Monday, 7 September 2015

☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆★

१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा
२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे
३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी
४) शहाजीराजे - होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे (कर्नाटक)
५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)
६) छत्रपती शिवाजी महाराज - रायगडावर
७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड
८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड
९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू) कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल
१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरले पुत्र)- वडू कोरेगाव
११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर
१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र)- साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधान मंडळातील मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी
१४) मकुबाई (शिवरायांच्या भावजयी, संभाजीराजे शिवरायांचे थोरले बंधू) - जिंती, ता. करमाळा, जि. सोलापूर
१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
      प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर, हंबिरराव मोहिते- तळकीड, ता. कराड
१६) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)
१७) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि. नाशिक
१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप (गाधवड, जि. पुणे)
१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -उमरळ
२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)- पारगड
२१) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता. आटपाटी, जि. सांगली
२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्र भाऊ - परळी (रायगडाजवळ)
२३) शिवा काशिद - पन्हाळगड
२४) कान्होजी जेधे आणि जिवा महा- कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे
२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर
२६) संभाजी कावजी - कोंडावळे, ता.मुळशी, जि. पुणे
२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग (चाकण) पुणे
२८) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)
२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू - विशाळगड
३०) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू) निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.
३१) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर
३२) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच नावाने आहे) - बीड
३३) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर 
३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा 
३५) हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण - अणदूर, ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद 
३६) अन्नूबाई (पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.उस्मानाबाद 
                                                           आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत. त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील पिढीला प्रेरणा देणारी असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे...!

Monday, 31 August 2015

श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी यांची सत्यकथा..!

🌺सुंदर बोधकथा🌺
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
                                          तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला

तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
"तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
👉क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते. So be careful and take care.



🌹 Life is very Beautiful 🌹 Good से God तक 🙏

Saturday, 22 August 2015

आर्थर अँश हा विम्ब्लडनमधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू..!

"१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला एड्सची लागण झाली.
त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
            यशस्वी लोक आपल्या
            निर्णयाने जग बदलतात
             आणि अपयशी लोक
            जगाच्या भीतीने आपले
               निर्णय बदलतात...!"

Saturday, 15 August 2015

जनरल नालेज...adsir

1. भारतीय संसदीय व्यवस्थेचा _____________ हा केंद्रबिंदू आहे.
उत्तर >> पंतप्रधान

2. महाराष्ट्र शासनाने लोकशाही विकेंद्रीकरण समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती ?
उत्तर >> वसंतराव नाईक

3. खालीलपैकी कोणत्या दिवशी घटना समितीने भारतीय राज्यघटनेला मान्यता दिली ?
उत्तर >> 26 नोव्हेंबर 1949

4. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पध्दती __________ रोजी सुरू झाली.
उत्तर >> 1 मे 1962

5. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत _________ सभासद संख्या आहे.
उत्तर >> २८८

6. भारतीय संविधानाने एका ___________________ निर्मिती केली आहे.
उत्तर >> प्रबळ संघराज्याची

7. राष्ट्रपती पदाच्या उमदेवाराने वयाची _____ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
उत्तर >> 35

8. भारतीय राज्य घटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे ?
उत्तर >> जम्मू आणि काश्मीर

9. ग्रामपंचायतीच्या पंचांची निवडणूक ________ पध्दतीने होते.
उत्तर >> प्रौढ मतदान

10. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे ___________ कार्य आहे.
उत्तर >> कल्याणकारी

11. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात ?
उत्तर >> C-14

12. जपानमध्ये आढळलेला मिनामाटा आजार ___________ मुळे झाला.
उत्तर >> पारा (Hg) विषबाधा

13. लोखंडाचा सर्वात शुध्द प्रकार _______ हा आहे.
उत्तर >> रॉट आयर्न

14. खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरीत्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात ?
उत्तर >> Pt,Au

15. गवत-नाकतोडा-बेडूक-साप-गरूड या अन्नसाखळीस काय म्हणतात ?
उत्तर >> गवताळ परिसंस्था

16. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?
उत्तर >> आयाम

17. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो ?
उत्तर >> 76 सेमी | 29.9 इंच | 1013.2 मिलीबार

18. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भौतिकशास्त्राचे नोबेल परितोषिक मिळाले नाही ?
उत्तर >> जगदीशचंद्र बोस

19. भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन (Nuclear Fuel) भारताच्या समुद्र किनाऱ्यावरच्या मोनाझाईट वाळूत सापडते. या अणुइंधनाचे नाव काय आहे ?
उत्तर >> थोरीयम

20. ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्ट करता येत नाही परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते हा थर्मोडायनॅमिक्सचा कोणता नियम आहे ?
उत्तर >> पहिला नियम

Sunday, 9 August 2015

काही संक्षिप्त रुपे..competitive exams.करिता

लक्ष्यात ठेवण्याच्या काही SAIMkatta ट्रिक्स:-
=>भारतामधून पश्चिमेकडून पूर्वकडे जाणारे कर्कवृत:-
( गुझाती रामपंछमी )
गु-गुजरात
झा-झारखंड
ती-त्रिपुरा
रा-राजस्थान
म-मध्यप्रदेश
पं-पं बंगाल
छ-छतीसगड
मी-मिझोराम
=>महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ति:-
(मका आबा जे भीम कर)
म -महर्षी कर्वे-1958
का -काणे वामन पांडुरंग-1963
आ-आचार्य विनोबा भावे-1883
बा-बाबासाहेब आंबेडकर-1990
जे-जे आर डी टाटा-1992
भी-भीमसेन जोशी-2000
म-मंगेशकर लता-2001
कर-तेंडूल कर सचिन-2013
=>भारतरत्न पुरस्कार प्राप्त महिला:-
( इंदिरा MASL बनव किंवा इंदिरा MMAL)
इंदिरा-इंदिरा गांधी-1971
M-मदर तेरेसा-1980
A-अरुणा असफअली-1997
S-शुब्बलक्ष्मी एम एस-1998
L-लता मंगेशकर-2001
          किंवा
इंदिरा-इंदिरा गांधी
M-मदर तेरेसा
M-एम एस सुब्बलक्ष्मी
A-अरुणा असफअली
L-लता मंगेशकर
=> G-8 देश
ACF JEJE R   (ACF जेजेआर )
A-अमेरिका
C-कैनडा
F-फ्रांस
J-जर्मनी
E-ईटली
J-जपान
E-इग्लंड
R-रशिया
------------------------------
------
=> G-5 देश
MBBS C
M-मेक्सिको
B-भारत
B-ब्राझील
S-सा.आफ्रिका
C-चीन
------------------------------------
=>G-20 सदस्य देश
AAP MUJE ABCD STR लगे
A = आर्जेन्टीना
A= आस्ट्रेलीया
P = फ्रांस
M = मेक्सिको
U = युरोपीय महासंघ
J = जर्मनी, जपान
E =  इटली, इंडोनेशिया
 A = अमेरिका
B = ब्राझील, ब्रिटन, भारत
C = चीन, कॅनडा  
D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया
 S = सौदी अरेबिया
T = तुर्कस्तान
R = रशिया
------------------------------------
=>सार्क सदस्य देश
MBBS PANI
M-मालदीव
B-भूटान
B-बांग्लादेश
S- श्रीलंका
P-पाकिस्थान
A-अफगानिस्थान
N-नेपाळ
I-इंडिया
------------------------------------
=>पंचायतराज स्वीकारणारे राज्य:-
RAAT KO PUMP
रात को पम्प लाना है.
R-राजस्थान
A-आंधप्रदेश
A-आसाम
T-तामीडनाडू
K-कर्नाटक
O-ओरिसा
P-पंजाब
U-उत्तर प्रदेश
M-महाराष्ट्र
P-प.बंगाल.
------------------------------------
=>विधानपरिषद असलेले सात राज्य...
आज उमक TB न मेला
आ-आंधप्रदेश
ज-जम्मू काश्मीर
उ-उत्तर प्रदेश
म-महाराष्ट
क-कर्नाटक
T-तेलंगाना
B-बिहार
------------------------------------
=>भारताच्या इतर देशाच्या सीमा
बचपन MBA
ब-बांग्लादेश
च-चीन
प-पाकिस्थान
न-नेपाळ
M-म्यानमार
B-भूटान
A-अफगानिस्थान
------------------------------------
=> महाराष्ट्रातील इतर राज्याच्या सीमा
MKG G  AC
मोहनदास करमचंद गांघी गुजरात मध्ये AC त बसत होते.
M-मध्यप्रदेश
K-कर्नाटक
G-गोवा
G- गुजरात
A-आंध्रप्रदेश
C-छतीसगड
------------------------------------
=>सर्वाधिक क्ष्रेत्रफळ असलेले देश
RCC AB AB
R-रशिया
C-कँनडा
C-चीन
A-अमेरिका
B-ब्राझील
A-आस्ट्रेलिया
B-भारत

Saturday, 1 August 2015

RTE- 2009 चे 38 कलमे व त्यांचा अर्थ..

  • RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे....
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार..

                                                          धन्यवाद...!

