Saturday, 18 August 2018

INDIAN 'PINCODE' SYSTEM


भारताला पिनकोड सिस्टिम दिलीय या मराठी माणसाने.. जाणून घ्या हा पिनकोड वाचायचा कसा?

                                                                आता तुम्ही सगळ्यांनी पिन कोड तर पाह्यलाच असेल. पाह्यला असेल काय, कित्येकदा लिहिला पण असेलच की हो. पण कधी विचार केलाय, ही भानगड कशी आणि का अस्तित्वात आली याचा? किंवा याच्या मागं नक्की कुणाचं सुपीक डोकं असेल याचा? ही आयडियाची कल्पना आहे  श्रीराम वेलणकर या मराठमोळ्या माणसाची. यांनीच पूर्ण भारताला पिनकोडची देणगी दिलीय बरं...
                                                              PIN म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर्. हे घडलं १९७२ मध्ये. तोपर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांचि विभागवार विभागणि व्हायची. पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या. म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाचि गावं, कधी  कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे, आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा..!!  चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच. हे सगळं टाळण्यासाठी विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत अंमलात आणण्यात आली.

पिनकोडची रचना अशी आहे...
     पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे. यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत, तर एक मिलिट्रीसाठी वापरला जातो.

आता पाहूयात हा पिनकोड वाचायचा कसा..
                                                यातले पहिले दोन अंक पोस्टऑफिस दर्शवतात. म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल...
११ - दिल्ली
१२ व १३ - हरयाणा
१४  ते १६ - पंजाब्
१७ - हिमाचल प्रदेश्
१८ ते १९ जम्मू आणि काश्मिर्
२० ते २८ - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
३० ते ३४ - राजस्थान्
३६ ते ३९ - गुजरात्
४० ते ४४ - महाराष्ट्र
४५ ते ४९ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
५० ते ५३ - आंध्र प्रदेश
५६  ते ५९ - कर्नाटक
६० ते ६४ - तामिळनाडू
६७ ते ६९ - केरळ
७० ते ७४ - पश्चिम बंगाल्
५५ ते ७७ - ओरिसा
७८ - आसाम
७९ - पूर्वांचल
८० ते ८५ बिहार आणि झारखंड
९० ते ९९ - आर्मी पोस्टल सर्व्हिस्

                                                                                      म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक दाखवतो- विभाग, दुसरा अंक- उपविभाग, तिसरा अंक - सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो. उदाहरणार्थ ४१६४१६ हा सांगलीचा पिनकोड आहे. यात पहिला अंक दाखवतो- पश्चिम विभाग, त्यानंतर ४१ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१६ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक - ४१६ हा सांगली जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे.
                                                                                आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही. ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकरांना मानाचा मुजरा...!   [ संकलन   ]

Tuesday, 3 July 2018

...How can I improve myself...

1. Detoxify your speech. Reduce the use of cuss words. Be polite.
2. Read everyday. Doesn’t matter what. Choose whatever interests you.
3. Promise yourself that you will never talk rudely to your parents. They never deserve it.
4. Observe people around you. Imbibe their virtues.
5. Spend some time with nature everyday. 
6. Feed the stray animals. Yes, it feels good to feed the hungry.
7. No ego. No ego. No ego. Just learn, learn and learn.
8. Do not hesitate to clarify a doubt. “He who asks a question remains fool for 5 minutes. He who does not ask remains a fool forever”.
9. Whatever you do, do it with full involvement. That’s meditation.
10.Keep distance from people who give you negative vibes but never hold grudges.
11. Stop comparing yourself with others. If you won’t stop, you will never know your own potential.
12. “The biggest failure in life is the failure to try”. Always remember this.
13. “I cried as I had no shoes until I saw a man who had no feet”. Never complain.
14. Plan your day. It will take a few minutes but will save your days.
15. Everyday, for a few minutes, sit in silence. I mean sit with yourself. Just yourself. Magic will flow.
16. In a healthy body resides a healthy mind. Do not litter it with junk.
17. For one month, eat home cooked meals.
18. Keep your body hydrated at all times. Practice drinking 8–10 glasses of water.
19. Make a habit to eat at least one serving of raw vegetable salad on a daily basis.
20. Take care of your health. “He who has health has hope and he who has hope has everything”.
21. Life is short. Life is simple. Do not complicate it. Don’t forget to smile.....!
Have a smiley day !!

