Wednesday, 25 November 2015

जागतिक दिवस :::

  • जानेवारी
१ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस.
१२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन.
१५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन.
२६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस.
३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस (महात्मा गांधी स्मृति दिन).

  • फेब्रुवारी
४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस.
१४ फेब्रुवारी : जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस.
२० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिवस.
२१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.
२४ फेब्रुवारी : केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.
२७ फेब्रुवारी : जागतिक नाट्यदिन.
२७ फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिवस.
२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिवस.

  • मार्च
७ मार्च : जागतिक गणित दिवस.
८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२० मार्च : जागतिक चिमणी दिवस.
२१ मार्च : जागतिक जंगल दिवस.
२२ मार्च : जागतिक पाणी दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२३ मार्च : जागतिक हवामान दिवस.
२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिवस.
३० मार्च : जागतिक डॉक्टर दिवस.

  • एप्रिल
१ एप्रिल : जागतिक मूर्खांचा दिवस.
५ एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन.
७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिवस.
११ एप्रिल : जागतिक पार्किन्सन दिवस.
१७ एप्रिल : जागतिक हेमोफिलिया दिवस.
२२ एप्रिल : भारतीय वर्षारंभ दिवस.
२२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन.
२३ एप्रिल : जागतिक प्रताधिकार दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिवस.

  • मे
१ मे : महाराष्ट्र दिवस.
१ मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
१ मे जागतिक अस्थमा दिवस.
१ मे : जागतिक दमा दिवस.
३ मे : जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
८ मे : जागतिक रेडक्रॉस दिवस.
९ मे : जागतिक थॅलसीमिया दिवस.
११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
१२ मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
१५ मे : आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
१७ मे : जागतिक दूरसंचार दिवस.
१९ मे जागतिक कावीळ दिवस.
२२ मे : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२३ मे : आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
मे महिन्यातला पहिला रविवार : जागतिक हास्यदिन.
मे महिन्यातला दुसरा रविवार : आंतरराष्ट्रीय मातृदिन.

  • जून
१ जून : आंतराराष्ट्रीय बालदिन.
५ जून : जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
जूनमधला तिसरा रविवार : पितृदिन (अमेरिका,इंग्लंड, कॅनडा).
१४ जून : जागतिक रक्तदान दिवस.

  • जुलै
१ जुलै : भारतीय डॉक्टर दिवस.
११ जुलै : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.
२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.

  • ऑगस्ट
९ ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस.
९ ऑगस्ट : भारत छोडो दिवस.
१२ ऑगस्ट : भारतीय ग्रंथपाल दिवस.
१४ ऑगस्ट : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.
१५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिन.
२० ऑगस्ट : जागतिक मच्छर दिवस.
२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद जयंती.

  • सप्टेंबर
५ सप्टेंबर : भारतीय शिक्षक दिवस.
५ सप्टेंबर : भारतीय संस्कृत दिन.
८ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार
जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
२७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिवस.
जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
२७ सप्टेंबर : मराठीमाती संकेतस्थळ 

२७ सप्टेंबर २००२ साली सुरू झाले.
आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार

  • ऑक्टोबर
२ ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिवस, गांधी जयंती. गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे
५ ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
८ ऑक्टोबर : भारतीय वायु दिन.
१० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिवस.
१० ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिवस.
१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन.

  • नोव्हेंबर
१२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस.
१४ नोव्हेंबर : भारतीय बालदिन, नेहरू जयंती.
१६ नोव्हेंबर : जागतिक सहनशीलता दिवस.

  • डिसेंबर
१ डिसेंबर : जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
३ डिसेंबर : जागतिक अपंग दिवस.
७ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.n
१८ डिसेंबर : भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
२३ डिसेंबर : भारतीय किसान दिन.
२३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिवस. जागतिक दिवस :::
                                                                                                            .....नक्की शेअर करा....

Sunday, 22 November 2015

मी म्हणत नाही की मी सांगतो तेच करा..

पण विचार करा...
पटले तर कृती करा..
आणि..
मी हे सांगण्यात माझा काही स्वार्थ नाही यामुळे हे विचार जे घेतील ते यशस्वी होतीलच याची मला खात्री आहे. ...
कामयाब लोग " अपने फेसले " से दुनिया बदल देते हे !! और नाकामयाब लोग दुनिया के डर से "अपने फेसले " बदल लेते हे !!"

: बुरा वक्त सब पर आता है,कोई बिखर जाता है_______तो कोई निखर जाता है..
"सफलता कभी भी "पक्की"
नही होती,
तथा
असफलता कभी भी "अंतिम"
नही होती।
इसलिये अपनी कोशिश को
तब तक जारी रखो...
जब तक आपकी,
"जीत" एक "इतिहास" ना बन जाये।"

Saturday, 14 November 2015

*वैयक्तिक जीवनात कसे वागावे ......

