Friday, 23 October 2015

सतत प्रयत्नांची एक यशस्वी गोष्ट...- निधी गुप्ता


                                                          युपीएससी परीक्षेत देशात तिसरी आलेल्या निधी गुप्ता आपल्या आयुष्याला थोडय़ा वेगळ्य़ा वळणावर नेवून ठेवणारी. स्ट्रेट फॉर्वर्ड विचारांची.  एक व्हिडिओ पाहून तिने प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. काय असेल असं या व्हिडिओत?
 कोणी आयडॉल की एखाद्याचं प्रेरणादायी भाषण?  
                                                   तर तसं नाही. तो व्हिडीओ होता एका आजारी माणसांचा.  जेव्हा एखादी व्यक्ती आजारपणामुळं अंथरूणावर खिळून राहिलेली असते, तेव्हा तिच्यासमोर आयुष्यातील अनेक घटना येतात. आपण आयुष्यात काय चांगले-वाईट केलं ते दिसायला लागतं,असं त्या व्हिडिओत दाखविण्यात आलं होतं. हा व्हिडिओ पाहून माङयात खुप सकारात्मक बदल झाला. मी आयुष्याची दिशाच बदलण्याचं ठरवलं. लोकांच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनात येण्याचा निश्चय केला असं 27 वर्षांची निधी सांगते, तेव्हा तिच्या डोळ्यात काम करण्याची एक वेगळी तगमग आपल्यालाही सहज दिसते.
निधी सांगते, 
अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला...
                                   मी सॉफ्टवेअर इंजिनिअर. दिल्लीची. आयएएस होण्यासाठी मला पाचवेळा परीक्षा द्यावी लागली. नोकरी करत असतानाच  तयारी सुरू केली. त्यामुळं अभ्यासाला सलग वेळ मिळत नव्हता. त्यामुळे पहिल्या तीन प्रयत्नात यश दुरच राहिलं. पण नंतर गंभीरपणो अभ्यास करण्याचा निर्णय घेतला अन् नोकरी सोडली. त्यामुळं पुढच्याच म्हणजे चौथ्या प्रयत्नात युपीएससी क्रॅक केली. यावेळी ‘आयआरएस’मध्ये संधी मिळाली. ‘कस्टम्स अॅन्ड सेंट्रल एक्साईज विभागात सहाय्यक आयुक्त हे पद मिळालं. पण आयएएस होण्याचं ठरविलं असल्यानं आयआरएसचं प्रशिक्षण सुरू असताना त्याचा अभ्यास सुरू केला. पण नोकरीमुळे दिवसदिवस अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळायचा नाही. तरीही जेवढं शक्य होईल, तेवढा प्रयत्न केला.  जेव्हा अभ्यास केला तेव्हा पूर्ण चित्त एकवटून केला. निराश झाले नाही. त्यामुळंच पाचव्या प्रयत्नात यश मिळालं.  
वेळात वेळ काढून दररोज किमान चार ते पाच तास अभ्यास केला.  परीक्षेसाठी चार प्रयत्न केल्यामुळं अनुभव पाठिशी होताच. त्यामुळे लेखनाचा फारसा प्रयास करावा लागला नाही. पण या परीक्षेत मी टॉपमध्ये येईल अशी काही अपेक्षा नव्हती. होती ती फक्ट कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा. प्रशिक्षमामुळं  मुलाखतीचीही तयारी करता आली नाही. पण तिथंही माझा आत्मविश्वास महत्वाचा ठरला. मुलाखत घेणारे जो प्रश्न विचारतील त्याला धीरानं सामोरं जायचं, स्पष्टपणो आपलं म्हणणं मांडायचं, प्रामाणिकपणो उत्तर द्यायची, हे मनात ठरवलं होतं. परीक्षेची तयारी करताना कोचिंग क्लास लावला नाही. फक्त ऑपशनल विषय असलेल्या फिजिक्ससाठी मदत घेतली. सेल्फ स्टडीवरच अधिक भर दिला. अभ्यास करताना ती संकल्पना तुम्हाला समजणं आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्ही लेखी परीक्षेत ते व्यवस्थित मांडू शकत नाही. जे कराल ते प्रामाणिकपणो करा, हेच यशाचं सूत्र असं मला वाटतं!
ग्लॅमरपेक्षा समाधान महत्वाचं!
                                                  सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करताना पैसा कमविण्याची, परदेशी जाण्याची संधी जास्त मिळाली असती. पण मला भारतात राहून येथील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करायचं आहे. सर्वसामान्य लोकच माझी प्रेरणा आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यातच मला अधिक आनंद मिळेल.  ग्लॅमर, पैसा तर सर्वच क्षेत्रत असतो. पण ज्या गोष्टीतून आंतरिक समाधान मिळेल, ती गोष्ट तुमच्यासाठी ग्लॅमरस असते, असं मला वाटतं. शेवटी आपल्या प्रायॉरिटी आपणच ठरवल्या तर आपले मार्ग आपल्याला सापडतात.
                                        "एक नक्की आपला देश बदलतोय. लोक बदलत आहेत. या बदलाबरोबर लोकांची मानसिकताही बदलायला हवी. इतरांनीच नव्हे तर मुलींनीही स्वत:वर विश्वास ठेवायला हवा की, आपण मोठय़ा पदांवर यशस्वीपणो काम करू शकतो...!"
तो विश्वास हीच आपली ताकद...!

...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

Wednesday, 21 October 2015

एक सुंदर प्रार्थना...!

                                             1). कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची खिल्ली  उडवू नका, कारण....
                    काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही  हळू हळू हिरा बनवतो. 

  2). जग नेहमी म्हणतं - चांगले लोक शोधा आणि वाईट लोकाना सोडा....पण भगवांन श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही....
  


  • एक सुंदर प्रार्थना.....
     देवा, मला इतकंच सुख दे की,
      मला आयुष्यभरासाठी पुरेल,
    माझी महती इतकीच असू दे की,
       कुणाचं तरी चांगलं होऊ दे,
नात्यामध्ये इतकी आपुलकी असूदे की,
   जी फक्त प्रेमाने निभावली जातील,
     डोळ्यात इतकी लाज असूदे की,
   थोरामोठ्यांचा मान राखला जाईल,
आयुष्यातील श्वास इतकेच असूदेत की,
कुणाच्यातरी आयुष्याचे भलं करता येईल,
    बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव
म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही...!

Thursday, 15 October 2015

‘तुम्ही अपंग आहात. तुम्हाला हे काम करता येणार नाही. सफाई कामगार म्हणूनही तुम्ही पात्र ठरणार नाही..’- ईरा सिंघल

  • देशात पहिली आलेली एक जिद्दी मुलगी...

                                                               असं ईराला स्पष्ट सांगण्यात आलं. खरंतर अपार कष्ट करून तिनं 2010 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात यश मिळवत इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिस (आयआरएस) साठी ती पात्रही ठरली; मात्र तुम्ही अपंग आहात असं कारण सांगत, तिला अकार्यक्षम ठरवून हे पद नाकारण्यात आलं. यामुळं ईरा हादरून गेली. पण तिनं ठरवलंच की, आपण जर हे काम करू शकतो तर हे पद पुन्हा मिळवायचंच. जिद्दीनं तिनं सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (कॅट)मध्ये अपील केलं. एक नवी लढाईच सुरू केली. ती सोपी नव्हतीच. मणक्याच्या आजारामुळं साडेचार फूट उंची आणि एका हाताने फारसं काम करता न येणा:या ईराला आपण प्रशासकीय सेवेसाठी सक्षम असल्याचे अनेक पुरावे द्यावे लागले. सतत स्वत:ला सिद्ध करावं लागलं. तिच्या जिद्दीपुढं ‘कॅट’नेही मान्य केलं की ईरा सर्वार्थानं प्रशासकीय सेवा करायला सक्षम आहे. ती जिंकली. फेब्रुवारी 2क्14 मध्ये तिची ‘आयआरएस’मध्ये सन्मानपूर्वक निवड करण्यात आली.
    मात्र ती इथंच थांबली नाही. यूपीएससी 2क्14 च्या परीक्षेत ती देशात अव्वल आली. 
    आणि तिनं सिद्ध करून दाखवलं की, मुलगी असणं, थोडं अपंग असणं हे काही आपल्या वाटेतले अडथळे ठरू शकत नाहीत. उलट आपला संघर्ष आणि जिद्द आपल्याला यशाची उंच शिखरं जास्त मेहनतीनं दाखवतात. मूळची दिल्लीची असलेली ईरा, तिनं आधी इंजिनिअर, मग एमबीए केलं. कार्पोरेट सेक्टरमधे उत्तम करिअर सुरू झालं. मात्र तिला प्रशासकीय सेवेतच काम करायचं होतं. तिचं मन त्या कार्पोरेट वातावरणात रमत नव्हतं. म्हणून मग परीक्षेची तयारी करण्यासाठी तिनं उत्तम पगाराची, करिअर घडू शकणारी नोकरी सोडली. 
    आणि प्रशासकीय सेवेत येण्याची तयारी सुरू झाली. पण तिच्या वाटेवर अडथळेच अनंत होते.
    परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही तिला झगडावं लागलं, ते तर ती झगडलीच; पण त्याहून पुढचं पाऊल टाकत देशात अव्वल ठरली.
    ईरा सांगते, 
    अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला
    या परीक्षेच्या तयारीचा आणि हमखास यशाचा असा काही एकच एक फॉम्यरुला नसतो. यूपीएससीची तयारी सुरू करताना आपल्या क्षमतांचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. तुम्ही किती खोलवर अभ्यास करताय यावरच यश अवलंबून असतं. 
     ‘मी कधीच अभ्यासाचं वेळापत्रक केलं नाही. पण सुरुवातीला खूप अभ्यास केला. ‘आयएएस’साठी चार परीक्षा दिल्या. पण त्यासाठी कोचिंग इन्स्टिटय़ूटमध्ये गेले नाही. स्वत:च अभ्यास केला. पण तो करत असताना परीक्षेत चांगले गुण मिळायलाच हवेत असा हट्ट केला नाही. प्रत्येक प्रयत्नात झालेल्या चुका मात्र सुधारत गेले. आपलं आपल्याला कळतंच ना, नेमकं काय चुकलं. ते पुढच्या अॅटम्पला सुधारलं. सुरुवातीच्या काळात उत्तरं लिहिताना मला जेवढं येतंय तेवढं सगळं मी उतरवत जायचे. लिहून काढायचे. पण असं करताना उत्तरपत्रिका तपासणा:या परीक्षकांना काय हवं आहे, याचा विचारच मी केला नाही. मात्र नंतर नंतर आपलं काही तरी चुकतंय असं वाटलं. विचार केला आणि लेखनाचा पॅटर्नच बदलून