Monday, 26 December 2016

गणिती उखाणे

चला गणित शिकुया.
गणिती उखाणे
सर्वांनी एक उखाना घेवू..... 


गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी *उखाणा* उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ लांबी x रूंदी.
२) हिमालयातील काश्मिर म्हणजे भूलोकातील स्वर्ग
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे बाजूचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू खणानारळाची
ञिकोणाचे क्षेञफळ म्हणजे १/२xपायाxउंची.
४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे १९४२ ची चळवळ
सहाxबाजू वर्ग हे घनाचे पृष्ठफळ
५) तीन पानांचा बेल त्याला येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची हे इष्टिकाचीतीचे घनफळ.

 
रविवार नंतर सोमवार येतो ....
रविवार नंतर सोमवार येतो.....
प्रत्येक रून संख्या चा वर्ग ...
नेहमीच धन.
*******************
महादेवाला आवडतात बेलाचे पान...
महादेवाला आवडता बेलाचे पान....
कोणत्याही ञिकोणात एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा लहान....!!  
****************
भाजीत भाजी मेथीची.....
वर्तुळ माझ्या प्रितीची.....✍  ✍  
****************
स्वच्छता तेथे ईश्वर वसते,
स्वच्छता तेथे ईश्वर वसते,
अन,
शुन्यत्तेर संख्या चा घातांक शून्य असेल तर किंमत 1च असते !
********
भारताने मॕच जिंकली.....
चार गडी राखून .....
परिमिती काढतो मी....
आकृती आखून ....✍  ✍  ✍  
****************
दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे घ्यायला, सुवासिनी झाल्या गोळा..!!!  
***********
*झारखंड ची राजधानी रांची*
*ञिकोणाचे क्षेत्रफळ 1/2×पाया ×उंची*
***********
   जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नोटा 
खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू ... चौरसाची परिमिती 4 × बाजु.*

**************
खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा 
विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा
****************
दहा किलो म्हणजे एक मन...!!
घनाचे घनफळ बाजूचा घन....!!
***************
*काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग....*
*चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग ...!!*
*******
*जीवाला जीव देतो तोच खरा मित्र*
*गणित सोडवायला माहिती  हवीत सुत्र*
**************
फुलात फुल चाफा,विक्री - खरेदी बरोबर नफा.
*****************
    सम आणि व्यस्त हे चलनाचे प्रकार 
पहिल्यात असते गुणोत्तर तर दुसर्यात गुणाकार
*********
"गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
एक हजार लीटर....!!!!
******** 

Sunday, 11 December 2016

सोबत

आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं …
इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष!
ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…
कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.
प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.
मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”
सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.
लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो.
मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.
‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –
“सोबत…!”
माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच.