प्रथम पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा मान -चंद्रशेखर व्यंकट रामन यांना
जातो(१९५४).तसे पाहता १९५४ साली तीन व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे.
आतापर्यंत ४३ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेला आहे.(२०१४ पर्यंत)
पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरी भाषेत भारतरत्न नाव पुरस्कार प्रतिमेवर असते.
Indian Order of Precedence मध्ये भारतरत्न प्राप्त व्यक्तीला सातव्या क्रमांकावर स्थान आहे.
लाल बहादूर शास्त्री यांना (१९६६मध्ये) प्रथमच मृत्युनंतर पुरस्कार प्राप्त झाला (Posthumously).
मदर तेरेसा(१९८०मध्ये) खान अब्दुल गफार खान (१९८७मध्ये) आणि नेल्सन मंडेला (१९९०मध्ये) या तीन परकीय व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला.
१९७७-१९८० मध्ये जनता सरकारने पुरस्कार देणे थांबवले होते. पुन्हा ऑगस्ट १९९२ ते डिसेंबर १९९५ मध्ये पण पुरस्कार देण्यावर बंदी घातली होती. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला, पण त्यांच्या वंशजाने तो नाकारला, १९९७ साली सुप्रीम कोर्टाने बोस यांना दिला गेलेला पुरस्कार रद्द केला.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींची यादी
1. डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण(१८८८-१९७० ):
1954 साली भारतरत्न मिळाला.पूर्वीच्या मद्रास प्रांतात तिरुचिरापल्ली येथे त्यांचा जन्म झाला.1930 मध्ये त्यांना भौतिकशास्त्र मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. प्रकाश किरणे जेव्हा एखाद्या पारदर्शक पदार्थातून जातात तेव्हा काही प्रमाणात विस्तापित (deflected) किरणे आपल्या तरंगलांबीमध्ये(wavelength) बदल करतात. या शोधाला रमण इफेक्ट म्हणून ओळखले जाते. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल मिळाले.
2.चक्रवर्ती राजगोपाल चारी(१८७८-१९७२):
1954 साली भारतरत्न मिळाला.१९४७-१९४८ मध्ये प. बंगालचे राज्यपाल .ते स्वतंत्र भारताचे दुसरे (पहिले माउंट बॅटन ) आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते.( 21 June 1948 – 26 January 1950) गव्हर्नर जनरल पदी निवड होणारे ते पहिले आणि शेवटचे भारतीय होते.सरदार पटेल नंतर १९५०-५१ मध्ये भारताचे गृहमंत्री.१९५२-५४ मध्ये मद्रास राज्याचे मुख्यमंत्री.१९५७ साली त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून ‘भारतीय राष्ट्रीय लोकशाही कॉंग्रेस’(Indian National Democratic Congress)ची स्थापना केली.नंतर १९५९ साली ‘स्वातंत्र्य पक्षा’ ची स्थापना केली.त्यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाला विरोध केला होता व दुसरया महायुद्धात ब्रिटिशाना पाठींबा दिला होता.गांधीजीनी त्यांचा उल्लेख “Keeper of my Conscience”असा केलेला आहे.
3. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन(१८८८-१९७५):
1954 साली भारतरत्न मिळाला.भारताचे पहिले उपराष्ट्रपती(१९५२-१९६२ )भारताचे दुसरे राष्ट्रपती(१९६२-१९६७). मुळचे तामीळनाडू मधले.ब्रिटीश राजघराण्याचा ‘Order Of Merit’ पुरस्कार १९६३ साली.१९६२ पासून त्यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर, शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.Constituent Assembly चे ते सदस्य होते, सोविएत रशिया मध्ये त्यांनी भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले.त्यांनी धर्मावर तसेच तत्त्वज्ञान यावर विपुल लिखाण केले आहे.त्यांनी लिहिलेली काही पुस्तके :1) Indian Philosophy,2) The Hindu View of Life,3) Religion and Society,4) Religion, Science and Culture. 5) The Principle of Upnishads
4.डॉ. भगवान दास(१८६९-१९५८)
1955 साली भारतरत्न मिळाला.स्वातंत्र्य सेनानी, Theosophist (ब्रम्हविद्या).महात्मा गांधी काशी विद्यापीठाची स्थापना केली.मुळचे वाराणसी येथील.अॅनि बेझंट यांच्या ‘Theosophical Society’ मध्ये काम केले.संस्कृत आणि हिंदी मध्ये जवळपास ३० पुस्तके लिहिली.