Monday, 27 July 2015

Health is Wealth

🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर 🍎
तुडुंब भरलेले सभागृह, अगदी खुर्च्यांच्या रागांमधल्या मोकळ्या जागेत जमिनीवर आणि स्टेजवरही ठिय्या मांडून बसलेले प्रेक्षक, आहाराविषयीच्या शंकाचे निरसन करून घेण्यासाठीची उत्सुकता अशा वातावरणात ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात रंगलेल्या 'म. टा. संवाद'मध्ये आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. आहार आणि आरोग्य यांविषयी लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व, घरच्या जेवणाची लज्जत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या यूथ आयकॉन ठरलेल्या दिवेकर यांनी पटवून सांगितली. 'जे आवडते तेच खा' असा मूलमंत्र देत चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. करिना कपूरसारख्या अभिनेत्रीपासून ते कॉर्पोरेट जगतातील उच्चपदस्थांपर्यंत अनेकांना सल्ला देणाऱ्या आणि विक्रमी खपाची तीन पुस्तके लिहिणाऱ्या दिवेकर यांच्यासोबतच्या संवादाने अनेकांच्या प्रश्नांचे निरसन झाले.
🍲 नियोजनबद्ध आहार कोणता?
आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🏃वाढलेली चरबी कशी कमी करावी?
आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🍇कोणती फळे खावीत?
आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.
🍌मधुमेहासाठी आहार कसा असावा?
खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🚫शुगर-फ्रीचा वापर करावा का?
शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
😇वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?
वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🍲कडधान्य कशी खावीत..
आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.
🍲जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?
शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🚫आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?
शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.
🙅आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?
आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
✌दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?
सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.
🍚घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?
चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
👨👩वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?
वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.
💧सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?
सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.
🍲साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?
प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा.
💁तुमच्या कामाची सुरुवात कशी झाली?
मी काम साधारण १९९९ मध्ये काम सुरु केलं. त्यावेळी सामान्य माणसे फिटनेस तज्ज्ञांकडे वळत नसत. त्यावेळी लाली धवन आणि फराह यांना मी सर्वप्रथम मार्गदर्शन केलं. त्यानंतर २००३ सालापासून आपल्या अर्थव्यवस्थेत बदल झाला. अनेक लोक या शाखेकडे वळू लागले आणि मग माझं या क्षेत्रातलं नियमित काम सुरू झालं.
🙆केस, त्वचेसाठी काय सल्ला द्याल?
केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
🌞आपला दिवस कसा असतो?
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.
............
👨महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरात पतीने मदत केली, तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यास पत्नीला मदत होऊ शकते. नोकरी करून पुन्हा घरातील कामांचा डोंगर सांभाळताना महिलांची कसरत होते. त्यामुळे स्वयंपाकातील लहान कामांमध्ये मदत केल्यास कमी वेळात उत्तम स्वयंपाक तयार होण्यास निश्चित मदत होईल.
✌दर दोन तासांनी खा
🍌फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा
🍲नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा
🍷जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या
🍎जेवणानंतर एखादे फळ खा
🍲संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात
😇 रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या
हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/health-wealth/rujuta-diwekar-diet-chart/articleshow/47143838.cms

Tuesday, 21 July 2015

We are Indians..I Proud

आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
1. भारताने लावलेले शोध
🔸A. बुद्धिबळ
🔸B. शून्य
🔸C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला
🔸D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील
संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.
🔸E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात
हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
🔸F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत
आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव
यासारख्या सर्जरी करायचे.
🔸G. योग - ५००० वर्षांपूर्वी
🔸H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता
आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.
🔸I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध
डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.

🔸J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला
विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे
आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
🔸K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात
श्रीमंत देश होता.
🔸L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर
देशावर विनाकारण हल्ला केला नाही.
🔸M. भारताबाहेर:
i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.
ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.
iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
🔸N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील
एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान
यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा
एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी
होता.
२००८मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने
वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
🔸O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
🔸P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात
भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि
मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.
🔸Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.
🔸R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
🔸S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.
🔸T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत.
🔸U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६
करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका
विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस
हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील
सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.
m. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख
लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक
मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.
🔸V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे.
दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबे
पुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही.
o. १३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज
असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे.
🔸W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव
बँक आहे.
🔸X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत
पहिल्या ५० मध्ये आहेत.
🔸Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा
विश्वविक्रम नोंदविला आहे.
🔸Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.
🔸A. जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे.
ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
🔸B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, शिवाजी
महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग, टिपू सुलतान, देशासाठी
प्राण त्यागलेले आणि प्राणपणाने लढलेल्या वीरांचा इतिहास असलेला
भारत हा जगातील एकमेव देश आहे. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
🔸१८ प्रमुख भाषा,
🔸१,६०० द्वितीय भाषा,
🔸२९ प्रमुख सण,
🔸६,४०० जाती आणि उपजाती
🔸  ७ संघराज्य,
🔸२९ राज्य,
🔸६ मोठे धर्म,
🔸५२ मोठ्या जमाती
इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮
🇳

Wednesday, 15 July 2015

तुम्हाला हे माहित आहे का ?