टाकला. हाच निर्णय मला इथर्पयत घेऊन आला. लेखी परीक्षा देताना परीक्षकांना उत्तर म्हणून काय हवं आहे याचा विचार करून मी उत्तरं लिहायला लागले. मी आता सगळ्यांना एकच सांगते की, आपल्याला काय आणि किती येतं हे दाखवण्यापेक्षा परीक्षकांना अपेक्षित असलेली उत्तरं लिहायला हवीत. आणि दुसरं म्हणजे वेळ मारून न्यायची सवय असेल तर ती सोडून द्या. आपले पेपर तपासणारे परीक्षक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. त्यामुळं त्यांना मूर्ख बनविणारी उत्तरं लिहून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका!
    मला स्वत:ला मुलाखतीमध्ये कमी गुण आहेत. पण लेखी परीक्षेत उत्तम कामगिरी केल्यानं मला पहिला क्रमांक मिळाला. लेखन हे माझं मुख्य अस्त्र ठरलं. तोच सराव मी करत होते. शिकवण्या लावून हे सारं होत नाही. स्वत:चं स्वत:च जास्तीत जास्त काम करायला हवं. लेखी परीक्षाच काय पण मुलाखतीसाठीही मी वेगळं मार्गदर्शन घेतलेलं नाही. अनेकजण या परीक्षेचं टेन्शन घेतात. का घ्यायचं टेन्शन? मुलाखत घेणारे प्रश्न विचारणारच. तुम्ही त्यांच्यासमोर कसं प्रेङोंट होता हे महत्त्वाचं. मी मुलाखतीला आत्मविश्वासानं सामोरे गेले. जेव्हा मी अभ्यास करत होते, परीक्षा देत होते तेव्हा मी गुणांचा विचारच केला नाही. समोर बसलेल्या लोकांना आपल्यातील आत्मविश्वास दिसायला हवा हे महत्त्वाचं!
    तो असेल तर मग कुठलीच परीक्षा तुम्हाला नापास करू शकत नाही.
    नो मॅटर, हु यू आर!
    मी कधीच स्वत:ची तुलना इतरांशी केली नाही. आपल्या अपंगत्वाचाही कधी विचार केला नाही. आपली कमजोरी न समजता जिद्दीनं तयारी केली. इतरांशी तुलना केली की तुम्हाला नैराश्य येतं. हे नैराश्यच तुमच्यातील आत्मविश्वास कमी करतं. परीक्षेला सामोरं जातानाही कधीच कसली अपेक्षा ठेवली नाही की कुठल्या गोष्टीला अतिआत्मविश्वासाने सामोरं गेले नाही. कधी नकारात्मक विचारही केला नाही. होतं काय की, अजूनही आपल्याकडे लोकांना वाटत नाही की महिला बडय़ा पदावरच्या जबाबदा:या पेलू शकतात. ते पुरुषांचंच काम असा एक समज. त्यात अपंगांना कमी लेखण्याची वृत्ती आहेच. त्यात शारीरिकदृष्टय़ा तुम्ही वेगळे दिसत असाल तर भेदाभेद आणखी वाढतो. या सा:याचा सामना केल्यावर मला वाटतं की, सगळ्यांनाच समान संधी मिळाली पाहिजे. आणि दुसरे ती संधी देत नसतील तर आपण स्वत:ला अशी संधी द्यायलाच हवी. आपण कुणाशीही स्वत:ची तुलना न करता, पूर्ण ताकदीनं आपली मेहनत करायची. अपमानानानं दुखावलं जाणं वेगळं, पण त्यातून तुमची लढण्याची जिद्द वाढली पाहिजे. कमी होता कामा नये!
    एक काम की बात
    यूपीएससीची तयारी करताना त्यावरच सर्वस्वी अवलंबून मात्र राहू नये असं मला वाटतं. हा प्रवास इतका सोपा नाही. त्यात वय वाढतं, पैसे कमावण्याचं प्रेशर वाढतं. म्हणून मग आपली डिग्री असेल त्या विषयात किमान एक-दोन र्वष तरी नोकरी करायला हवी. त्यातून खूप अनुभव मिळतात. त्याचा उपयोग खूप होतो. एकतर एका प्रयत्नात तुम्हाला यश येईलच असं नाही. आणि दुसरं म्हणजे हाताशी पैसा असल्यानं आत्मविश्वास कमी होत नाही. त्यामुळे मी फुलटाइम अभ्यासच करीन असं म्हणण्यापेक्षा थोडा अनुभव, थोडा पैसा त्यापूर्वी गाठीशी बांधलेला बरा!

