाखू खात राहीन असं तिरपं डोकं ते चालवू शकतात. म्हणून काही गोष्टी आम्ही आपणाहूनच सांगण्याचे टाळतो.’’ ‘‘ पण मला सांगाल न?’’ मी हसत विचारले. प्रश्नच नाही माझी निकोटिन विषयावर पीएचडी झाली आहे. फक्त अधिकृत पदवी मिळायची बाकी आहे आणि माझ्या पीएचडीला स्वत: वीस वर्षे निकोटिन वापरण्याचा जबरा अनुभव आहे.’’ डोळे मिचकावत त्यांनी एक स्माइल दिलं. ‘‘ त्याचं काय होतं निकोटिन लगेच रक्तात मिसळतं. आणि अँड्रेनल ग्रंथींना उत्तेजित करतं. त्यामुळे एपिनेफ्रीन या हार्मोन्सचं स्त्रवण करतं. एपिनेफ्रीन मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो. श्वासावर परिणाम होतो आणि हृदयाची धडधड वाढते.’’ ‘‘त्यातून निकोटिनची जी सवय होते, ती सुटता सुटत नाही. आणि म्हणून अनेकजण समजूनही या व्यसनातून बाहेर पडत नाही. पण, हे सारंच जीवघेणं आणि वेळीच बाहेर पडलं नाही, तर आयुष्याचा घात होणारच!’’ ते बोलत होते आणि मला माझ्या अवती-भोवती गुटखा-तंबाखू-मावा खाणारे तरुण चेहरे आठवत होते….! 
                                           मी वाचलेली ही तंबाखूची गोष्ट लोकमत ई-पेपर मधील oxigen पुरवणीतील आहे. वर्तमान स्थितीत या विषयावर चाललेली चर्चा पहाता प्रत्येक तरुण व्यक्तीपर्यंत जाण्याचा हा छोटासा प्रयत्न....
सहकार्य-आनंद पटवर्धन  ( मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे व ऑक्सीजन टीम लोकमत )

Friday, 3 April 2015

तरुणांबरोबर थोडे हितगुज



1)        जास्तीत-जास्त पुस्तकांचे वाचन करा.
जगात कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्तींकडून प्रेरणा घ्या,
त्यांच्या यशामुळे स्वतः भरकटून जाऊ नका.
2)        स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीच करू नका.
तशी केलेली तुलना तुम्हाला कधीच पुढे नेऊ शकत नाही.
त्यापेक्षा स्वतःची तुलना स्वतःशीच करा.
त्यामुळे प्रत्येक नवीन दिवसात एक नवीन बाब
किंवा गोष्ट तुमच्या ज्ञानात आणि कौशल्यात भरच टाकेल.
3)        जगात नावाजलेल्या व्यक्तींचे आत्मचरित्र वाचा.
त्यांची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक
परिस्थिती समजावून घ्या. कारण प्रत्येकाला वरील बाबी समान कधीच लाभत नाही.
4)        कोणतेही नवीन कार्य करण्याअगोदर आपल्यापेक्षा मोठ्या
व्यक्तींबरोबर त्याविषयी बोला. इतरांचे त्याबाबतचे मत विचारात घ्या.
त्यानंतरच तुमचे मन/बुद्धी जे ठरवेल त्याप्रमाणेच पुढच्या कार्याला सुरवात करा.
5) अन्य जाती-धर्मांवर टिका करत वेळ वाया घालवू नका.
    
जे चांगलं असेल त्या गोष्टी आत्मसात करा.
6) दंगली- मारामारी करुण आपलं नाव खराब करुण घेऊ नका.
    
आता लढाईचा काळ राहिलेला नाही.
7) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
   
तुमच्या पुढच्या पिढीला चांगलंजीवन देऊ शकतं.
8) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
   
गुलामी करू नका.
9) आजचा तरुण एकमेकांना मदत करुण प्रगती करू शकतो.
   
त्यासाठी राजकीय पक्षाची  वा नेत्याची गरज नाही.
10) मंदिरात दान करण्याऐवजी
   
गरीब आणि गरजू तरुणांना
   
मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी मदत करतीलच.
11) चार दिवस सुट्टी काढून देवस्थळी
    
फिरण्याऐवजी तेव्हडाच् वेळ समाजाच्या प्रगतीसाठी द्या
   
समाजही तुम्हाला कधीतरी मदत नक्कीच करेल.
12) इंग्लिश बोलायला शिका.
    
हा मराठीचा अपमान नाही  काळाची गरज  आहे.

Wednesday, 1 April 2015

पाणी..WATER..पानी

पाण्याचे  महत्व  ---
१)  शरीराचा  ७० %  भाग  पाण्याने  बनलेला  आहे.
२)  दिवसभरात  ३  ते  ३.५०  लिटर  पाणी  पिणे  आवश्यक  आहे.
३)  कोमट  पाणी  पिणे  फायद्याचे  आहे.
४)  सकाळी  अनोशापोटी  पाणी  पिणे  अमॄता  समान  आहे.
५)  रक्ताभिसरण  चांगले  होते.
६)  रक्त  पातळ  होते.
७)  बद्धकोष्ठता  नष्ट  होते.
८)  आळसपणा  कमी  होतो.
९)  डोक्यावरील  केस  गळत  नाहीत.
१०)  स्किनचे  प्राँब्लम्स  होत  नाहीत.
११)  तारूण्य  टिकून  राहते.
१२)  शरीर  आतून  स्वच्छ  होते.
१३)  किडनी  स्टोन  होत  नाहीत.
१४)  अन्नपचन  चांगले  होते.
१५)  मेंदूला  योग्य  प्रकारे  रक्त  पूरवठा  होतो.
#     आरोग्य  संदेश    #
पाणी  म्हणजेच  जीवन. आरोग्यासाठी  करा  सेवन.