महान हस्तियों का जन्म...
Jan...
12-1-1863 स्वामी विवेकानंद
28-1-1865 लाला लजपतराय
1-1-1894 जगदीश चंद्र बोंज
23-1-1897 सुभाष चंद्र बोंज
13-1-1949 राकेश शर्मा
20-1-1900 जनरल के.ऍम.    करिअप्पा
------------------------------
------------
Feb...
18-2-1486 महाप्रभु चेतन्य
18-2-1836 रामकुष्ण परमहंस
22-2-1873 मोहम्मद इकबाल
13-2-1879 सरोजिनी नायडु
29-2-1896 मोरारजी देसाइ
------------------------------------------
March...
23-3-1910 डॉ. राममनोहर लोहिया
------------------------------------------
April...
15-4-1469 गुरु नानक देवजी
14-4-1563 गुरु अर्जुन देवजी
14-4-1891 डॉ.भीमराव                   आंबेडकर
------------------------------------------
May...
5-5-1479   गुरु अमरदास
31-5-1539 महाराणा प्रताप
6-5-1861   मोतीलाल नेहरु
7-5-1861   रविन्द्रनाथ टेगोर
9-5-1866   गोपालकृष्ण गोखले
24-5-1907 महादेवी वर्मा
2-5-1921   सत्यजित राय
------------------------------------------
Jun...
26-6-1838 बंकिमचंद्र चट्टो         पाध्याय
------------------------------------------
July...
23-7-1856 लोकमान्य तिलक
31-7-1880 प्रेमचंद मुनशी
29-7-1904 जे. आर. डी. टाटा
------------------------------------------
Aug...
27-8-1910  मधर टेरेसा
29-8-1905  ध्यानचंद
------------------------------------------
Sept...
26-9-1820 ईश्वरचंद्र           विद्यासागर
4-9-1825  दादाभाई नवरोजी
10-9-1887 गोविंद वल्लभ पंत
5-9-1888  डॉ. राधाकृष्ण
11-9-1895 विनोबा भावे
27-9-1907 भगतसिंह
15-9-1861 ऍम.विश्वसरेइया
15-9-1876 शरदचंद्र चटोपाध्याय
------------------------------------------
Oct...
1-10-1847 डॉ. ऐनी.बेसन्ट
2-10-1869 महात्मा गांधीजी
22-10-1873 स्वामी रामतीर्थ
31-10-1875 सरदार वल्लभभाई पटेल
31-10-1889 आचार्य नरेन्द्रदवे
11-10-1902 जयप्रकाश नारायण
30-10-1909 डॉ. होमी भाभा
19-10-1920 पांडुरंग शास्त्रीजी
आठवले पु. दादा
------------------------------------------
Nove...
13-11-1780 महाराणा रणजीतसिंह
4-11-1845 वासुदेव बळवंत फडके
7-11-1858 बिपिनचंद्र पाल
30-11-1858 जगदीशचंद्र बोज
5-11-1870 देशबंधु चितरंजनदास
11-11-1888 मौलाना आज़ाद
4-11-1889 जमनालाल बजाज
19-11-1917 श्रीमती इंदिरागांधी
23-11-1926 श्री सत्यसाई बाबा
4-11-1939 शकुंतलादेवी
12-11-1896 सलीमअली
------------------------------------------
Des...
9-12-1484 महाकवि सूरदास
25-12-1861 मदनमोहन मालविया
27-12-1869 ठक्कर बापा
7-12-1879 चक्रवर्ती राजगोपालचारी
3-12-1884 डॉ. राजेन्द्रप्रसाद
30-12-1887 कनैयालालमुनशी
11-12-1931 राजेन्द्रकुमार जेन ओसो रजनीश
22-12-1887 रामानुजम

 भारत के प्रमुख पदाधिकार.....

 * राष्ट्रपति - श्री प्रणब मुखर्जी
 * उप राष्ट्रपति - श्री हामिद अंसारी
 * प्रधान मंत्री - श्री नरेंदर मोदी
 * लोकसभा अध्यक्ष - श्रीमती सुमित्रा महाजन
 * सर्वोच्च न्यायलय के मुख्य न्यायधीश -  श्री एच एल दत्तू
 * राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के अध्यक्ष - श्री के. जी.बाल क्रष्णन
 * राष्ट्रीय महिला आयोग के अध्यक्ष - श्रीमती कुमारमंगलम्
 * मुख्य चुनाव आयुक्त - श्री एच एस ब्रम्हा
 * अटार्नी जनरल-  श्री मुकुल रोहतगी
 * सोलिसिटर जनरल - श्री रनजीत कुमार
 * राष्ट्रीय विधि आयोग के अध्यक्ष - श्री ए पी शाह
 * राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार- श्री अजीत कुमार डोवल


भारत के सभी राज्यों के वर्तमान मुख्यमंत्री
**********************************************
राज्य ---- मुख्यमंत्री
तेलंगाना ----- के चंद्रशेखर राव
आन्ध्र प्रदेश ---- चन्द्रबाबू नायडू
अरुणाचल प्रदेश ---- नबम तुकी
असम ---- तरुण गोगोई
बिहार ........नितिश कुमार
छत्तीसढ ---- रमन सिंह
दिल्ली ------ अरविंद केजरीवाल
गोआ ----- लक्ष्मीकांत परेस्कर
गुजरात ----- आनंदीबेन पटेल
हरियाणा ----- मनोहर लाल खट्टर
हिमाचल प्रदेश ----- वीरभद्र सिंह
जम्मू और कश्मीर ----- मुफ्ती मुहम्मद
झारखण्ड ---- रघुवर दास
कर्नाटक ----- सिद्धारैया
केरल ------ ओमान चांडी
मध्य प्रदेश ------ शिवराज सिंह चौहान
महाराष्ट्र ----- देवेन्द्र फड़नवीस
मणिपुर ----- ओकराम इबोई सिंह
मेघालय ----- मुकुल संगमा
मिज़ोरम पु ----- ललथानवाला
नागालैण्ड ----- टी आर जेलियांग
ओडिशा ----- नवीन पटनायक
पॉण्डिचेरी ---- एन. रंगास्वामी
पंजाब ---- प्रकाश सिंह बादल
राजस्थान ---- वसुंधरा राजे सिंधिया
सिक्किम ---- पवन कुमार चामलिंग
तमिलनाडु ----ओ. पनीरसेल्वम्
त्रिपुरा ------ माणिक सरकार
उत्तराखण्ड ------ हरीश रावत
उत्तर प्रदेश ------ अखिलेश यादव
पश्चिम बंगाल ------ ममता बनर्जी

