Tuesday, 9 July 2019

घड्याळ प्रश्नावली


⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰

(१) १ मिनिटात सेकंद काटा पूर्ण गोल किती
      फेऱ्या मारतो  ?
(२) १ तासात सेकंद काटा पूर्ण गोल किती
      फेर्‍या मारतो  ?
(३) १ दिवसात सेकंद काटा पूर्ण गोल किती
     फेऱ्या मारतो  ?
(४) १ साध्या वर्षात सेकंद काटा पूर्ण गोल
      किती फेर्‍या मारतो  ?
(५) १ लिप वर्षात सेकंद काटा पूर्ण गोल
      किती फेऱ्या मारतो  ?
(६) १ तासात मिनिट काटा किती फेऱ्या
     पूर्ण मारतो  ?
(७) १ दिवसात मिनिट काटा किती फेऱ्या
     पूर्ण मारतो  ?
(८) १ साध्या वर्षांत मिनिट काटा किती
      फेऱ्या पूर्ण मारतो  ?
(९) १ लिप वर्षांत मिनिट काटा किती
       फेऱ्या पूर्ण मारतो  ?
(१०) तास काटा एका दिवसात किती गोल
       फेऱ्या मारतो  ?
(११) एका साध्या वर्षांत तास काटा किती
       गोल फेऱ्या मारतो  ?
(१२) एका लिप वर्षात तास काटा किती
        गोल फेऱ्या मारतो  ?
--------------------------------------------------
  उत्तरे -(१) १ फेरी , (२) ६० फेऱ्या,
   (३) १४४० फेऱ्या, (४) ५,२५,६०० फेऱ्या
   (५) ५,२७,०४० फेऱ्या, (६) १ फेरी,
   (७) २४ फेऱ्या, (८) ८७६० फेऱ्या
    (९) ८७८४ फेऱ्या, (१०) २ फेऱ्या
   (११) ७३० फेऱ्या, (१२) ७३२ फेऱ्या.

Saturday, 4 May 2019

परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके

पुस्तकाचे नाव      -        लेखकाचे नाव

*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत
*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
*आय डेअर - किरण बेदी
*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
*सनी डेज - सुनिल गावस्कर
*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील
*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
*वाट तुडविताना - उत्तम कांबळे
*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
*एकच प्याला - राम गणेश गडकरी
*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
*गिताई - विनोबा भावे
चल्या - लक्ष्मण गायकवाड
*उपरा - लक्ष्मण माने
*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
*भिजली वही - अरूण कोल्हटकर
*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
*श्यामची आई - साने गुरूजी
*धग - उध्दव शेळके
*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर
*गोतावळा, झोंबी - आनंद यादव
*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
*बलूतं - दया पवार
*बारोमास - सदानंद देशमुख
*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
*शाळा - मिलींद बोकील
*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
*मी कसा झालो - प्र.के.अत्रे
*मी कसा घडलो - आर.आर.पाटील
*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
*उनिकी - सी. विद्यासागर राव
*मुकुंदराज - विवेक सिंधू
*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास
*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले
*गीतारहस्य - लोकमान्य टिळक
*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे
*फकिरा - अण्णाभाऊ साठे
*रामायण - वाल्मीकी
*मेघदूत - कालीदास
*पंचतंत्र - विष्णू शर्मा
*मालगुडी डेज - आर.के.नारायण
*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
*महाभारत - महर्षी व्यास
*अर्थशास्त्र - कौटील्य
*अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.
*गाईड - आर.के.नारायण
*हॅम्लेट - शेक्सपिअर
*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे
*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
*शतपत्रे - भाऊ महाजन
*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर
*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
*स्पीड पोस्ट - शोभा डे
*पितृऋण - सुधा मूर्ती
*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे
*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
*लज्जा - तस्लीमा नसरीन
*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
*राघव वेळ - नामदेव कांबळे
*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर
*गोईन - राणी बंग
*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग

Monday, 22 April 2019

Food related words

TEXTURES
Texture is the way a food feels when you touch it or eat it.

1. Creamy
Creamy foods are smooth, soft and thick. 

2. Crumbly
Crumbly describes food that falls apart into small pieces when you eat or break it.

3. Crunchy
Crunchy foods have a hard texture and make a loud sound when chewed.

4. Greasy
Greasy foods taste very much of oil, and usually leave oil behind.

5. Gooey
Gooey describes foods that are wet and sticky, often in a positive way.

7. Moist
Moist describes foods that are slightly wet and soft.
 
8. ​Mushy
Mushy also describes foods that are soft and wet, but usually it is used for food that is not meant to be soft. 

​FLAVORS
Flavors​ / Flavours​ are the particular tastes of a food.

1. Sweet
Sweet foods have a sugary flavor, such as cake, ice cream, chocolate, lollipops and mangoes.

2. Salty
Salty is used to describe food that tastes too much of salt. It is usually used as a negative description.

3. Bitter
Bitter describes a strong and sometimes unpleasant flavor that is the opposite of sweet.

4. Tart
Tart describes a sharp and acidic taste. Sour can also be used, but it often has a negative meaning.

5. Smoky
Smoky describes foods that taste of smoked wood.

6. Rancid
Rancid describes the taste of food that has a strong or unpleasant smell or taste because it is no longer fresh.

7. Spicy/hot
Spicy is the taste that makes one's mouth burn from strong chilies.

Friday, 15 March 2019

*कसे करावे ओम् उच्चारण?*

                                      *"ओम् उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे.*  रोज फक्त पाच मिनिटे ओम् उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात.

