Saturday, 7 November 2015

आपला छंद नवी ऊर्जा देतो.. - डॉ. रेणू राज


                                          युपीएससी परीक्षा क्रॅक करायची तरअनेकांची तीन-चार वर्ष सहज निघून जातात. काही काहींचे तर अटेम्पट संपतच नाहीत. अनेक जण तर धस्काच घेतात या परीक्षेचा! मित्र-मैत्रिणींची दशा पासून अनेकांची दिशा बदलते. इंजिनिअर, डॉक्टरकीच बरी नको ती परीक्षेची  झंझट असं म्हणतयुपीएससीच्या ‘वाटेला’ अध्र्यावर रामराम ठोकणारेही अनेक. पण युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात दुसरी आलेली केरळची डॉ. रेणू राज या सर्वापेक्षा थोडी वेगळी आहे.
कल्पना करा ना, पहिलाच अॅटेम्प आणि देशात दुसरी! 
आपल्याला विश्वास ठेवणंही ते अवघड होतं. वय वर्षे फक्त 27.  गाठीशी ‘एमबीबीएस’ची पदवी.  पण समाजातील पिडीतांसाठी काही तरी करण्याच्या ऊर्मीने तिला ‘आयएएस’र्पयत पोहचवलं. त्यासाठी तिनं चिकाटीनं हा किल्ला सर केला. ‘सेल्फ स्टडी’ आणि चिकाटी हेच तिच्या यशाचे खरं गमक. 
हे सारं तर आहेच, पण आणखी काही ठोकताळे तिनं धुडकावून लावलेत. सगळ्यांना असं वाटतं की, उत्तम इंग्रजी येणं, हायफाय क्लासेस लावणं, दिल्ली किंवा पुणंच गाठणं, प्रचंड पैसा ओतणं म्हणजे हे यश. रेणूनं ते तर धुडकावलंच पण तिचं यश खेडय़ापाडय़ातल्या मुलींना हेदेखील सांगतंय की, लगAानंतर आपली स्वपA धुसर होऊ देऊ नका. लगAानंतरही करिअरचं उत्तुंग शिखर गाठता येतं.
केरळ मधल्या एका छोटय़ाशा खेडय़ातल्या बस कंडक्टर असलेल्या वडिलांची ही गुणी मुलगी. तिची आई गृहिणी. जिद्दीनं आधी डॉक्टर झाली, पण मनात स्वपA होतंच आयएएसचं, दरम्यान लगAही झालं. पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळवणं आणि तेही देशात दुस:या क्रमांकावर येणं, ही सहज मिळणारं यश नक्कीच नाही. त्यासाठी अपार कष्ट, जिद्द, चिकाटी लागतेच. डिसेंबर 2क्13 पासून तिनं अभ्यासाला सुरूवात केली. त्यानंतर लगेचच मे महिन्यात तिचं लग्न झालं. मात्र तिनं अभ्यास सुरू ठेवला आणि पहिल्या प्रय}ात देशात दुसरं येण्याचाही विक्रम करुन दाखवला!
रेणू सांगते, 
अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला
युपीएससीची पुर्व परीक्षा ऑगस्ट महिन्यात तर मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये. नुकतंच लगA झालेलं. लग्नानंतर पुर्व परीक्षेसाठी जेमतेम तीन महिने उरले होते. डॉक्टरच असलेल्या माङया नव:यानंही प्रोत्साहन दिलं. मग मी अभ्यासाला जोमानं लागले. खरं सांगते, तुम्ही दिवसातील 18-2क् तास अभ्यास करून काही होत नाही. 4-5 तासच अभ्यास करा पण मन लावून. मी तेच केलं. अभ्यासासाठी रात्र-रात्र जागले नाही. दिवसभरात चार ते पाच तासच अभ्यास केला. तसं वेळापत्रक तयार केलं जातंच. पण ते वेळापत्रक अगदी काटेकोरपणो पाळणंही आवश्यक नाही. अभ्यासात साचेबध्दपणा येवू दिला नाही. मी अभ्यास करत असताना आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला. घरगुती कार्यक्रम असो किंवा लग्न-समारंभ.. कुटूंबासोबत सहभागी झाले. मित्र-मैत्रिणींना भेटणं, बोलणं सुरूच ठेवलं. अभ्यासाचं कारण पुढं करून ते टाळलं नाही. त्यांच्यासोबत सिनेमे पाहिले, गप्पार मारल्या. अशा गोष्टींमुळं तुमच्यातील उर्जा टिकून राहते. सकारात्मकता येते. त्यातून तुम्हाला जास्त एनर्जी मिळून तुम्ही जास्त फ्रेश होता, असा माझा तरी अनुभव आहे.