:::::: 🔴पंचायती राज🔴:::::::
🔴 संविधान के किस भाग में पंचायती राज व्यवस्था का वर्णन है— भाग-9
🔴पंचायती राज व्यवस्था किस पर आधारित है— सत्ता के विकेंद्रीकरण पर
🔴 पंचायती राज का मुख्य उद्देश्य क्या है— जनता को प्रशासन में भागीदारी योग्य बनाना
🔴किसके अंतर्गत पंचायती राज व्यवस्था का वर्णन है— नीति-निर्देशक सिद्धांत
🔴 संविधान के किस संशोधन द्वारा पंचायती राज संस्थाओं को संवैधानिक दर्जा दिया गया है— 75वें संशोधन
🔴75वें संशोधन में कौन-सी अनुसूची जोड़ी गई हैं— 11वीं
🔴पंचायती राज संस्थाओं के निर्वाचन हेतु कौन उत्तरदायी है— राज्य निर्वाचन आयोग
🔴 भारत में पंचायती राज अधिनियम कब लागू हुआ— 25 अप्रैल, 1993
🔴सर्वप्रथम पंचायती राज व्यवस्था कहाँ लागू की गई— नागौर, राजस्थान में
🔴 राजस्थान में पंचायती राज व्यवस्था कहाँ लागू की गई— 1959 को
🔴देश के सामाजिक व सांस्कृतिक उत्स्थान के लिए कौन-सा कार्यक्रम चलाया गया— सामुदायिक विकास कार्यक्रम
🔴 भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरंभ हुआ— 2 अक्टूबर, 1952
🔴 किसकी सिफारिश पर भारत में पंचायती राज व्यवस्था की स्थापना की गई बलवंत राय मेहता समिति
🔴पंचायती राज की सबसे छोटी इकाई क्या है— ग्राम पंचायत
🔴 बलवंत राय समिति के प्रतिवेदन के अनुसार महत्वपूर्ण संस्था कौन-सी है— पंचायत समिति
🔴 पंचायती राज संस्थाओं के संगठन के दो स्तर होने का सुझाव किसने दिया था— अशोक मेहता समिति

         नदियों के किनारों पर बसे विश्व के प्रमुख नगर...

नगर  -   नदी
मास्को - मोस्कवा नदी
कोलम्बो-  केलानी नदी
बगदाद  -टिगरिस नदी
नई दिल्ली-  यमुनानदी
बेलग्रेड - डेन्यूब नदी
आगरा - यमुनानदी
बर्लिन - स्ट्री नदी
हरिद्वार - गंगा नदी
बुडापेस्ट - डेन्यूब नदी 
कानपुर  गंगानदी
काहिरा  नील नदी
नासिक  गोदावरी नदी
करांची   सिन्धु नदी
उज्जैन  क्षिप्रा नदी
लन्दन   टेम्स नदी
श्रीनगर  झेलमनदी
लाहौर  रावी नदी
इलाहाबाद  गंगा-यमुना
न्यूयार्क  हडसन नदी
अहमदाबाद  साबरमती
पेरिस  सीन नदी 
कोलकात्ता   हुगली
रोम  टाईबर नदी
गुवाहाटी - ब्रह्मपुत्र
शंघाई  -यांगटिसिक्यांग
जबलपुर- नर्मदा
टोकियो -  सुमीदा नदी
सूरत - ताप्ती
विएना -  डेन्यूब नदी 
हैदराबाद  - मूसी
वारसा   -विस्तुला नदी
लखनऊ  -गोमती
वाशिंगटन  - पोटोमेक नदी ।

Wednesday, 8 July 2015

'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही..!

अतिशय सुरेख आणि सूज्ञ पालकांसाठी डोळे उघडणारा झणझणीत लेख: 
'मार्क'म्हणजेच गुणवत्ता नाही!
डॉ. अरुण नाईक,
(मानसोपचारतज्ञ) -



नुकतीच एक बातमी वाचली....
नेहमी चांगले मार्क मिळवणाऱ्या
मुलीला दहावीचा पहिला पेपर चांगला नाही गेला. संध्याकाळी
तिने आत्महत्या केली. अजून
परीक्षाही संपली नाही.
पण मुलगी संपली.
मागे एका
मेडिकलच्या विद्यार्थ्यांने
शेवटच्या वर्षांला गोल्ड मेडल ऐवजी सिल्वर मेडल मिळाले,
म्हणून आत्महत्या केली होती.
माणूस मरायला घाबरत नाही, पण किंमतशून्य जगायला
घाबरतो.

एका नामांकित
शाळेच्या स्कॉलर वर्गातील
मुलांशी बोलताना मी त्यांना विचारले की,
"सर्वजण त्यांना
काय म्हणतात?"
मुले म्हणाली,
की 'स्कॉलर'.
मी विचारले 'का?',
मुले म्हणाली,
कारण आम्हाला
चांगले मार्क मिळतात.
मी समीकरण मांडले.
'अ = ब'
व
'ब = क'
त्याअर्थी 'अ = क'.
म्हणजेच,
'मी = स्कॉलर'
व
'स्कॉलर = मार्क'.
याचा
अर्थ 'मी = मार्क'.

जेव्हा आपण आपली किंमत मार्कावरून करायला लागतो,
तेव्हा जरा मार्क कमी मिळाले की,
आपली किंमत कमी झाली
असे वाटते.
सर्व परीक्षा बोर्डानी
मार्क वाटायला सुरुवात
केल्यापासून तर हे समीकरण पालक व मुले यांच्या डोक्यात
गच्च बसायला लागले आहे.
हे धोकादायक आहे....

माझी भाची शाळेतही जात
नसताना तिने काढलेल्या एका
चित्राला मी 'वा' म्हटले.
ती
लगेच म्हणाली-मार्क दे.
मी चित्राच्या बाजूला लिहिले 'छान'.
ती म्हणाली मार्क दे. शंभरपैकी.
अडूनच बसली.
शाळेत जायच्या आधीपासूनच हे
डोक्यात शिरत आहे. हे
आजूबाजूच्या वातावरणात आहे.
या विषारी वातावरणाने वरील
बळी घेतले आहेत.
जेव्हा
कधी पालकांना विचारले की,
तुमच्या मुलांबाबत काय व्हावे असे तुम्हाला वाटते? तेव्हा
हमखास उत्तर येते की,
तो चांगला नागरिक बनावा, चांगला माणूस बनावा.
जरा विरोधाभास
पाहूया...
मेडिकलच्या विद्यार्थ्यांशी
बोलताना त्यांनी सांगितले की
त्यांना चांगला डॉक्टर बनायचे आहे.
मी विचारले चांगला
डॉक्टर कोणाला म्हणता? तर
मुले म्हणाली की,
जो जास्तीत जास्त लोकांना चांगल्यात चांगला उपचार
देऊन बरा करतो तो. सिल्वर
मेडल मिळालेल्या त्या
मेडिकलच्या विद्यार्थ्यांलाही चांगला डॉक्टर बनायचे असेल
ना?
पण बनला का?
त्याच्या आधीच गेला.
चांगला नागरिक,
चांगला माणूस, चांगला डॉक्टर व चांगला व्यावसायिक आपण
जेव्हा काहीतरी चांगले करतो
तेव्हा बनतो. नुसत्या मार्कानी नाही बनत.
एका
नववीतील
मुलीला चाचणी परीक्षेत
गणितात वीसापैकी १४ मार्क
मिळाले म्हणून तिने आत्महत्येचा
प्रयत्न केला. माझ्याशी बोलताना तिचे पहिले वाक्य होते की,
'आय एम युझलेस'.
या मुलीला
दहावीनंतर क्रीडा पत्रकार
बनायचे आहे. त्यासाठी ती
कलाशाखेला जाणार आहे.

मी विचारले की आर्ट्सला गणित असते का?
ती म्हणाली 'नाही'.
मी म्हटले की याचा अर्थ तू
दहावी नंतर गणिताला टाटा
करणार,मग तू गणितासाठी
जीव का देत होतीस?
हे ऐकल्यावर तिलाही हसू आले.
काय आहे की 'गुणी मुलगी',
'भावंडात हुशार मुलगी',
'सर्वाची आवडती',
'९०% मिळायला हवेत हं'. या इतरांच्या
मनातील प्रतिमेला जपण्याचे तिला दडपण आले होते.

ही प्रतिमा आपण जपू शकलो नाही तर आपण युझलेस....!
मुलांमध्ये खूप क्षमता असते,
परंतु मार्कावर लक्ष केंद्रित
केल्यामुळे त्या क्षमतांना
'किंमत' दिली जात नाही.

आज जग जवळ आले आहे. अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
पालकांनी लक्षात घ्या की, हे लक्षात न आल्यामुळे जेव्हा
मुलांना कमी मार्क मिळतात
तेव्हा आपण नकळत हिंसक होतो.
मुलांच्या आत्मविश्वासावर
घाला घालतो. मार्कावरून
मुलांची किंमत किंवा लायकी ठरवू नका.
आपण जन्माला
आलो ही एकच गोष्ट आपण
जगायला लायक आहोत
यासाठी पुरेशी आहे.
आता
जगताना काय करायचे याचा विचार करूया.
'थ्री इडियट'
सिनेमातील मुलाखतीच्या
प्रसंगात आजवर मार्कावरून
आपली किंमत ठरवणारा,
घाबरणारा मुलगा म्हणतो
'जिंदगी में कुछ तो ठीकठाक कर ही लूंगा '..

.......................................................................हा आत्मविश्वास मुलांना द्या...!

Wednesday, 1 July 2015

¶मोबाइल से जुडी कई ऐसी बातें...

¶मोबाइल से जुडी कई ऐसी बातें जिनके बारे में हमें
जानकारी नहीं होती लेकिन मुसीबत के वक्त यह मददगार साबित
होती है ।

  • इमरजेंसी नंबर ---
दुनिया भर में मोबाइल का इमरजेंसी नंबर 112 है । अगर आप
मोबाइल की कवरेज एरिया से बाहर हैं
तो 112 नंबर द्वारा आप उस क्षेत्र के नेटवर्क को सर्च कर लें।
ख़ास बात यह है कि यह नंबर तब भी काम करता है जब
आपका की पैड लौक हो।

  • जान अभी बाकी है---
मोबाइल जब बैटरी लो दिखाए और उस दौरान जरूरी कॉल
करनी हो, ऐसे में आप *3370# डायल करें । आपका मोबाइल
फिर से चालू हो जायेगा और आपका सेलफोन बैटरी में 50
प्रतिशत का इजाफा दिखायेगा। मोबाइल का यह रिजर्व
दोबारा चार्ज हो जायेगा जब आप अगली बार मोबाइल
को हमेशा की तरह चार्ज करेंगे।

  • मोबाइल चोरी होने पर---
मोबाइल फोन चोरी होने की स्थिति में सबसे पहले जरूरत होती है,
फोन को निष्क्रिय करने की ताकि चोर उसका दुरुपयोग न कर सके
। अपने फोन के सीरियल नंबर को चेक करने के लिए *#06#
दबाएँ । इसे दबाते ही आपकी स्क्रीन पर 15 डिजिट का कोड
नंबर आयेगा। इसे नोट कर लें और किसी सुरक्षित स्थान पर
रखें। जब आपका फोन खो जाए उस दौरान अपने सर्विस
प्रोवाइडर को ये कोड देंगे तो वह आपके हैण्ड सेट को ब्लोक कर
देगा।