Thursday, 14 June 2018

...हम पाँच...


१. ज्ञानेंद्रिये :-
----  डोळे , कान, नाक, जीभ, त्वचा.
२. स्थायू पदार्थ  :-
----  लाकूड, माती, दगड, फुले, कागद.
३. वनस्पतीचे अवयव  :-
 ---- मुळ, खोड, पान, फुल, फळ.
४. चवीचे प्रकार  :-
  ---- गोड, कडू, आंबट, खारट, तुरट
५. पाण्यातील प्राणी  :-
---- मासा, खेकडा , बेडूक, कासव मगर.
६. सरपटणारे प्राणी :-
---- साप, पाल, गोगलगाय , गांडूळ , सरडा.
७. कीटक :-
---- माशी, झुरळ, डास, कोळीनाकतोडा.
८ दोन पायाचे प्राणी :-
---- कावळामाणूस, चिमणी, बदक, कबुतर.
९ चार पायाचे प्राणी :-
---- कुत्राससाघोडा, गाढव, उंट.
१०. पुष्कळ पाय असलेले प्राणी :-
---- घोण, कोळीझुरळ, नाकतोडा, गोम.
 ११. वायू  :-
---- हवा, आॅक्सिजन ,स्वयंपाक गॅस, वारा, कार्बन डाय ऑक्साईड.
१२. सजीव  :-
----  माणूस, झाड, चिमणी, साप, मुंगी.
१३. निर्जीव   :-
---- दगड, लोखंड , चेंडू, सायकल, जिलेबी.
१४. द्रव पदार्थ  :-
---- पाणी, दूध, रॉकेल, शाई, मध
१५. धान्य :-
---- गहूचवळीबाजरीमटकीज्वारी.
१६. हत्यारे :-
---- कुऱ्हाड, विळा, वस्तरा, चाकू, तासणी.
१७. अवजारे :-
 ---- कानस , हातोडा, रंदा, छन्नी, दाभण.
१८. सुकामेवा :-
----  बदाम, काजू, नारळ, मनुका, खारीक.
१९. अन्न पदार्थ :-
 ---- डाळभाकरी, दूध, मीठ, भात.
२०. घरातील वस्तू :-
 ---- झाडू, टोपली, खुर्ची, घड्याळ, बादली.
२१. कपडे  :-
---- धोतरबनियन, स्वेटर, साडी, कोट.
२२.  शाळेतील वस्तू :-
 ---- फळाबेंच, टेबल ,खडू, डस्टर.
२३. माझे शाळेचे दप्तर :-
 ---- पिशवी, वहीपुस्तक, खोडरबर, पाटी.
२४. रंगाची नावे :-
 ---- लाल, निळा, हिरवा, पिवळा, काळा.
२५. रोग / आजार :-
 ---- हिवताप, सर्दी, खोकला, कावीळ,दमा.
२६.खनिजे :-
---- पितळ, तांबे, सोने, चांदी, लोखंड.
२७.किराणा दुकानातील वस्तू :-
---- तेल, मीठ, साबण, मसाला, रवा.
२८. आपल्या शरीराचे अवयव :-
---- ओठ, हात, पाय, डोके, दात .
२९.प्राण्यांच्या(बैल) शरीराचे अवयव :-
----  शिंगे, खूर, पाठ, शेपटी, जबडा.
३०. मसाले :--
---- जीरे, लसूण, मोहरी, मिरची, हळद.
३१. कडधान्य :-
 ---- मटकी, हरभरा, वाटाणे, मसूर, चवळी.       
३२.भांडी :--
---- कढई , तवा, ग्लास, थाळी, ताट.
३३. झाडे  :-
---- सागपिंपळशिसव, देवदार, वड.
३४.युध्द साहित्य :-
---- बंदूक, तलवार, रणगाडा, पिस्तुल, तोफ.
३५. आपल्या हाताचे भाग :-
---- दंड, कोपर, मनगट, तळहात, बोटे.
३६.आपल्या पायाचे अवयव :-
---- मांडीगुडघा, पोटरी, घोटा, तळपाय.
३७. काटेरी वनस्पती :-
---- गुलाब, बोर, निवडुंग, करवंद, लिंबू.
३८. शेंगा येणाऱ्या वनस्पती :-
---- गवार, मटार,फरसबी,शेवगा, गुलमोहर
३९. एक बी असलेली फळे :-
---- आंबा, आवळा, बोरे, जांभळे, खजूर.
४०.अनेक बिया असलेली फळे :-
---- कलिंगडपपई, फणस, चिकू, पेरू.
४१. तेलबिया :-
---- तीळ, शेंगदाणे, एरंड, मोहरी, सोयाबीन.
                                                                                                   ( संकलन )