5.डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या(१८६१-१९६२):
1955 साली भारतरत्न मिळाला.
सिव्हिल इंजि.
मैह्सूरचे दिवाण होते.
१५ सप्टेंबर, हा त्यांचा जन्मदिन दरवर्षी ‘Engineer’s Day’ म्हणून साजरा केला जातो.
द. भारतातील बरेच मोठे मोठे तलाव त्यांनी डिझाईन केले.
6.जवाहरलाल नेहरू(१८८९-१९६४):
1955 साली भारतरत्न मिळाला.
१९४७-६४ मध्ये भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री पद त्यांच्याकडेच होते, तसेच काही काळ अर्थमंत्री व संरक्षण मंत्री देखील होते.
१९२९ साली लाहोर कॉंग्रेस चे अध्यक्ष – पूर्ण स्वातंत्र्यचा ठराव संमत केला.
त्यांचा जन्मदिन, १४ नोव्हेंबर बालक दिन म्हणून साजरा केला जातो.
7.गोविंद वल्लभ पंत(१८८७-१९६१):
1957 साली भारतरत्न.
उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री(१९५०-५४).
भारताचे गृहमंत्री(१९५५-६१).
जन्म अलमोरा –उत्तराखंड मध्ये.
8.डॉ. धोंडो केशव कर्वे(१८५८-६२)
१९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी भारतरत्न .
महिलांच्या शिक्षणासाठी मोलाची कामगीरी
१९५५ ला पद्मविभूषण.
१९१६ ला SNDT(Shrimati Nathbai Damodar Thkardasi) विद्यापीठाची स्थापना.
9.डॉ. बिधनचंद्र रॉय(१८८२-१९६२)
1961 साली भारतरत्न.
Physician and Surgeon
प. बंगालचे दुसरे मुख्यमंत्री.
त्यांचा जन्मदिवस १ जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो.
ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून कार्य.
आधुनिक प. बंगालचे शिल्पकार म्हणून मानले जाते.
10.पुरूषोत्तम दास टंडन(१८८२-१९६२)
1961 साली भारतरत्न.
स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ञ.
प्रशासकीय कार्यालयीन भाषा(Official language) हिंदी व्हावी म्हणून प्रयत्न केलेत.
लाल लजपतराय यांनी स्थापन केलेल्या लोक सेवक मंडळ चे अध्यक्ष होते.
घटना परिषदेचे सदस्य होते.
11.डॉ. राजेंद्र प्रसाद(१८८४-१९६३)
1962 साली भारतरत्न.
चंपारण्य सत्याग्रहाचे नियोजन केले.
भारताचे पहिले राष्ट्रपती(१९५२-१९६२)
सलग दोन वेळा(१० वर्ष) राष्ट्रपती पदावर राहिलेले एकमेव.
घटना परीषदे चे अध्यक्ष म्हणून काम केले.
त्यांचे शिक्षण अलीगढ मुस्लिम विद्यापीठ मध्ये झाले.
त्यांची पुस्तके: 1. India Divided, 2. बापू के कदमो मे, 3. Mahatma Gandhi and Bihar, Some Reminiscence
12.डॉ. झाकिर हुसेन(१८९७-१९६९)
१९६३ साली भारतरत्न.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे राष्ट्रपती(१९६७-१९६९).
राष्ट्रपती पदावर असताना त्यांचे निधन झाले. सर्वात कमी काळ राष्ट्रपती (दोन वर्ष).
भारताचे दुसरे उपराष्ट्रपती(१९६२-१९६७)
13.डॉ. पांडुरंग वामन काणे(१८८०-१९७२)
1963 साली भारतरत्न.
पां.वा. काणे यांना १९४६ साली अलाहाबादविद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली.काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला. या कामाबद्दल त्यांना
१९०४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेत शिक्षक म्हणून कामास काणेंनी सुरूवात केली. नंतर तेएल्फिंस्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. पुढे ते मुंबई विद्यापीठाचेकुलगुरू झाले.
१९५२ साली नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार देण्यात आला.ते राष्ट्रपतींनी निवडलेले असे राज्यसभेचे खासदार झाले.
प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदीवेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मकइतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला.