  • कार की चाभी खोने पर ---
अगर आपकी कार की रिमोट की लेस इंट्री है। और गलती से
आपकी चाभी कार में बंद रह गयी है। और दूसरी चाभी घर पर है।
तो आपका मोबाइल काम आ सकता है। घर में किसी व्यक्ति के
मोबाइल फोन पर कॉल करें। घर में बैठे व्यक्ति से कहें कि वह
अपने मोबाइल को होल्ड रखकर कार की चाभी के पास ले जाएँ
और चाभी के अनलॉक बटन को दबाये। साथ ही आप अपने
मोबाइल फोन को कार के दरवाजे के पास रखें....। दरवाजा खुल
जायेगा।
है न विचित्र किन्तु सत्य......!!!
............................................................................................अधिक से अधिक शेयर करें।

  • एंड्राइड मोबाइल यूजर के काम के कोड:-
1. Phone Information, Usage and Battery –
*#*#4636#*#*
2. IMEI Number – *#06#
3. Enter Service Menu On Newer Phones –
*#0*#
4. Detailed Camera Information –
*#*#34971539#*#*
5. Backup All Media Files –*#*#273282*255
*663282*#*#*
6. Wireless LAN Test –*#*#232339#*#*
7. Enable Test Mode for Service –
*#*#197328640#*#*
8. Back-light Test – *#*#0842#*#*
9. Test the Touchscreen –*#*#2664#*#*
10. Vibration Test –*#*#0842#*#*
11. FTA Software Version –*#*#1111#*#*
12. Complete Software and Hardware Info –
*#12580*369#
13. Diagnostic Configuration –*#9090#
14. USB Logging Control –*#872564#
15. System Dump Mode –*#9900#
16. HSDPA/HSUPA Control Menu –*#301279#
17. View Phone Lock Status –*#7465625#
18. Reset the Data Partition to Factory State –
*#*#7780#*#*
...................................................बड़े काम के कोड है इसलिए शेयर करे और दुसरो को भी बताये !

Friday, 26 June 2015

चला सुखी होऊया

  • रोज दहा ते तीस मिनिटे मोकळ्या हवेत चाला आणि हो! अगदी सुहास्यवदनाने.
  •  रोज किमान दहा मिनिटे स्तब्ध…शांत राहा. एका जागी! शांत!
  •  रोज ७ तास शांत झोप काढा. शांत झोप…सुखाचा मूलमंत्र!
  •  जगताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, स्फूर्ती, उत्साह आणि दिलदारी.
  •  रोज थोडे तरी खेळा. मनोविनोदन होईल.
  •  गेल्या वर्षापेक्षा मी थोडीतरी अधिक पुस्तके वाचीन असा निश्चय करा.
  •  खूप मुबलक पाणी प्या. पाणी म्हणजे जीवन!
  •  फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे शेतातले, बागेतले, डोंगरावरले पदार्थ रोज पोटात जाऊ देत. थोडे समुद्रातलेही! तन सुखी तो मन सुखी!
  •  जरूर लक्षात घ्या की सकाळचा नाश्ता राजासारखा, जेवण राजकुमारासारखे नि रात्रीचे जेवण मात्र भिकाऱ्यासारखे असावे! म्हणजे काय राव? नाश्ता दमदमीत. दुपारची जेवण राजस; पण रात्रीचे जेवण मात्र अगदी अगदी थोडे, पुरते तेवढेच. कारण झोपेत कुठलीच शारीरिक हालचाल नसते.
  •  रोज ध्यानधरणा करा. प्रार्थना करा. आपल्या धावपळीच्या, दगदगीच्या जीवनांत तेच एक इंधन आहे जे सुख-शांती-समाधान देईल.
  •  जागेपणी स्वप्न बघा. त्याचा ध्यास घ्या. त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करा.
  •  खूप आनंदी राहा. हसून खेळून, मिळून मिसळून! आप चंगा… तो जग चंगा.
  •  एक नियमच करून टाका. रोज मी किमान तीन लोकांच्या ओठांवर स्मितहास्य फुलवेन.
  •  आपले चैतन्य, आपली बहुमोल ऊर्जा लोकांबद्दल वायफळ बोलण्यात, त्यांची कुचेष्टा करण्यात वाया घालवू नका.
  •  ज्या गोष्टी आपल्या अखत्यारित नाहीत, ज्या परिस्थितीस तुम्ही बदलू शकत नाही त्याबद्दल दुःख करीत बसू नका. त्यापेक्षा माझे वर्तमान कसे सुधारता येईल, ते पहा.
  •  ७० वर्षांवरील वृद्ध माणसे आणि ६ वर्षांखालील छोटी मुले यांच्यासमवेत दिवसातील थोडातरी वेळ नियमित घालवा. वृद्धांना जगण्याची उमेद द्याल नि छोट्यांकडून ऊर्जा घ्याल!
  •  हे जीवन फार छोटे आहे. दुसऱ्याचा हेवा, मत्सर, द्वेष करण्याइतके खचितच मोठे नाही.
  •  स्वतःचा फार गंभीरपणे विचार करू नका. इतरांना तुमची काही पडलेली नाही. ते तुमचा इतका विचार अजिबात करीत नाहीत.
  •  भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा. आपल्या जोडीदाराला त्याच्या भूतकाळातील चुकांसाठी टोकणे, चटकन लागेलसे बोलणे, टोचत राहणे सोडून द्या. त्यामुळे आपला जोडीदार पुन्हा पुन्हा दुखावला जाईल आणि आपले वर्तमान बिघडेल. त्याचे काय हो! सो? लॉक द पास्ट, एन्जॉय द प्रेझेंट!
  •  रोज विद्यार्थी शाळेत जातात. जीवन ही आपली शाळा समजा. एनी प्रॉब्लेम? अहो तो बीजगणिताचा तास समजा. एखादा प्रॉब्लेम नाही सुटला तरी तास संपतो! संपते ना? पण त्यातून आपण काहीतरी धडा शिकतोच! तसेच जीवन आहे. काही समस्या सुटत नाहीत; पण त्यातून मिळालेल्या धड्याने आपण शहाणे होतो हेही नसे थोडके!
  • प्रत्येक वेळी तुम्हीच कसे जिंकणार? इतरांनाही थोडी संधी द्या .
  •  दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना नको. त्याचे वरवरचे सुखविलास पाहून मत्सरग्रस्त होऊ नका. तो आतून काय 'भोगतोय', काय 'सोसतोय' ते तुम्हास कोठे ठाऊक आहे?
  •  क्षमाशस्त्र ज्याचे हाती त्यास काय तोटा? आनंदाच्या वाटा शोधा आनंदाच्या वाटा!…क्षमाशील झालात की सुखाची रांगोळी आपल्याच दारात!…
  •  दुःखाचे, तणावाचे दिवस आहेत? संपतील राजा! परिस्थिती कायम बदलत राहाते. लाल सिग्नल नंतर हिरवा येतोच की!
  •  तुमच्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे! हे धरा मनी. पहा… कसे आशादायी नि प्रसन्न वाटेल.
  •  तुमचे कुटुंब तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. त्यांना प्राधान्य द्या.
  •  काय वाटेल तो पसंग येवो! धैर्य सोडू नका. उठा, उत्तम वेश परिधान करा व धैर्यांने जगास सामोरे जा.
  •  तुमचा आत्मा सुखी आहे! मग तुम्ही दुःखी? का? कशासाठी? सुखी राहा.
  •  हे सारं आवडलं ना? मग आपल्या आवडत्या मित्रांना कळवा जरूर! मला हा सुखाचा संदेश माझ्या आवडत्या मित्रानेच पाठवलाय जो मी आवडत्या वाचकांपर्यंत पोहोचविलेला आहे..
  • बी हॅप्पी...!