१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. देव, महामानव, आईवडील इत्यादी

५) नाश्ता , जेवन घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .

१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.
११) दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत

१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर आभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१५) tv व चिञपटात चांगले ते पहावे.
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.
अपयश टाळा. यश स्विकारा.

Saturday, 7 November 2015

आपला छंद नवी ऊर्जा देतो.. - डॉ. रेणू राज


                                          युपीएससी परीक्षा क्रॅक करायची तरअनेकांची तीन-चार वर्ष सहज निघून जातात. काही काहींचे तर अटेम्पट संपतच नाहीत. अनेक जण तर धस्काच घेतात या परीक्षेचा! मित्र-मैत्रिणींची दशा पासून अनेकांची दिशा बदलते. इंजिनिअर, डॉक्टरकीच बरी नको ती परीक्षेची  झंझट असं म्हणतयुपीएससीच्या ‘वाटेला’ अध्र्यावर रामराम ठोकणारेही अनेक. पण युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात दुसरी आलेली केरळची डॉ. रेणू राज या सर्वापेक्षा थोडी वेगळी आहे.
कल्पना करा ना, पहिलाच अॅटेम्प आणि देशात दुसरी! 
आपल्याला विश्वास ठेवणंही ते अवघड होतं. वय वर्षे फक्त 27.  गाठीशी ‘एमबीबीएस’ची पदवी.  पण समाजातील पिडीतांसाठी काही तरी करण्याच्या ऊर्मीने तिला ‘आयएएस’र्पयत पोहचवलं. त्यासाठी तिनं चिकाटीनं हा किल्ला सर केला. ‘सेल्फ स्टडी’ आणि चिकाटी हेच तिच्या यशाचे खरं गमक. 
हे सारं तर आहेच, पण आणखी काही ठोकताळे तिनं धुडकावून लावलेत. सगळ्यांना असं वाटतं की, उत्तम इंग्रजी येणं, हायफाय क्लासेस लावणं, दिल्ली किंवा पुणंच गाठणं, प्रचंड पैसा ओतणं म्हणजे हे यश. रेणूनं ते तर धुडकावलंच पण तिचं यश खेडय़ापाडय़ातल्या मुलींना हेदेखील सांगतंय की, लगAानंतर आपली स्वपA धुसर होऊ देऊ नका. लगAानंतरही करिअरचं उत्तुंग शिखर गाठता येतं.
केरळ मधल्या एका छोटय़ाशा खेडय़ातल्या बस कंडक्टर असलेल्या वडिलांची ही गुणी मुलगी. तिची आई गृहिणी. जिद्दीनं आधी डॉक्टर झाली, पण मनात स्वपA होतंच आयएएसचं, दरम्यान लगAही झालं. पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळवणं आणि तेही देशात दुस:या क्रमांकावर येणं, ही सहज मिळणारं यश नक्कीच नाही. त्यासाठी अपार कष्ट, जिद्द, चिकाटी लागतेच. डिसेंबर 2क्13 पासून तिनं अभ्यासाला सुरूवात केली. त्यानंतर लगेचच मे महिन्यात तिचं लग्न झालं. मात्र तिनं अभ्यास सुरू ठेवला आणि पहिल्या प्रय}ात देशात दुसरं येण्याचाही विक्रम करुन दाखवला!
रेणू सांगते, 
अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला
युपीएससीची पुर्व परीक्षा ऑगस्ट महिन्यात तर मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये. नुकतंच लगA झालेलं. लग्नानंतर पुर्व परीक्षेसाठी जेमतेम तीन महिने उरले होते. डॉक्टरच असलेल्या माङया नव:यानंही प्रोत्साहन दिलं. मग मी अभ्यासाला जोमानं लागले. खरं सांगते, तुम्ही दिवसातील 18-2क् तास अभ्यास करून काही होत नाही. 4-5 तासच अभ्यास करा पण मन लावून. मी तेच केलं. अभ्यासासाठी रात्र-रात्र जागले नाही. दिवसभरात चार ते पाच तासच अभ्यास केला. तसं वेळापत्रक तयार केलं जातंच. पण ते वेळापत्रक अगदी काटेकोरपणो पाळणंही आवश्यक नाही. अभ्यासात साचेबध्दपणा येवू दिला नाही. मी अभ्यास करत असताना आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला. घरगुती कार्यक्रम असो किंवा लग्न-समारंभ.. कुटूंबासोबत सहभागी झाले. मित्र-मैत्रिणींना भेटणं, बोलणं सुरूच ठेवलं. अभ्यासाचं कारण पुढं करून ते टाळलं नाही. त्यांच्यासोबत सिनेमे पाहिले, गप्पार मारल्या. अशा गोष्टींमुळं तुमच्यातील उर्जा टिकून राहते. सकारात्मकता येते. त्यातून तुम्हाला जास्त एनर्जी मिळून तुम्ही जास्त फ्रेश होता, असा माझा तरी अनुभव आहे.