14.लालबहादूर शास्त्री (मरणोत्तर)(१९०४-१९६६)
1966 साली भारतरत्न.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक व भारतीय प्रजासत्ताका चेदुसरे पंतप्रधान होते.(जुन ९, इ.स. १९६४ – जानेवारी ११, इ.स. १९६६)
विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर याचा त्यांनी पुरस्कार केला. काशी विद्यापीठाचे ‘शास्त्री’ झाले.(त्यांचे मूळ आडनाव ‘श्रीवास्तव’ हे होते.) ‘सर्व्हटस ऑफ दि पीपल्स’ सोसायटीचे सदस्य झाले.’जय जवान, जय किसान’ हा घोषणामंत्र त्यांनी दिला.
सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तान बरोबर युद्धबंदीचा ताश्कंद(तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे करार करण्यासाठी दौऱ्यावर असताना १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली.
15.इंदिरा गांधी(१९१७-१९८४)
1971साली भारतरत्न.
वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली “वानर सेना’ नावाची संघटना स्थापन केली.
वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या.
त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
१४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण(१९६९) आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी(१९७४) , ऑपरेशन ब्ल्यू स्टार(१९८४) या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला.
कम्युनिस्टांनी आणीबाणी काळात इंदिरा गांधीना काही अटीवर पाठींबा दिला.
16.वराहगिरी वेंकट गिरी(१८९४-१९८०)
1975 साली भारतरत्न.
वराहगिरी वेंकट गिरी किंवा व्ही.व्ही. गिरी हे भारतदेशाचे चौथे राष्ट्रपती होते.
केंद्रीय राजकारणात शिरण्याआधी उत्तर प्रदेश (१९५६-६०), केरळ (१९६०-६५) व म्हैसूर (१९६५-६७) राज्यांचे राज्यपाल होते
राष्ट्रपतीपदावर निवड होण्याआधी ते काही काळ कार्यवाहू राष्ट्रपती व त्याआधी उपराष्ट्रपती पदावर होते(१९६७-१९६९).
17.के. कामराज (मरणोत्तर)(१९०३-१९९५)
1996 साली भारतरत्न.
भारतीय स्वतंत्र चळवळीत भाग, मद्रास राज्याचे मुख्यमंत्री.
18.मदर तेरेसा(१९१०-१९९७)
1980 साली भारतरत्न.
१९७९ साली त्यांना शांतेतेचे नोबेल मिळाले.
त्या मुळच्या अल्बानियाच्या होत्या.
ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक. मदर तेरेसा धाडसी होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स.१९८२ मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरतासमझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली.त्या स्वत: युद्धभूमीवर हिंडल्या. पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता, त्या वेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटीज’चा प्रसार केला. इथिओपियामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला.त्या तिथे गेल्या, ज्या काळात चेर्नोबिलच्या किरणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला.
19.आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)(१८९५-१९८२)
1983 साली भारतरत्न
ते समाज नेतृत्वासाठी दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी होते.
ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक व भूदान चळवळीचेप्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
पुस्तके:
अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई, गीताई-चिंतनिका, गीता प्रवचने, गुरुबोध सार(सार्थ, जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, मधुकर, मनुशासनम् (निवडक मनुस्मृती – मराठी), लोकनीती, विचार पोथी,साम्यसूत्र वृत्ति, साम्यसूत्रे, स्थितप्रज्ञ-दर्शन
20.खान अब्दुल गफार खान(१८९०-१९८८)
1987 साली भारतरत्न.
सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते.भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे दुसरे अभारतीय आहेत.
21.एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर)(१९१७-१९८७)
1988 साली भारतरत्न
चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचेमुख्यमंत्री
इ.स. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघमपक्ष स्थापला. इ.स. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले.
22.डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर)(१८९१-१९५६)
1990 साली भारतरत्न.
भारतीय राज्य घटनेचेचे शिल्पकार, अर्थतज्ञ , उदारमतवादी राजकीय नेते.
23.नेल्सन मंडेला(१९१८-२०१३)
1990 साली भारतरत्न.
द. अफिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष.
नेल्सन मंडेला यांचे मूळ इंग्रजीतले ’लाँन्ग वॉक टु फ्रीडम’ हे आत्मचरित्र.
वर्णभेदविरोधी चळवळीचे प्रणेते.
24.राजीव गांधी (मरणोत्तर)(१९४४-१९९१)
1991 साली भारतरत्न.
भारताचे सातवे पंतप्रधान इ.स. १९८८मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टे सोबतच्या संघर्षात झाली राजीव गांधीनी तंत्रज्ञानसंबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली. संगणक, दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले. लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले. १९९१ मध्ये लोकसभेच्या प्रचारादरम्यान LTTE च्या तमिळ आतंकवाद्याकडून त्यांची हत्या झाली.