Monday, 12 October 2015

लक्ष्यात ठेवण्याच्या काही ट्रिक्स:-

=> G-8 देश
ACF JEJE R   (ACF जेजेआर )
A-अमेरिका
C-कैनडा
F-फ्रांस
J-जर्मनी
E-ईटली
J-जपान
E-इग्लंड
R-रशिया
------------------------------
------
=> G-5 देश
MBBS C
M-मेक्सिको
B-भारत
B-ब्राझील
S-सा.आफ्रिका
C-चीन

------------------------------------
=>G-20 सदस्य देश
AAP MUJE ABCD STR लगे
A = आर्जेन्टीना
A= आस्ट्रेलीया
P = फ्रांस
M = मेक्सिको
U = युरोपीय महासंघ
J = जर्मनी, जपान
E =  इटली, इंडोनेशिया
 A = अमेरिका
B = ब्राझील, ब्रिटन, भारत
C = चीन, कॅनडा  
D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया
 S = सौदी अरेबिया
T = तुर्कस्तान
R = रशिया
------------------------------------
=>सार्क सदस्य देश
MBBS PANI
M-मालदीव
B-भूटान
B-बांग्लादेश
S- श्रीलंका
P-पाकिस्थान
A-अफगानिस्थान
N-नेपाळ
I-इंडिया

------------------------------------
=>पंचायतराज स्वीकारणारे राज्य:-
RAAT KO PUMP
रात को पम्प लाना है.

R-राजस्थान
A-आंधप्रदेश
A-आसाम
T-तामीडनाडू
K-कर्नाटक
O-ओरिसा
P-पंजाब
U-उत्तर प्रदेश
M-महाराष्ट्र
P-प.बंगाल.

------------------------------------
=>विधानपरिषद असलेले सहा राज्य...
आज उमक बिहार ला गेला
आ-आंधप्रदेश
ज-जम्मू काश्मीर
उ-उत्तर प्रदेश
म-महाराष्ट
क-कर्नाटक
बी-बिहार

------------------------------------
=>भारताच्या इतर देशाच्या सीमा
बचपन MBA
ब-बांग्लादेश
च-चीन
प-पाकिस्थान
न-नेपाळ
M-म्यानमार
B-भूटान
A-अफगानिस्थान

------------------------------------
=> महाराष्ट्रातील इतर राज्याच्या सीमा
MKG G  AC
मोहनदास करमचंद गांघी गुजरात मध्ये AC त बसत होते.
M-मध्यप्रदेश
K-कर्नाटक
G-गोवा
G- गुजरात
A-आंध्रप्रदेश
C-छतीसगड

------------------------------------
=>सर्वाधिक क्ष्रेत्रफळ असलेले देश
R-रशिया
C-कँनडा
C-चीन
A-अमेरिकाun
B-ब्राझील
A-आस्ट्रेलिया
B-भारत
------------------------------
----

Saturday, 10 October 2015

CRACK IT GK...It's challenge 4 U

41 चा वर्ग = 16  81
42 चा वर्ग = 17  64
43 चा वर्ग = 18  49
44 चा वर्ग = 19  36
45 चा वर्ग = 20  25
46 चा वर्ग = 21  16
47 चा वर्ग = 22  09
48 चा वर्ग = 23  04
49 चा वर्ग = 24  01
50 चा वर्ग = 25  00

वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या
16,
17,
18,
19,
20,
21,
22,
23,
24,
25
अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे,
ती पहा.

त्याचबरोबर
81,
64,
49,
36,
25,
16,
09,
04,
01,
00

अशी उतरत्या क्रमाची
9,
8,
7,
6,
5,
4,
3,
2,
1,
0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.

वरील दोन्ही मांडण्यांचा परस्पर संबंध ध्यानात ठेवणे सहज शक्य आहे.
51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
सोपी रीत
   मित्रांनो,
          51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग ध्यानात ठेवणे हा लेख वाचल्यानंतर सहज शक्य आहे.येथे केलेली मांडणी व थोडीशी स्मरणशक्ती वापरल्यास आपण कायमस्वरुपी 51 ते 60 चे वर्ग ध्यानात ठेवू शकतो व हवे तेव्हा आठवू शकतो.