त्याला जोड नियमित सरावाची. मी केरळच्या शासकीय कोचिंग इन्स्टिटय़ुटमध्ये परीक्षेची तयारी केली. अभ्यासाची योग्य दिशा मिळण्यासाठी असं फॉर्मल कोचिंग आवश्यक असतंच पण तरी सेल्फ स्टडी महत्वाचा आहे. अभ्यासातून तुम्ही तुमचं मत तयार करणं आणि त्यानुसार लेखी परीक्षा किंवा मुलाखतीत स्वत:ला प्रेङोंट करणंही तितकच महत्वाचं.  कोचिंग घ्यायलाच हवं. मात्र स्वत:चा अभ्यास, स्वत:चं मत, आणि स्वत:ला उत्तम प्रेङोण्ट करणं हे सारं मला जास्त महत्वाचं वाटतं.  हे सारं करताना मला माङया आईनं खूप साथ दिली. माझी आई गृहिणी असली तरी तिनं मल्याळम साहित्यात पदवी संपादन केली आहे. तिला वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे मी वाचू लागले. वाचनाबरोबरच लेखनाचीही आवड निर्माण झाली. त्यामुळं ऑप्शनल विषय निवडताना मल्याळम हाच भाषा विषय निवडला. त्याचा परीक्षा देताना खूप फायदा झाला. आपली भाषा ही आपली ताकद आहे, हे अजिबात विसरु नका. 
जे लेखी परीक्षेचं तेच मुलाखतीचं. मुलाखतीवेळी माङयात आणि  मुलाखत घेणा:यांमध्ये खुप चांगला संवाद झाला. ते आपली परीक्षा घेताहेत असं वाटलंच नाही. खूप खेळीमेळीचं वातावरण होतं. माझी मुलाखत 3क् ते 4क् मिनिटं चालली. पण तुमची मुलाखत किती वेळ चालतेय, याला महत्व नाही. तुम्ही मुलाखतीदरम्यान स्वत:ला कसं प्रेङोन्ट करता हे महत्वाचं. मला वाटतं, मुलाखतीला पॉङिाटिव्हली सामोरं गेलं तरच आपलं टेन्शन कमी होतं. निगेटिव्ह मानसिकतेनं जर आपण मुलाखत दिली तर काहीच हाशिल नाही. बी पॉङिाटिव्ह हेच खरं सूत्र!
आपण हे का करतोय?
आपण युपीएससी परीक्षा का देतोय? फक्त अधिकारी बनायला का? हा प्रश्न आधी स्वत:ला विचारा!  त्यातून आपलं ध्येय काय हे आपलं आपल्यालाच समजतं. नाहीतर मग नुस्ते दिशाहीन प्रय} करण्यात काही हाशील नाही. मी डॉक्टर होताना हे पाहिलं होतं की देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा खूप ठिकाणी खिळखिळी झालेली आहे. सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा सहजासहजी मिळत नाहीत. देश बदलत असताना आरोग्याच्या क्षेत्रतील बदलही महत्वाचे आहेत. हे बदल करण्यासाठी काम करण्याचं माझं ध्येय आहे. म्हणून मी प्रशासकीय सेवेत दाखल झाले. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमध्ये बदल करत गेलो तर मोठे बदल दृष्टीक्षेपात येतात. त्यामुळं ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हे बदल व्हायला हवीत.
हे झालं माझं उदाहरण, पण परीक्षा देणा:या सगळ्यांनाच आपला एक विशिष्ट हेतू तरी किमान माहिती असायला हवा!
आपला छंद नवी ऊर्जा देतो.
मी लहानपणापासूनच नृत्य शिकलेय. त्यामध्ये अनेक बक्षिसंही मिळविली आहेत. युपीएससीची तयार करत असतानाही नृत्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. जेव्हा इच्छा होईल तेव्हा मनसोक्त नाचाचा रियाज करते. ते कधीच अभ्यासाच्या आड आलं नाही. नृत्य हे माझं  पहिलं प्रेम, तो रियाज मला जी ऊर्जा देतो, तिनं मला कधी अभ्यासाचा थकवा येऊ दिला नाही.

...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

Tuesday, 3 November 2015

सार्वजनिक जीवनात कसे वागावे ...

१) तुमचे धेय्य निश्चित करा. मला काय करायचय, काय व्हायचय, कुठे पोहचायच, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचे.
4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही

6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.

7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.

9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
     १ ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
     २ हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
      ३ हे असच का ?

या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
******