 *कसे करावे ओम् उच्चारण?*
                               ओम् उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोजिशनमध्ये बसा. डोळे बंद करुन दिर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम् उच्चारण करत हळुहळू श्वास सोडा. या काळात पुर्ण शरीरात व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. जर ओम् उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल.

------------------------------------------------------
*ओम् कार जपाचे महत्व आणि परिणाम :*
------------------------------------------------------

    १)मानवी मनाची शुद्धता करणे.
    २)मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करणे.
    ३)मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढविणे, तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढविणे.
    ४)शारीरिक दृष्ट्या, मानसिकरीत्या आराम वाटणे, तसेच भाव भावनांवर नियंत्रण आणणे.
    ५)ओम् कर जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होवून, ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे           मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते.

        *ओम् कर जप :*
         ओ SSSSSS म् …......  
         ओ SSSSSS म्….....…  
         ओ SSSSSSS म्……......
                       (ओ.... म्हणताना श्वास आत घ्यावा व म.... म्हणताना श्वास बाहेर सोडावा.)
----------------------------------------------------------------------
*ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण*
----------------------------------------------------------------------
   
                                        हिंदू धर्मात ओंकाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारात ओंकार नसल्यास मंत्र अपू्र्ण वाटतात.  परंतु धार्मिक महत्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. 

*तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.*

*१. थायरॉईड -*
 ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. 

*२. अस्वस्थता -*
 तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून पाच वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. 

*३. तणाव -*
 यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्झिन्स) दूर होतात.

*४. रक्तप्रवाह -*
 यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 

*५. पचन -*
 ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. 

*६. स्फूर्ती -*
 ओंकारामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. 

*७. थकवा -*
 थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. 

*८. झोप -*
 ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसांतच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे. 

*९. फुफ्फुस -*
 ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. 

*१०. पाठीचा कणा -*
 ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात.

Thursday, 7 February 2019

पायी चालण्याचे हे फायदे

                                        मंचर येथील  सुप्रसिद्ध डाँक्टर *डाँ धायबर* यांनी दिलेली महत्वपूर्ण माहिती, *पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!* चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जातो। अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते.  वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 
                                        हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. शोधकर्ते म्हणाले की, चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 

*वेगाने चालण्याचे फायदे -*
*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 
*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
*8)*  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
*10)*  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
*13)*  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
*14)*  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
*16)*  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.
*17)*  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
*18)*  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
*22)*  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
*23)*  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
*24)*  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
*25)*  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
*27)*  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
*28)*  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
*29)*  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

Sunday, 27 January 2019

*आर्थिक नियोजन*

योग्यप्रकारे *आर्थिक नियोजन* कसे कराल...???

Proper *Financial Planning*,

1. आपल्या महिन्याच्या एकूण इनकम पैकी जास्तीजास्त *30%* च रक्कम ही *घरखर्चासाठी* वापरली गेली पाहिजे.

2) *30%* रक्कम ही बँक *कर्ज, देणी* ई. साठी .

3) *30%* रक्कम ही *भविष्य नियोजनासाठी* बचत केली पाहिजे.

4) आणि उरलेले फक्त *10%* रक्कम ही आपल्या *मनोरंजनासाठी* वापरली जायला हवी.

5) कमीतकमी पुढील *6 महिन्यांचा* घर-ऑफिस *खर्चाची तरतूद* अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर *6 महिने* पुढील सोय होईस्तोपर्यंत आपले खर्च चालतील.

6) सेकंड *होम* ही *इन्व्हेस्टमेंट नाही*.सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च , आणि  वाढती महागाई वगळून जास्तीजास्त 5% फायदा करून देऊ शकते.

7) *45* वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर *असू नयेत*. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचो *प्लॅनिंग*  आपल्या *30* वयापासूनच व्हायला हवेत.

8) बँकेत *पती-पत्नीचे जॉईंट* अकौंट असणे अनिर्वार्य आहे.

9) आपली *प्रॉपर्टी* ही पती-पत्नी *दोघांच्या नावे* हवी, कारण as per legal act पती च्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले.

10) प्रत्येकाचा *इन्शुरन्स असणे गरजेचे* आहे.

11) *टर्म इन्शुरन्स* असणे ही *गरजेचे* आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते.

12) कुठलेही *इन्व्हेस्टमेंट* चे निर्णय हे *भावनिक* दृष्टिकोनातून घेऊ नये.

13) *मेडिक्लेम* हा *अत्यन्त गरजेचा* आहे.

14) जर *बँकेत* चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर *फक्त 1 लाख* पर्यन्त रक्कम बँक *रिटर्न* म्हणून देऊ शकते.
उरलेले नुकसान आपले असते.

15) तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य इन्व्हेस्टमेंट करून टॅक्स कमी करू शकतात.तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात. सर्वात मोठा फायदा म्हणजे लोन,  हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते.

16) सर्व *फायनेन्शियल कागदपत्रे* ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. 
जेणेकरून तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे फेमिली मेम्बर्स ते योग्यप्रकारे वापरु शकतील.

17) आपला *प्रोग्रेस ग्राफ* दर सहा महिन्यांनी चेक करा.  कारण , त्या ग्राफ प्रमाणे आपली इनवेसेन्टमेंट, व्यवसाय निर्णय बदलता येतात.

*वाचा*, विचार करा व *पुन्हा वाचा*. व आता *निर्णय घ्या*.
दिवसा मागुन दिवस, वर्षा मागुन वर्ष  निर्णयाशिवाय कसे निघुन जातात हे कळत नाही... .

आजच *वरिल १७* मुद्द्यांवर आधारीत उज्वल व सुरक्षित भविष्यासाठी योग्य नियोजन करा...!
 आपल्या उत्तम भविष्यासाठी आर्थिक नियोजन करून देण्यात येईल. ( संकलन )

Friday, 21 September 2018

एक समाधान देणारा प्रवास


                                         महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पूर्व विदर्भातील जिल्हा भेटींचा कार्यक्रम संपवून परतीच्या प्रवासात   गोंदिया ते नागपूर दरम्यान रेल्वेत सहा महाविद्यालयीन तरुणी भेटल्या. चेहरे आणि पेहराव यावरून सर्वच जणी सुखवस्तू घरातल्या दिसत होत्या. आजूबाजूच्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करत तरुणाई आणि मैत्रीत रमेलेल्या. चांगल्या अर्थाने बिनधास्त. चार जणींच्या सीटवर पाच मैत्रीणी बसून सहाव्याला स्पष्ट नकार देणाऱ्या. मोठ्या प्रवाशी बॅग घेऊन कुठेतरी दुरच्या प्रवासाला. पालकांनी शिक्षकांचे नंबर मागितल्यावर प्राध्यापक म्हणून मित्राचे नंबर बिनधास्त पणे देणाऱ्या. केस विस्कटू नयेत म्हणून गरमी सहन करतही खिडकी बंद ठेवणार्‍या. 
                            थोडा वेळ गेल्यावर मी स्वतःहून त्यांच्या मनमौजी चर्चेत हस्तक्षेप करत बोलायला सुरवात केली. (त्या हिंदीत बोलत होत्या म्हणून मी सुरवात हिंदीत केली आणि पुढे त्यांना मराठी समजतंय म्हंटल्यावर पुढे मराठीतच बोलू लागलो. इथे सर्व संवाद मराठीतच आणि माझ्या भाषेत लिहीत आहे.) 

मी: Hi, काय शिकता तुम्ही ?
एक: एम. बी. बी. एस. 
मी:  कोणत्या वर्गात आहात ?
एक: दुसऱ्या... 
मी: आता कुठे चाललाय? 
दोन: कॉलेजच्या 'इव्हेंट' साठी टीमसोबत दिल्लीला चाललोय आणि तिथून पंधरा दिवस उत्तर भारत सफर करणार.
मी: मी तुमच्याशी बोलू शकतो ना?
सर्वजणी: हो बोला ना अंकल. (हल्ली महाविद्यालयीन युवा मला 'अंकल किंवा काका'च  म्हणतात. मीही ते स्वीकारलंय!)
मी: आम्ही महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत. तुम्ही या संघटनेचं नाव याआधी ऐकलंय? 
सर्वांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह ....
मी:  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं नाव ऐकलंय?
दोन: हो, ते superstition निरोध काहीतरी करत होते ना?
मी:  हो, तेच ...
तीन: आणि त्यांचा murder झाला ...
मी: बरोबर. आता तुम्ही जशा गप्पा मारताय तशा कधी दाभोलकर किंवा अंधश्रद्धा या विषयी बोललाय?
सर्वजणी:  नाही.
 मी: ठीक आहे. तुमच्या गप्पांत अडथळा ठरणार नसतील तर आता या विषयावर आपण काही बोलूया. 
काहीजणी: हो ...
मी: आज एकविसाव्या शतकातही आपल्या समाजात अंधश्रद्धा आहेत का?
चार: हो, आहेत ना!
 मी: मग अंधश्रद्धा असणं चांगली गोष्ट आहे की वाईट?
सर्वजणी: वाईटच ! 
मी: मग दाभोलकर चांगले काम करत होते की वाईट?
सर्वजणी: अर्थातच चांगलं.
मी:  मग त्यांचा खून झाला हे चांगलं झालं की वाईट?
सर्वजणी:  वाईट!
मी: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती देवाला विरोध करते असं तुम्हाला वाटतंय का?
पाच: नाही, कारण देव आणि अंधश्रद्धा या वेगळ्या गोष्टी आहेत. (सुरवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांना अंनिस विषयी काहीही माहिती नव्हतं.)
 मी:  बरोबर. आणि आपल्या संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकाला धर्म आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे तुम्ही चुकीच्या परंपरांची चिकित्सा करू शकता पण उपासनेवर बंदी नाही घालू शकत.
सर्वजणी:....
मी: तुम्ही 'युग मेश्राम' हे नाव ऐकलंय?
सहा:  नाही ...
मी: तुमच्या जवळच्याच चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी त्याचा नरबळी देण्यात आला!
एक: नरबळी? Means?
मी: नरबळी म्हणजे गुप्तधन किंवा काही तांत्रिक शक्ती प्राप्त करण्यासाठी किंवा एखाद संकट दूर करण्यासाठी देवाला दिलेला मानवाचा बळी!
दोन: काय? मानवाचा बळी?
मी: हो मानवाचा बळी! (मनात म्हंटले आणि मानवतेचाही!) 
तीन:  पण असं आता कुठे घडतंय?
मी: हो, हे आजही घडतंय. अगदी मुंबई पासून नागपूर पर्यंत आणि नंदूरबार पासून नांदेडपर्यंत कुठेही घडू शकतं!
सर्वजणी:  Oh! we don't believe it!    
मी:  तरीही हे वास्तव आहे. मी मघाशी म्हंटलेल्या युग चा गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्यात आला. आणि तुम्ही ज्या यवतमाळ मध्ये एम बी बी एस शिकताय त्याच जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी सपना नावाच्या एका सहा वर्षाच्या मुलीचा नरबळी दिला होता.
सहा:  It's really shocking!
मी: एका महिलेच्या अंगात आलेल्या देवीच्या सांगण्यावरून गावावरचं संकट दूर करण्यासाठी सपनाचा मामा, आजोबा यांच्या उपस्थितीत तिचा नरबळी दिला होता. एवढंच नाही तर देवीलातिच्या रक्ताचा नैवेद्यही दाखवला होता. आणि अमानुषतेची हद्द म्हणजे सपनाचे रक्त प्रसाद म्हणून तिथल्या उपस्थितांनी प्राशन केले होते. 
पाच: It's horrible! कुणी असं कसं करू शकतं?
मी: हे भयानक आहे हे खरं आहे. तरीही हे आपल्या समाजात घडतं आहे.
सर्वजणी: .....
मी: आता तुमच्याशी संबंधित आणखी एक उदाहरण पाहूया!
शनि शिंगणापूर माहिती आहे?
एक: नाही.
मी:  महाराष्ट्रात दोन तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात महिलांना मंदीरात प्रवेश मिळवून देण्यासाठी आंदोलन झालं होतं. आठवतंय?
मी: हो, कुठेतरी मंदिरात महिलांना प्रवेश मिळत नाही म्हणून कोण तर lady आंदोलन करत होती. News पाहिलीय मी!
मी: शनि शिंगणापूरच्या शनि मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश दिला जात नव्हता! का ते माहिती आहे?
सहा: नाही.
मी:  कारण स्त्रियांना अपवित्र मानलं जातं.
सर्वजणी: ....
मी: स्त्री का अपवित्र मानली जाते माहिती आहे?
तीन: का?
मी: तिला मासिक पाळी येते म्हणून. मासिक पाळी मुळं स्त्रीला अपवित्र मानणं योग्य आहे का?
दोन:  अजिबात नाही!
मी: बरोबर आहे. मासिक पाळी किंवा कोणत्याही कारणावरून स्त्रीला अपवित्र समजता कामा नये. तुम्ही मासिक पाळीच्या काळात घरातील देवघरात जाता का?
(यावर सर्वजणी एकमेकीकडे पाहत नकारात्मक माना हलवू लागल्या. आपण शब्दांत सापडलो याची जाणीव होऊन दोघी तिघींनी हलकेच जीभ चावली.)  
मी: मासिक पाळीच्या काळात तुम्ही देवघरात का जात नाही?
सर्वजणी: ....
मी: तुम्ही त्या काळात स्वतःला अपवित्र समजता?
सर्वजणी: .....
मी: असं तुम्हाला वाटत नसलं तरीही ते असंच आहे.
(यावर त्या खोटं खोटं हसल्यासारखं करू लागल्या.)   
मी: तुम्ही वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनी आहात. उद्या कधीतरी डॉक्टर होणार आहात. तरीही मासिक पाळीविषयी किंवा त्यामुळे स्त्रीला दिल्या जाणाऱ्या दुय्यमत्वाविषयी कधी विचारच केला नाही. हे गंभीर नाही का?
सर्वजणी: .....
मी: मला सांगा उद्या तुम्ही डॉक्टर म्हणून काम करू लागल्यावर एखादी पालक त्यांच्या सतरा, अठरा वर्षांच्या मुलीला मासिक पाळी येत नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आल्या तर तुम्ही काय सांगाल? पाळी येत नाही ही चांगली गोष्ट आहे म्हणाल की काहीतरी दोष आहे म्हणाल?
सर्वजणी: ... 
पाच: काहीतरी problem आहे आपण तपासण्या करुया म्हणून सांगू.
मी: आणि समजा कोणत्याच स्त्रीला पाळी आली नाही तर काय होईल?
(आता हा प्रश्नच त्यांना अनपेक्षित होता. यावर काय उत्तर द्यावं हेच समजेना.)
मी: स्त्रीला मासिक पाळी आली नाही तर ती बाळाला जन्मच देऊ शकणार नाही ना?
तीन:  हो, बरोबर.
मी:  मग मानव वंश पुढे चालेल का?
चार:  कसं शक्य आहे?
मी: म्हणजे मासिक पाळीवरून पवित्र अपवित्रता ठरवायची झाली तर स्त्री अपवित्र ठरेल की पवित्र?
(आता त्यांचा चेहरा खुलला. )
सर्वजणी: अर्थात पवित्रत ठरेल!
मी:  म्हणजे मासिक पाळीपण पवित्रच. बरोबर.
सर्वजणी:  होय.
मी: मग दिल्लीहून आल्यावर मासिक पाळीच्या काळात तुम्ही देवघरात जाल?
(ही त्यांच्यासाठी आणखी एक गुगली होती. त्यावर पुन्हा एकदा त्या संभ्रमात दिसल्या)
मी: यावर आताच उत्तर देऊ नका पण विचार तर कराल की नाही?
सहा:  हो, नक्की विचार करू.
मी: आता आणखी एक उदाहरण घेऊ.
तुम्हाला ऐश्वर्या रॉय माहिती आहे?
एक:  म्हणजे काय?
मी: तिचे पहिले लग्न कुणाबरोबर झालंय?
दोन: विवेक ओबेरॉय?
मी:  नाही ...
तीन: अगं तिचं एकच लग्न झालंय! अभिषेक बच्चन बरोबर.
मी: नाही अभिषेकरावांपूर्वी तिचं आणखी एक लग्न झालंय. अगदी अमिताभ आजोबा, जया आजीबाई आणि अभिषेकरावांच्या संमतीने! 
(सर्वजणी थक्क! )
मी: ऐश्वर्याताईचं पहिलं लग्न एका झाडाबरोबर झालंय?
सर्वजणी:  ऑ?
मी: होय तिला मंगळ होता म्हणून लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या पहिल्या पतीचं निधन होणार होतं. यावर उपाय म्हणून ज्योतिषाचार्यांनी तिला पिंपळाच्या झाडाबरोबर पहिलं लग्न करण्याचा सल्ला दिला. बच्चन आणि रॉय परिवाराने तो तंतोतंत अंमलात आणला. आपल्या मिडियाने तो देशाला दाखवला देखील.
या पहिल्या लग्नानंतर घटस्फोट न देताच ऐश्वर्याताईंनी अभिषेकरावांशी दुसरे लग्न केले. खरं म्हणजे हा गुन्हा आहे.
(यावर त्या हसू लागल्या)    
आणि त्या झाडाचं पुढं काय झालं हे मात्र मिडियाने दाखवलं नाही. (मुलींचा हसण्याचा आवाज आणखी वाढला.
मी: मी कशा विषयी बोलतोय हे तुम्हाला कळलं असेल.
पाच:  हो, astrology विषयी.
सहा: पण astrology हे तर science आहे म्हणतात ना? त्याचा superstition शी काय संबंध? 
मी: या astrology चा base काय आहे तुम्हाला माहिती आहे?
तीन:  जन्म पत्रिका ?
मी: बरोबर. यात काय लिहिलेलं असतं माहिती आहे?
तीन:  नाही.
मी: त्यामध्ये काही तिरक्या रेघा मारलेल्या असतात. त्यामुळे बनलेल्या चौकोनात काही अंक आणि अक्षरे लिहिलेली असतात.
यापैकी अक्षरे म्हणजे आपल्या ग्रहमालेतील ग्रहांच्या नावांची आद्याक्षरे असतात.
जसे - र म्हणजे रवी, म्हणजे सूर्य.
एक: पण तो तर तारा आहे...
मी: बरोबर. चं म्हणजे चंद्र.
पाच:  आणि  satellite आहे.
मी: आपण मराठीत त्याला उपग्रह म्हणतो. रा म्हणजे राहू.
चार: माझ्या माहितीनुसार असा कोणताच ग्रह नाही.
मी: आणि के म्हणजे केतू.
सहा:  असाही कोणता ग्रह नाही.
मी: आता मला सांगा ज्याच्या गृहितकांपैकी जवळ जवळ अर्ध्या बाबी चुकीच्या आहेत असा कोणता विषय विज्ञान असू शकेल का?
सर्वजणी: ....
मी: आपण थोडं पुढे जाऊ.
मला सांगा आपली जन्म पत्रिका कशाच्या आधारावर बनवली जाते माहिती आहे का?
सहा: जन्मवेळेच्या ना?
मी:  बरोबर. आता भावी डॉक्टर म्हणून मला सांगा बाळाच्या जन्माची नेमकी वेळ कोणती?
दोन: म्हणजे?
मी: म्हणजे स्त्री आणि पुरुषाचे लैंगिक संबंध आल्यावर कधीतरी स्त्री बीज आणि पुरुष बीज यांचे मिलन होते त्याक्षणी नवा जीव जन्माला येण्याची प्रक्रिया सुरू होते. याला जन्म वेळ म्हणता येईल की नाही.
दोन:  खरंतर म्हणायला पाहिजे.
मी: अगदी सुक्ष्म असणारे ते भ्रूण पुढे काही दिसण्यायोग्य आकार धारण करतं. यालाही जन्म म्हणता येईल का?