        51 चा वर्ग =  26   01
        52 चा वर्ग =  27   04
        53 चा वर्ग =  28   09
        54 चा वर्ग =  29   16
        55 चा वर्ग =  30   25
        56 चा वर्ग =  31   36
        57 चा वर्ग =  32   49
        58 चा वर्ग =  33   64
        59 चा वर्ग =  34   81
        60 चा वर्ग =  36   00 (3500+100)
वरील मांडणीकडे लक्षपूर्वक पहा.
51 ते 59 च्या वर्गसंख्यांच्या मांडणीमद्ये 26,27,28,29,30,31,32,33,34 अशी क्रमवार चढती मांडणी तयार झालेली दिसते.त्याचबरोबर 01,04,09,16,25,36,49,64,81 अशी क्रमवार 1 ते 9 यांच्या वर्गाची चढती मांडणी दिसून येते.
60 च्या वर्गामद्ये क्रमवार पुढील साख्या 35 व क्रमवार पुढील 10 चा वर्ग 100 यांची बेरीज (3500+100= 36  00) अशी रचना तयार होते.
आवडल्यास इतरांना सांगा.
‪तसेच
91 चा वर्ग  82  81
92 चा वर्ग  84  64
93 चा वर्ग  86  49
94 चा वर्ग  88  36
95 चा वर्ग  90  25
96 चा वर्ग  92  16
97 चा वर्ग  94  09
98 चा वर्ग  96  04
99 चा वर्ग  98  01
100 चा वर्ग 100 00

Tuesday, 29 September 2015

तेहतीस कोटी देव कोणते ?

आपणास हे माहित आहे का ?
प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?
उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटी' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो . पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार' असा आहे. कल्पना अशी आहे की ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत .
प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटी (कॅटेगरी) दिलेली आहे.
अष्टवसूंची नावे - आप,धृव,सोम,धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास . अकरा
रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.
बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू.
असे एकंदर ८+११+१२+१+१ = ३३. आपल्या ग्रुप वर असे काय तरी चांगले share करा...जेणे करून सर्वाना माहिती मिळत जाईल..!

                                                                         धन्यवाद..!

Tuesday, 22 September 2015

Worlds 8 superb sentences..!

--------------<>-------------
Shakespeare :👌
Never  play  with the feelings
of  others  because  you may
win the  game but the  risk is
that  you  will surely  lose
the person  for a  life time.
--------------------------------
Napoleon.👌
The world  suffers  a  lot. Not
because  of  the  violence  of
bad people, But because   of
the silence of good people!
--------------------------------
Einstein :👌
I  am  thankful  to  all those
who  said  NO  to  me   It's
because  of  them  I  did  it
myself.
--------------------------------
Abraham Lincoln :👌
If friendship is your weakest
point  then  you  are  the
strongest  person  in the
world.
--------------------------------
Shakespeare :👌
Laughing  faces  do  not
mean that  there is  absence
of sorrow!  But it means that
they  have the ability to deal
with it.
--------------------------------
William  Arthur : 👌
Opportunities   are  like
sunrises, if  you  wait too
long  you  can miss them.
------------------------------
Hitler : 👌
When  you  are  in  the light,
Everything follows  you, But
when  you  enter  into   the
dark, Even your own shadow
doesn't  follow  you.
--------------------------------
Shakespeare : 👌
Coin  always  makes  sound
but  the  currency  notes are
always  silent.  So  when  your value  increases
keep quiet....!
--------------------------------

Wednesday, 16 September 2015

ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता

  • लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता सांगताहेत यशाचा नवाकोरा फॉम्यरुला..

