Tuesday, 10 April 2018

उन्हाळा आणि त्याअनुषंगाने घ्यायची काळजी

                                           दरवर्षीप्रमाणे उन्हाळा येऊन ठेपलेला आहे. आणि उष्म्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. उन्हाळ्यात घ्यायची आरोग्याची काळजी याविषयी सर्वसाधारण माहिती सगळ्यांना असतेच. तरीही सगळ्यांनी त्यात भर घातली तर फायद्याचे राहिल.
मला माहित असलेले काही मुद्दे:
१. भरपुर पाणी पिणे. (शक्यतो माठातले).
२. उन्हात जातांना आवर्जून डोके झाकणे.
३. गॉगल्स वापरणे.
४. घाम शोषुन घेतील असे कपडे वापरणे. हलक्या रंगाचे सुती (जमल्यास ढगळ) कपडे वापरावे.
५. शक्य असेल तर दोनदा अंघोळ करणे.
६. जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगणे.
७. रबरी चपला/ सँडल्स न वापरणे (त्याने डोळे तळावतात). (तळावणे = डोळे तापणे, दिवसभर जळजळणे, थकणे)
८. वातावरणातील उष्णतेमुळे अन्न लवकर नासत/ आंबत असल्याने डबा खातांना भाजी चांगली आहे ना याची खात्री करून खाणे. (मुळातच उन्हाळ्यात भूक कमी होत असल्याने कमीच डबा बाळगणे).
९. एसीमध्ये काम करणार्‍यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्याने गरगरल्यासारखे होते त्यावर काहीतरी उपाय करणे. (मला उपाय माहित नाही. कोणास माहित असल्यास सांगावे).
१०. चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अश्या सरबतांचे सेवन वाढवणे. नारळपाणी व ताक यांचे नियमित सेवन करणे.
११. बाहेर जाताना सहसा कॉटनचा सनकोट घालणे.. शक्य असल्यास हातात ग्लोव्हज् घालणे..
१२. उन्हातुन आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मधे जाऊन बसु नये.
१३. उन्हातुन थकुन आल्यावर लगेच गारेगार पाणि पिउ नये.
१४. रोज एक चमचा गुलकंद खाणे ,
१५. रात्री झोपताना तळपायाला तेलाने अभ्यंग करणे. (अभ्यंग म्हणजे मसाज ना?)
१६. उन्हाळ्यात जंकफूड खाणं टाळावं. (खरं तर शक्य होईल तितके सर्वच महिन्यात टाळावे).
१७. सनस्क्रीन ( 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त) लावुनच उन्हात बाहेर पडावे. (त्वचेची काळजी)
( संकलन )

No comments:

Post a Comment