दोन: नाही शंका आहे.
मी: अगदी आई बाळाला जन्म देताना एका क्षणात शरीरातून बाहेर टाकते का?
तीन: नाही त्या बराच वेळ लागतो.
मी: मग बाळाचा एखादा अवयव शरीरातून बाहेर येतो त्याला जन्मवेळ म्हणायची की पूर्ण बाळ बाहेर आल्यावर? की बाळाची नाळ कापून बाळाला संपूर्ण वेगळं केल्यावर?
चार: नाळ कापली जाते ती वेळ.
मी: पण प्रत्यक्षात जीव म्हणून ते काही महिने आधीच जन्माला आलंय.
इतर: होय, हेही बरोबर आहे.
मी: म्हणजे बाळाच्या जन्माची नेमकी वेळ ठरवणे कठीण आहे.
सर्वजणी: होय, बरोबर आहे तुमचं.
मी: आणि ऑपरेट करून नैसर्गिक जन्मवेळ टाळून डॉक्टरच ती ठरवतात.
(सर्वजणी हसू लागतात.)  
मी: आता अजून पुढे जाऊ.
मला सांगा, एखाद्या रुग्णालयात अगदी एकाच ऑपरेशन टेबल एखाद्या उद्योगपतीची मुलगी, एखादी झोपडपट्टीतील मुलगी आणि तुमच्या, माझ्यासारख्या घरातील एखादी मुलगी बाळंतपणासाठी ठेवल्या. अगदी ठरवून ऑपरेट करून एकाच वेळी बाळाला जन्म दिला तर त्या तिन्ही बाळांचं भविष्य एकच असेल का?
सर्वजणी: नाही.
मी: आता सर्वात महत्वाच्या मुद्यावर बोलू.
(सर्वजणी थोड्या सावरून बसल्या. )
मी: फलज्योतिषाचं आणि या ज्योतिषाचार्यांचं म्हणणं आहे की अवकाशातील खगोल, आणि त्यांची स्थिती यांचा मानवी जीवनावर इष्ट अनिष्ट परिणाम होत असतो. बरोबर?
चार:  बरोबर.
मी:  मला सांगा हे जे ग्रह आहेत ते सजीव आहेत की निर्जीव?
एक: निर्जीव.
मी:  मग कोणतीही निर्जीव वस्तू कोणत्याही सजीवावर आपोआप काहीतरी परिणाम करू शकते का? उदा. खिडकीतून बाहेर दिसतो तो दगड कोणत्याही सजीवावर आपोआप काही परिणाम करील का?    
दोन:  नाही.
मी:  क्षणभर हे ग्रह परिणाम करतात असे मानले तरी ते फक्त मानवावरच परिणाम करतील की सर्व सजीवांवर करतील.
तीन: तसं असेल तर त्यांचा परिणाम सर्व सजीवांवर व्हायला पाहिजे.
मी: आणि फक्त मानवावर होत असेल तर विशिष्ट धर्मातील व्यक्तींवरच होईल की सर्वांवर होईल!
चार:  सर्वांवर व्हायला पाहिजे.
मी: पण आपल्या समाजात तसं दिसतं का?
पाच:  नाही.
मी: आणि अजूनही समजा ग्रहांचा हा परिणाम विशिष्ट धर्मातील लोकांवरच होत असेल तरीही तो कमी जास्त करण्यासाठी त्या ग्रहांनी पृथ्वीवर विशेषतः आपल्या देशात काही प्रतिनिधी नेमलेत का?
(सर्वजणी हसू लागल्या.) 
मी:  आतापर्यंत केलेल्या सर्व चर्चेचा अर्थ एवढाच की फल ज्योतिष हे पूर्णपणे थोतांड आहे.
सर्वजणी : ...
मी: अजून एक, कुण्या मोठ्या संशोधकाने शोधलेला विज्ञानाचा एखादा नियम त्याच्या नंतर दुसऱ्या संशोधकाने सर्व नियम पाळून खोटा ठरवला तर त्या दुसऱ्या संशोधकाला काय शिक्षा केली जाते?
चार: शिक्षा कशी केली जाईल. उलट त्याचा गौरव केला जाईल. कदाचित नोबेल पण दिलं जाईल.
मी: आणि जोतिषी अभिमानाने काय सांगतात? आमचं शास्त्र शेकडो, हजारो वर्षे जुनं आहे. आणि अपरिवर्तनीय आहे.
आता तुम्ही डॉक्टर लोक एखाद्या आजारावर पंचवीस तीस वर्षांपूर्वीचे औषध द्याल का?
सर्वजणी: नाही.
मी: हे जसं औषधांचं आहे तसंच आपला पेहराव, अन्न, घर, वाहने सर्वांबाबत आहे. मग शेकडो वर्षापासून अजिबात बदल न झालेली गोष्ट विज्ञान कशी असू शकेल?           
मी: मी असं म्हणत नाही की मी म्हणतो म्हणून तुम्ही मान्य करा. पण जे विज्ञान आणि त्याची तत्वं वापरून तुम्ही रुग्णांना बरं करणार आहात तीच तत्वं या फल ज्योतिषालाही लावा. यातून जे सत्य येईल ते मान्य करा. 
सर्वजणी: हो, नक्की. अंकल ...(पुन्हा अंकल. पण मी हा शब्द स्वीकारलाय. अहो हसू नका खरंच स्वीकारलाय.) 
मी: माफ करा. तुमचा मजेत चाललेला प्रवास मी boring केला का?
चार, पाच: नाही, नाही अंकल. उलट आम्हाला काही नवीन माहिती मिळाली.
मी: मग आणखी थोडं बोलूया?
सर्वजणी:  हो, बोला ना अंकल.
मी: तुम्ही विवेकवाहिनी विषयी काही ऐकलंय का?
एक: नाही. काय आहे हे?
मी: "विवेकी विचारांच्या आधारे स्वतःचा आणि समाजाचा विधायक आणि कृतीशील विकास करू इच्छिणार्‍या तरुण तरुणी प्राध्यापक आणि प्राचार्य यांचे संघटन म्हणजे विवेकवाहिनी!"
एक: म्हणजे नेमकं काय समजलं नाही.
मी: तुम्हाला आपल्या समाजात काही समस्या, दोष, उणीवा, व्यंग दिसतं का?
तीन: आहेत ना! अनेक आहेत.
मी: काही उदाहरणे सांगा पाहू.
एक: मुली आणि स्त्रियांची असुरक्षीतता 
दोन: भ्रष्टाचार 
तीन: कौटुंबिक हिंसाचार
चार:  शेतकरी आत्महत्या
पाच:  महागाई
सहा: जातीभेद
मी: मी बरोबर अशा अनेक समस्या सांगता येतील. त्यात बदल व्हावा असं वाटतं का?
चार:  हो, वाटतं ना!  
मी: मग हा बदल कोण करील?
एक:  सरकार.
मी: पण कोणत्याही सरकार कडून असं काही होताना दिसतंय का?
तीन: काही प्रमाणात होतंय काही प्रमाणात नाही.
मी: बरोबर. नागरिक म्हणून, युवा म्हणून यात काही करू शकतो की नाही?