एरवी हे सारं जर दुसरं कुणी सांगितलं असतं,
तर त्यावर सहजी विश्वास ठेवायला मन धजावलं नसतं!
पण जेव्हा ‘त्या’ तिघी हे सांगतात,
तेव्हा विश्वास ठेवा,
ते सारं खरंच असतं!
नव्हे ते खरंच असतं, म्हणून तर त्या तिघी यशाच्या शिखरावर पोहचूनही
तेच सांगत असतात की,
तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या उणिवा वाटतात,
त्याच गोष्टी तुमची ताकद बनू शकतात!
फक्त तुमची त्यांच्याकडे पाहायची नजर बदलायला हवी!
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या स्पर्धेत 
पहिल्या तीन क्रमांकावर बाजी मारणा:या त्या तिघी.
ईरा सिंघल, डॉ. रेणू राज आणि निधी गुप्ता.
त्या सांगतात,
कशाला हवं कोचिंग क्लासचं स्तोम?
कुणी सांगितलं की, मेट्रो शहरातल्या महागडय़ा क्लासेसला गेलं तरच
तुम्ही यूपीएससी क्रॅक करू शकता?
कोण म्हणतं की, इंग्रजीच यायला हवं?
बाकीच्या भारतीय भाषांचा हात सोडून फाडफाड इंग्रजी आलं तरच मुलाखतीत टिकता येतं?
कोण म्हणतं की, चोवीसपैकी पंचवीस तास अभ्यास केला आणि कोंडून घेतलं स्वत:ला तरच 
ही परीक्षा यशाचा दरवाजा दाखवते.?
हे सगळेच गैरसमज आहेत!
या सगळ्याला पुरून उरते ती एकच गोष्ट, ती म्हणजे आत्मविश्वास!
त्याच्या जोरावर स्वत:च्या भाषेत स्वत:चे विचार मांडण्याची
उत्तम हातोटी.
स्वत: अभ्यास करून कमावलेली मतं
आणि त्याला अनुभवाची जोड!
- एवढं असलं तरी आपण ही परीक्षा सहज क्रॅक करू शकतो!
आणि हे सारं तर आपल्याकडे असतंच,
पण त्याची आपण किंमत करत नाही.
उलट त्याला आपण कमतरता समजतो आणि भलत्याच गोष्टींच्या मागे धावतो!
हे धावणं आधी थांबवा. 
आणि शांतपणो विचारा स्वत:ला की,
हे सारं मी करतोय माझं ध्येयं काय?
त्याचं उत्तर तुमच्या जिद्दीला बळ देईल!
***
ते बळ मिळवण्यासाठी काय करायचं हेच सांगणा:या या तिघींच्या विशेष मुलाखती पान 4-5 वर!
लोकोमोटर डिसअॅबिलिटीनं अपंग असलेली ईरा, नुस्ती देशात पहिलीच आलेली नाही तर तिथं व्यवस्थेशी एक मोठी लढाई लढून हे सिद्ध केलंय की, कार्यक्षमतेवर जुनाट विचार मर्यादा नाही लादू शकत!
दुसरी रेणू, डॉक्टर झालेली, केरळातल्या छोटय़ा गावातली, मल्याळम भाषेवर प्रेम करणारी,
आपल्या भाषेचा हात न सोडता यश मिळवता येतं, हे ती सांगते तेव्हा कळते, भाषेला ताकद मानण्याचं एक सूत्र!
आणि तिसरी निधी. एकदा नाही पाचदा अटेम्प्ट करून तिनं जिद्दीनं यश खेचून आणलं. ती सांगते सतत प्रयत्नांतल्या सातत्याचं यश!
***
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर
या तिघींची तयारी एक समृद्ध, सकस दृष्टिकोन नक्की देईल.
आणि नसाल,
तर जिंकण्याची एक नवीन, पॉङिाटिव्ह गोष्ट 
मनात नक्की घर करेल!
त्या गोष्टीसाठी, पान उलटाच.
...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

मुलाखती आणि लेखन- राजानंद मोरे (राजानंद ‘लोकमत’च्या पुणे  आवृत्तीत उपसंपादक/बातमीदार)