त्याला जोड नियमित सरावाची. मी केरळच्या शासकीय कोचिंग इन्स्टिटय़ुटमध्ये परीक्षेची तयारी केली. अभ्यासाची योग्य दिशा मिळण्यासाठी असं फॉर्मल कोचिंग आवश्यक असतंच पण तरी सेल्फ स्टडी महत्वाचा आहे. अभ्यासातून तुम्ही तुमचं मत तयार करणं आणि त्यानुसार लेखी परीक्षा किंवा मुलाखतीत स्वत:ला प्रेङोंट करणंही तितकच महत्वाचं.  कोचिंग घ्यायलाच हवं. मात्र स्वत:चा अभ्यास, स्वत:चं मत, आणि स्वत:ला उत्तम प्रेङोण्ट करणं हे सारं मला जास्त महत्वाचं वाटतं.  हे सारं करताना मला माङया आईनं खूप साथ दिली. माझी आई गृहिणी असली तरी तिनं मल्याळम साहित्यात पदवी संपादन केली आहे. तिला वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे मी वाचू लागले. वाचनाबरोबरच लेखनाचीही आवड निर्माण झाली. त्यामुळं ऑप्शनल विषय निवडताना मल्याळम हाच भाषा विषय निवडला. त्याचा परीक्षा देताना खूप फायदा झाला. आपली भाषा ही आपली ताकद आहे, हे अजिबात विसरु नका. 
जे लेखी परीक्षेचं तेच मुलाखतीचं. मुलाखतीवेळी माङयात आणि  मुलाखत घेणा:यांमध्ये खुप चांगला संवाद झाला. ते आपली परीक्षा घेताहेत असं वाटलंच नाही. खूप खेळीमेळीचं वातावरण होतं. माझी मुलाखत 3क् ते 4क् मिनिटं चालली. पण तुमची मुलाखत किती वेळ चालतेय, याला महत्व नाही. तुम्ही मुलाखतीदरम्यान स्वत:ला कसं प्रेङोन्ट करता हे महत्वाचं. मला वाटतं, मुलाखतीला पॉङिाटिव्हली सामोरं गेलं तरच आपलं टेन्शन कमी होतं. निगेटिव्ह मानसिकतेनं जर आपण मुलाखत दिली तर काहीच हाशिल नाही. बी पॉङिाटिव्ह हेच खरं सूत्र!
आपण हे का करतोय?
आपण युपीएससी परीक्षा का देतोय? फक्त अधिकारी बनायला का? हा प्रश्न आधी स्वत:ला विचारा!  त्यातून आपलं ध्येय काय हे आपलं आपल्यालाच समजतं. नाहीतर मग नुस्ते दिशाहीन प्रय} करण्यात काही हाशील नाही. मी डॉक्टर होताना हे पाहिलं होतं की देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा खूप ठिकाणी खिळखिळी झालेली आहे. सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा सहजासहजी मिळत नाहीत. देश बदलत असताना आरोग्याच्या क्षेत्रतील बदलही महत्वाचे आहेत. हे बदल करण्यासाठी काम करण्याचं माझं ध्येय आहे. म्हणून मी प्रशासकीय सेवेत दाखल झाले. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमध्ये बदल करत गेलो तर मोठे बदल दृष्टीक्षेपात येतात. त्यामुळं ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हे बदल व्हायला हवीत.
हे झालं माझं उदाहरण, पण परीक्षा देणा:या सगळ्यांनाच आपला एक विशिष्ट हेतू तरी किमान माहिती असायला हवा!
आपला छंद नवी ऊर्जा देतो.
मी लहानपणापासूनच नृत्य शिकलेय. त्यामध्ये अनेक बक्षिसंही मिळविली आहेत. युपीएससीची तयार करत असतानाही नृत्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. जेव्हा इच्छा होईल तेव्हा मनसोक्त नाचाचा रियाज करते. ते कधीच अभ्यासाच्या आड आलं नाही. नृत्य हे माझं  पहिलं प्रेम, तो रियाज मला जी ऊर्जा देतो, तिनं मला कधी अभ्यासाचा थकवा येऊ दिला नाही.

...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

No comments:

Post a Comment