चार:  करू शकतो, पण अभ्यास करीअर यातून वेळ कुठे मिळतो?
मी: मग या विषयांवर तुम्ही बोलतच नाही का?
पाच:  आमच्या friend circle मध्ये बोलतो ना!
मी: मग हे friend circle थोडं मोठं केलं, त्यात एखाद्या समाजाभिमुख प्राध्यापकांना सहभागी करून घेतलं, अशा महत्वाच्या विषयांवर बोलायचा आठवड्यातील एक वार, वेळ आणि ठिकाण ठरवलं आणि अंमल सुरू केला की झाली विवेकवाहिनी!
सहा:  पण केवळ कॉलेज मध्ये बोलून प्रश्न थोडेच सुटणार आहेत?
मी: बरोबर आहे. केवळ बोलून प्रश्न सुटणार नाहीत पण विषयाचे गांभीर्य काय आहे हे तरी लक्षात येईल. त्यातून किमान छोट्या पातळीवर प्रश्न सोडवण्यासाठी काही पर्याय तरी शोधता येतील. इतरांनी आधीच शोधलेले काही पर्याय समजतील. त्यापैकी काही सोपे मार्ग सामुहिकपणे कृतीत आणता येतील. प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी छोटी का होईना पण कृती केल्याचे समाधान तरी मिळेल.
(हे ऐकताना सर्वजणींचे काहीसे गंभीर झाले. आपणही हे करू शकतो हा विश्वास चेहर्‍यावर दिसू लागला.)
एक: खरं अंकल. आम्ही कधी असा विचारच केला नव्हता. आम्ही हा प्रयत्न नक्की करू.
मी: आपण विवेकवाहिनी विषयी बोलतो आहोत आणि तुम्हाला आवडतं आहे तर आणखी काही सांगतो. सांगू ना?
दोन: हो सांगा ना ...
मी: महाराष्ट्र विवेकवाहिनी दोन विचार पायाभूत मानून काम करते. 
पहिला म्हणजे - "आपला विकास आपल्या हाती, हक्क हवेत पण कर्तव्य आधी."  
थोडक्यात सांगायचं तर, तुमचा माझा विकास करायला कुणी अवतारी पुरुष किंवा स्त्री येणार नाही. आपले काही महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण शासन आणि प्रशासन ही व्यवस्था निर्माण केली आहे हे खरं पण ती सक्रिय करण्यासाठी सुध्दा आपल्याला जागरूक आणि कृतीशील रहावं लागतं. माणूस म्हणून आपल्याला जन्मजात मिळालेले आणि नागरिक म्हणून संविधानाने दिलेले हक्क आपल्याला हवेच आहेत पण केवळ हक्कांची भाषा न करता आपली कर्तव्यंही आपण पार पाडली पाहिजेत. आपण आपली कर्तव्यं करत राहिल्यानेही अनेकांना त्यांचे अधिकार मिळत राहणार आहेत.
आम्ही करतो त्या कामाविषयीचंच कर्तव्य सांगायचं तर संविधानात कलम 51 A मध्ये सांगितलेल्या कर्तव्यातील आठवं कर्तव्य आहे - मानवतावाद, शोधक बुद्धी आणि वैज्ञानिक मनोभावाची यांचा अंगिकार करणे निर्मिती हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. 
हे एक कर्तव्य आपण अंगिकारले तर अंधश्रद्धेतून स्वतःच्या आणि इतरांच्या होणाऱ्या शोषणाला आपोआप आळा बसणार आहे. आणि शोषणमुक्त आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळणार आहे. 
चार: खरं आहे अंकल.
मी: आपण स्वतःला एकविसाव्या शतकातील प्रगत मानव म्हणवतो, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने दिलेली सर्व उपकरणं वापरतो आणि दुसरीकडे विचार मात्र शेकडो वर्षांपूर्वीचे बाळगतो. डॉ नरेंद्र दाभोलकर म्हणायचे आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही. विज्ञानाची करणी घेतली पण विचारसरणी घेतली नाही.
हे संविधानाने सांगितलेल्या एका कर्तव्याविषयी झालं. संविधानात अशी एकूण अकरा कर्तव्यंसांगितली आहेत. त्याबरोबरच कुटुंब, समाज, महाविद्यालय या सर्व ठिकाणीही विविध कर्तव्य पार पाडावी लागतात.      
(आता चर्चा भाषणाचं रुप घेत होती. याचा काहीसा ताण मुलींच्या चेहर्‍यावर दिसत होता.)
मी: आता खरंच मी थांबायला हवं.
एक: नाही अंकल, ते विवेकवाहिनीचं दुसरं तत्वं सांगा ना!
मी: नको आपण भरपूर गंभीर चर्चा केली. आता तुमच्या गप्पा पुन्हा रंगू द्या नाहीतर रेल्वेत काय खडूस माणूस भेटला याची चर्चा दिल्लीपर्यंत कराल.
दोन: नाही खरंच एवढं पूर्ण करा मग थांबू. 
(तोपर्यंत माझ्या शेजारी बसलेल्या सहा नंबरने मान एका बाजूला टाकून डोळे शांत मिटले होते. समोरची चार नंबर तोंडासमोर हात घेऊन जांभई देत होती. त्या दोघींकडे दुर्लक्ष करत मी विषय पुढे सुरू केला.    
मी:  विवेकवाहिनीचे दुसरे तत्व आहे - "उज्वल भविष्यासाठी आपण सारे बदलूया!" 
आता उज्वल म्हणजे काय तर आपल्या संविधानाच्या सरनाम्यात म्हणजे प्रास्ताविकेत नमूद केलेला मूल्य आशय असणारा समाज. ही प्रास्ताविका तुम्हाला माहिती आहे का?
तीन: नाही.
तुम्ही शाळेत असताना परिपाठाला म्हणायचात ती preamble म्हणजेच प्रास्ताविका. 
पाच:  OK
मी:  असा समाज निर्माण व्हावा ही संविधान कर्त्यांची आणि आपल्याही इच्छा आहे. त्यासाठी 'आपण सारे बदलावे.' याचे दोन अर्थ आहेत. पहिला आपण स्वतः बदलावे आणि दुसरा आपण आपल्या अवतीभवतीचे या मूल्य आशयाला छेद देणारे वास्तव ही बदलावे. या बदलासाठी स्वतःच्या पातळीवर शक्य असणाऱ्या कृती कराव्यात. आगरकर म्हणायचे त्याप्रमाणे, "इष्ट ते बोलावे, शक्य ते करावे." 