Saturday, 20 June 2015

आव्हान शिक्षकांना !

खाद्य पदार्थांची रेसिपी

महत्वाचे शोध आणि संशोधक

विमान - राईट बंधू
डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
रडार - टेलर व यंग
रेडिओ - जी. मार्कोनी
वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
थर्मामीटर - गॅलिलीयो
हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
विजेचा दिवा - एडिसन
रेफ्रीजरेटर - पार्किन्स
वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
सायकल - मॅकमिलन
डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
ग्रामोफोन - एडिसन
टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
उत्क्रांतिवाद - डार्विन
भूमिती - युक्लीड
देवीची लस - जेन्नर
अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
अँटी रेबीज -लुई पाश्चर
इलेक्ट्रोन – थॉमसन
हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
न्यूट्रोन – चॅडविक
आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
--------------------------
adsir.malawadi ...!

Monday, 15 June 2015

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे

१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.
२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.
३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांचा घराला कुंपणाची भिंत नाही.
४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.
५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.
६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व
CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु का.

७ घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटलेकी वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.
९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला
-- "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."
-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.
-- दरवर्षी मी काही धोरण अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिपस्तंभाचे काम करतात आणि स्वत:च शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।

१०. पुरणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या) अशाच) काही शहाण पणाच्या गोष्टी -
* अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.
* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.
* ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणार्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला. ( Royalty income)
* खर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकाण्याची वेळ येईल.
* बचत - खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.
* कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणरयाचा गुलाम हॊउन जातो.
* जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय मह्त्वाचे आहे. जरबूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छ्त्रीचा काय उपयोग ?
* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्णजहाज बुडू शकते.
* आर्थिक धोका - बरयाच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फ़ायदा देणरया आणी आकर्षक असतातमात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्स जरा काळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यातटाकुन कसे चालेल?
* गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे?
* या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्या सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी जे यासर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लवकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. माणुस आर्थिक गरजेपोटी आयुष्यभर धडपडत असतो, त्याचं मुख्य कारण म्हणजे माणसाने शाळा व कॉलेजमध्ये बरीच वर्षे शिक्षण जरी घेतले असले तरी पैश्याबद्दल त्याला काहीच शिकवलं गेलेलं नसतं. परिणामस्वरुपी माणुस पैश्यासाठी काम करायला शिकतो परंतु स्वत:साठी पैश्याकडून काम करवून घ्यायला मात्र कधीच शिकत नाही.
*योग्य नियोजनाच्या मदतीने सर्वसाधारण माणुस करोडपती बनु शकतो व योग्य आर्थिक नियोजनाच्या अभावी करोडपती माणुस कंगाळ होऊ शकतो! एकविसाव्या शतकात आपल्याला आज खरी गरज आहे ती आर्थि@साक्षरतेची.                                             One of the best msgs I've ever read...