25.सरदार वल्लभ भाई पटेल( मरणोत्तर)(१८७५-१९५०)
1991 साली भारतरत्न.
सरदार वल्लभभाई पटेल भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले.त्यांना सरदार ह्या पदवीने संबोधित केले जाई.वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले.गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचेते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले.भारत छोडो आंदोलनातते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापने करिताही त्यांनी कार्य केले.सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळपडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच ते भारताचे लोहपुरूष म्हणून ओळखले जातात.सरदार पटेलहे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते.
26.मोरारजी देसाई(१८९६-१९९५)
1991 साली भारतरत्न.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, भारताचे पाचवे पंतप्रधान(१९७७-१९७९).
27.मौलाना अबुलकलाम आझाद (मरणोत्तर)(१८८८-१९५८)
1992 साली भारतरत्न.
हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. १९४२ ची क्रिप्स योजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिशमंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेस तर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेर पर्यंत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौलेफैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे.ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे.
ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यामुळे त्यांचा ११ नोवेंबर हा जन्मदिन शिक्षणदिन म्हणून साजरा केला जातो.
28.जे. आर. डी. टाटा(१९०४-१९९३)
1992 साली भारतरत्न.
जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात. टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना इ.स. १९५७साली पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.
29.सत्यजित रे(मरणोत्तर)(१९२२-१९९२)
1992 साली भारतरत्न.
सत्यजित रे हे ऑस्कर पुरस्कार विजेते भारतीय लेखक, पटकथा लेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते. चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरी बद्दल इ.स. १९९२मध्ये त्यांना जीवन गौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष व इ.स. १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली.
30. गुलझारी लाल नंदा(१८९८-१९९८)
1997 साली भारतरत्न.
भारताचे उपपंतप्रधान.
पंडित नेहरू यांच्या मृत्यू नंतर काही काळ काळजीवाहू पंतप्रधान.
31.अरुणा आसफ अली (मरणोत्तर)(१९०९-१९९६)
1997 साली भारतरत्न.
१९४२ च्या छोडो भारत आंदोलनादरम्यान त्यांनी गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला.
जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांच्या बरोबर भूमिगत चळवळी च्या माध्यमातून काम केले. त्या समाजवादी कॉंग्रेस च्या सदस्य होत्या.
काही काळ काँग्रेस पक्षाच्या “इन्कलाब” या मासिकाच्या संपादक होत्या. स्वातंत्र्या नंतर त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या दिल्लीच्या पहिल्या महापौर होत्या.
32.ए. पी. जे. अब्दुल कलाम
1997 साली भारतरत्न.
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद.), ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुलकलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० :नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ यानावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते) इंडिया – माय-ड्रीम, एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन.विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद.सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन),टर्निंग पॉइंट्स, दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी).
33.एम.एस. सुब्बुलक्ष्मी(१९१६-२००५)
1998 साली भारतरत्न.
कर्नाटक शैलीतील गायिका.
रमण मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय गायिका.
34.चिदंबरम् सुब्रमण्यम्(१९१०-२०००)
1998 साली भारतरत्न.
केंद्रीय मंत्री म्हणून श्री. सुब्रमण्यम यांचे काम अनन्यसाधारण आहे. ज्येष्ठ नेते कृषी खाते सांभाळण्यास तयार नसताना पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी त्यांना हे खाते सोपविले. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्णते कडे नेण्यासाठी विविध योजना राबवून श्री. सुब्रमण्यमयांनी शास्त्रीजींचा विश्वास सार्थकी ठरविला. देशोदेशीचे उत्कृष्ट बियाणे वापरण्यास त्यांनी शेतकर्यांना प्रवृत्त केले व १९७२ मध्ये भारतात गव्हाचे सर्वाधिक पीक निघाले आणि ही हरितक्रांतीची नांदी ठरली. या त्यांच्या कृषिविषयक नव्या धोरणामुळे ‘आधुनिक कृषी धोरणाचे शिल्पकार’ अशी त्यांची ओळख झाली.
१५ फेब्रुवारी १९९० मध्ये ते महाराष्ट्रराज्या चे राज्यपाल झाले हे पद सोडल्यानंतर भारतीय विद्या भवन या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले. केंद्र सरकारच्या एरोनॉटिक्स उद्योग समिती चे अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष इ.महत्त्वाची पदेही त्यांनी संभाळली. १)‘वॉर ऑन पॉवर्टी’,२) ‘सम कंट्रीज हिच आय व्हिजिटेड राऊंड द्र वर्ल्ड’ , ३)‘द्र इंडिया ऑफ माय ड्रीम‘ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली.