अशी ही विवेकवाहिनी केवळ सामाजिकच नाही तर वैयक्तिक व्यक्तीमत्व विकासाचीही संधी देते.
एक: ती कशी काय अंकल?
मी: विवेकवाहिनी असं म्हणत नाही की तुम्ही केवळ सामाजिक विषयांवर चर्चा करा.  इथे तुमच्या वैयक्तिक प्रश्नांवरही चर्चा केली जाऊ शकते. हा मंच समवयीन युवांचा असल्यामुळे एकाचा प्रश्न हा त्या पूर्ण पिढीचा प्रश्नही असू शकतो. त्या अर्थाने स्वतःला पडलेले प्रश्न मांडणे आणि त्यांची विवेकी उत्तरे शोधण्याची संधी विवेकवाहिनी देते. 
दुसरे म्हणजे आठवड्यातून केवळ एक तासाचा वेळ देऊन विनामूल्य व्यक्तीमत्व विकासाची संधी विवेकवाहिनी निर्माण करून देते. आज महाराष्ट्रात चालणाऱ्या अनेक विवेकवाहिनीत प्रवेश केलेले युवा अभिमानाने सांगतात की "मी महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा मला नीट बोलताही येत नव्हते. आता मी कितीही मोठ्या समूहासमोर निर्भयपणे माझे मत मांडू शकतो. ग्रामीण भागातून आणि कमी शिकलेल्या परिवारातून आलेल्या मला वागण्या बोलण्याची पद्धत तपासण्याची संधी विवेकवाहिनीने मिळवून दिली." 
त्याचबरोबर विवेकवाहिनीच्या सदस्यांमध्ये सुसंवादाचे कौशल्य आणि क्षमताही सुधारते. दुसऱ्याचे मत ऐकून घेणे, आपले मत ठामपणे मांडणे, आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करून संयमी पद्धतीने प्रतिवाद करणे, आपले मत चुकीचे आहे हे लक्षात आले तर दुसऱ्याचे योग्य मत खुलेपणाने स्वीकारने हे विवेकी व्यक्तीमत्व विकासाचे अविभाज्य घटक सततच्या चर्चेतून अंगी रुजतात.
दोन: अंकल खरंच हे सगळं भारी आहे. आम्ही कॉलेज जीवनाचा या बाजूने कधी विचारच केला नव्हता.   
मी : मुलींनो याबरोबरच निर्णय घेण्याचे कौशल्य, ताण तणावांचे समायोजन, आत्मप्रतिष्ठा अशी जीवन कौशल्ये आणि लिंगभाव समानता, जात, धर्म निरपेक्षता ही मूल्येही विवेकवाहिनी रुजवते जी माणूस म्हणून अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी मदत करतात.
एक:  अंकल यासाठी काही वेगळे उपक्रम घेतले जातात का?
मी:  उपक्रमशीलता हे तर आपले वैशिष्ट्य आहे. काही समान उपक्रम सर्व महाविद्यालयात राबवले जातात तर काहीवेळा वेगवेगळया महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये जवळच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पत्रं भरून घेणे, 15 ते 31 डिसेंबर कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती संकल्प घेणे, 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी संविधान बांधिलकी महोत्सव राबवणे, 12 जानेवारी ते 14 फेब्रुवारी जोडीदाराची विवेकी निवड अभियान राबवणे असे समान उपक्रम तर काही ठिकाणी आकाश दर्शन, ग्रहण दर्शन, काही ठिकाणी पाणी फाऊंडेशन च्या कामात सहभाग, काही ठिकाणी, युवा मानसमित्र, काही ठिकाणी स्वच्छता अभियानात सहभाग, काही ठिकाणी समाजातील काही प्रश्नांचे सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना शोधणे असे विविधांगी उपक्रम राबवले जातात.
दोन: अंकल, आमच्या कॉलेजमध्ये एन एस एस आहे. मी त्याची सदस्यही आहे. पण तुमची विवेकवाहिनी त्यापेक्षा खूपच वेगळी आहे.
मी:  खरं आहे. अनेक ठिकाणी एन एस एस आणि विवेकवाहिनी एकत्रित काम करतात अशा ठिकाणी दोन्हींचा प्रभाव वाढतो.
आणि कॉलेज प्रशासनासाठी महत्वाची बाब म्हणजे NAC च्या  मूल्यांकनात विवेकवाहिनीच्या उपक्रमांची विशेष दखल घेतली जाते. ज्याचा महाविद्यालयांना फायदा होतो.
(चौघींच्या चेहर्‍यावर कौतुक आणि समाधान दिसत होते. आणि ते पाहून माझे मन प्रसन्न झाले होते.)
एक: अंकल, आम्ही आमच्या कॉलेजमध्ये विवेकवाहिनी जरूर सुरू करू.
मी: नक्की सुरू करा. काही मदत लागली तर मला कधीही कॉल करा. आता मी खरंच थांबतो. एकावेळी जास्त खाल्लं तर अपचन होतं असं तुमचाच वैद्यकशास्त्राचा नियम सांगतो.
सर्वजणी: हो अंकल. Thank you very much.
(खरंतर धावत्या ट्रेनमधून गोंदिया नागपूरचा परिसर मला न्याहाळायचा होता. ती संधी हुकली होती. पण या भावी डॉक्टरांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यापेक्षा अधिक समाधान मला मिळाले होते. इतके की हा संवाद मला लिहून या स्मृती कायमच्या कोरून ठेवाव्या वाटल्या. या इच्छेपायी नागपूर पासून बुलढाणा जिल्ह्यातील नागपूरपर्यंत ना डोकं मोबाईल मधून बाहेर काढता आलं ना शेजाऱ्यांशी बोलता आलं. तरीपण याचाही आनंदच आहे.)
...कृष्णात स्वाती 8600230660                                                                                                                                                                                                    [ Collected Article ]