Thursday, 10 May 2018

सूर्यनमस्काराची निर्मिती


                                                               रथसप्तमीबरोबर सूर्यनमस्काराचे महत्त्व कसे जोडले गेले आहे, तसेच सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराच्या निर्मितीपासूनचे महत्त्व अभ्यासण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच-  
*सूर्यनमस्काराची निर्मिती*
माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे  मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.
*प्राचीन सूर्यमंदिरे सूर्योपासना यांचे महत्त्व*
सूर्याला देवता मानले जाते. सूर्यनमस्काराबरोबरच सूर्यनमस्काराची उपासना गायत्री स्वरूपात किंवा सूर्यस्तुती, अशा कोणत्याही स्वरूपात सूर्योपासना केल्यास एकाग्रता साध्य होते. तसेच बुद्धी, स्मृती तीक्ष्ण होतात. शिवाय आकलनशक्तीही सुधारते.
      भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी आहेत. सौराष्ट्रातील वेरावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोणार्क . ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी या गावी शेकडो वर्षांपासून असलेले हे सूर्यमंदिर मुख्य मार्गाकडून केवळ तीन ते चार किमीवर हे नितांत सुंदर देवस्थान वसलेले आहे.
       उगवत्या मावळत्या् सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
*सूर्यनमस्काराचे ऐतिहासिक महत्त्व*
सूर्यनमस्कारात वापरल्या जाणा-या  आसनांचा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. श्री समर्थ रामदास सूर्यनमस्काराचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.
सूर्यनमस्कार करताना म्हटले जाणारे मंत्र त्यांचे महत्त्व
प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना मंत्र म्हटले जातात. त्या प्रत्येक मंत्राचा संबंध शरीरातील चक्राशी आहे. –
  क्र.           मंत्र             आसन
.     मित्राय नमः        अनाहत चक्र
.     रवये नमः         विशुद्ध चक्र
.     सूर्याय नमः       स्वाधिष्ठान चक्र
.     भानवे नमः       आज्ञा चक्र
.     खगाय नमः       विशुद्ध चक्र
.     पुष्णे नमः        मणिपूर चक्र
.     हिरण्यगर्भाय नमः   स्वाधिष्ठान चक्र
.     मरीचये मः      विशुद्ध चक्र
.     आदित्याय नमः    आज्ञा चक्र
१०.     सवित्राय नमः      स्वाधिष्ठान चक्र
११.     अर्काय नमः       विशुद्ध चक्र
१२.     भास्कराय नमः    अनाहत चक्र
*सूर्यनमस्कार करताना सूर्याचीच नावे का म्हणावी ?*
   सूर्याला चराचर सृष्टीचा आत्मा मानले जाते. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेत प्रणवासहित त्याचे नामोच्चरण, दर्शन सूर्यनमस्कार घालणे म्हणजे एकाचवेळी शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक शक्तिंचा विकास साधणे होय. सूर्यावाचून काहीच व्यवहार चालत नाही. मग अंधांना सूर्याचे दर्शन कसे घडावे? एवढे सूर्याला महत्त्व आहे.
*सूर्यनमस्कारामुळे होणारे लाभ*
सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरूदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय काही हाडांचे दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहिेसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो
(संकलन )