देश वर्षानुवर्षे अन्नधान्य आयात करत असतानाच सुब्रमण्यम यांच्या मुळे झालेल्या कृषी क्षेत्रातील क्रांतीने संपुर्ण जगभर त्यांचे कौतुक झाले.तसेच अर्थमंत्री असतांना ‘प्रादेशिक ग्रामीण बँका’(RRBs) सुरु करून बँकांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोचवून या भागाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सुब्रमण्यम यांनी शेतकर्यांसाठी व ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे.
35.जयप्रकाशनारायण (मरणोत्तर)(1902-1979)
1999 साली भारतरत्न.
१९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भूमिगत चळवळीतून कार्य.
लोक सेवे साठी १९६५ मध्ये रमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
पाटणा विमानतळाला त्यांचे नाव देण्यात आले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते.
36.अमर्त्य सेन
1999 साली भारतरत्न.
अमर्त्य सेन हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांना ‘कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त’ (Welfare Economics and Social Choice Theory ) या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मिती साठी २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे हे अध्यक्ष आहेत. अमर्त्य सेन यांची पुस्तके मागील ४० वर्षात ३० हून अधिक भाषांत प्रकाशित झाली आहे.
त्यांनी लिहिलेली काही पुस्तके:
1999 साली भारतरत्न.
भारतीय स्वतंत्र लढ्यात मोलाचे योगदान. “लोकप्रिय” हि उपाधी.
आसामचे मुख्यमंत्री.
38.रवीशंकर(१९२०-२०१२)
1999 साली भारतरत्न.
पंडित रविशंकर, हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे सतार वादनातील सद्यकालीन श्रेष्ठतम वादक मानले जातात.अभिजात भारतीय संगीतातील माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
39.लतामंगेशकर (जन्म१९२९)
2001 साली भारतरत्न.
40.बिसमिल्ला खान(१९१६-२००६)
2001 साली भारतरत्न.
शहनाई वादक.
41.भीमसेन जोशी(१९२२-२०११)
2008 साली भारतरत्न.
‘हिंदुस्तानी अभिजात’ संगीत परंपरेतील गायक.
‘खयाल’ ह्या गायन प्रकारासाठी प्रसिध्द.
इ.स. १९७२साली पद्मश्री पुरस्कार
इ.स. १९७६सालचा संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार
इ.स. १९८५सालचा पद्मभूषण पुरस्कार.
जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्यही पदवी दिली.
पुण्याच्या टिळक विद्यापीठाने डी. लिट्.ही पदवी दिली.
इतर पुरस्कारांमध्ये पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.
पुणे आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले आहे.
42.सचिन रमेश तेंडुलकर
2014 साली भारतरत्न.
१९९८ – राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार.
१९९९ – पद्मश्री.
२००८ – पद्म विभूषण.
आत्मचरित्र – “Playing it My Way”
43.चिंतामणी नागेश रामचंद्र राव
2014 साली भारतरत्न.
१९७४ – पद्मश्री.
१९८५ – पद्म विभूषण.
घन अवस्था आणि रचनात्मक रसायनशास्त्र(solid state and structural chemistry) यामध्ये मुख्यत्वे संशोधन केले.
रावांनी इ.स. १९५१ साली म्हैसूर विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली. पुढील दोन वर्षांत त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर ते पीएच.डी. अभ्याक्रमासाठी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात प्रवेश घेतला व इ.स. १९५८ साली पीएच.डी मिळवली. त्यांनी इ.स. १९६३ ते इ.स. १९७६ या काळात कानपुरातील भारतीय प्रौद्योगिकी संस्थेच्या रसायनशास्त्र विभागात, तर इ.स. १९८४ ते इ.स. १९९४ या काळात बंगळुरातील भारतीय विज्ञान संस्थेत अध्यापन केले.
सध्या (इ.स. २०११) ते बंगळुरातील जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र येथे संशोधक प्राध्यापक व मानद अध्यक्ष म्हणून काम करतात.

- Argumentative Indians, 2.Idea of Justice, 3. An Uncertain Glory: India and its Contradictions, 4.Development as Freedom, 5. Rationality and Freedom.

No comments:
Post a Comment