Monday, 29 February 2016

कर्ण आणि श्रीकृष्ण संवाद

कर्णाचे रथाचे चाक ज्या वेळी युद्धभूमीवर रुतते त्यावेळचा श्रीकृष्ण आणि कर्ण संवाद , सध्याच्या काळात पण विचार करायला लावतो..
श्रीकृष्ण - " हे कर्ण . . जी विद्या अनीतीच्या मार्गाने प्राप्त केली जाते , ती संकटाच्या वेळी आपली साथ सोडून देते . आणि हा भगवान परशुरामाचा शाप नाही तर निसर्गाचा नियम आहे . "
कर्ण - " परंतु वसुदेव , मी ही विद्या प्राप्त करायला अथक परिश्रम घेतले आहेत . प्रचंड यातना सहन केल्या आहेत . मग मला का विद्येचे विस्मरण होईल .
श्रीकृष्ण - " विद्या प्राप्त करायचा प्रयत्न का केला होतास अंगराज ? . . विद्येचे महत्व जाणून घेतले होतेस का ?. . विद्या प्राप्त करून समाजाला लाभ द्यायचा अशी इच्छा होती का तुझी ? का फक्त आपल्या अपमानाचा बदला हाच विषय आपल्या मस्तकात ठेवून तू विद्या प्राप्त केलीस ?
वास्तवात विद्या प्राप्त करायला श्रमाची आवश्यकताच नसते . फक्त एकाग्रता आणि समर्पण पुरेसे आहे . ज्ञान तर आत्म्याचा मुलभूत गुण आहे . आणि हे अंगराज तू तर बुद्धिमान आहेस . मला सांग विद्या प्राप्त करताना मन एकाग्र का राहत नाही .
ज्या वेळी माणूस ज्ञानाला एक साधन मानतो , कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी बाहेर पडतो , त्यावेळी ज्ञान प्राप्त होत असतना त्याचे मन स्थिर नसते . ज्ञान त्याच्या आत्म्याचा गुण नाही बनू शकत . जसा 'रंग ' हा कुठल्याही वस्त्राचा स्वताचा गुण नसतो , तसे सूर्य तापून रंग सोडून देतो . तसे जी व्यक्ती ज्ञानाचे महत्व जाणून ज्ञान प्राप्त करतो तो सर्वोत्तम बनतो .
परंतु जी व्यक्ती काहीतरी फायद्यासाठी ज्ञान मिळवत राहते , ती व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर श्रेष्ठ राहण्याच्या स्पर्धेत राहते . पण सर्वोत्तम नाही बनत .
तसे हे अंगराज , तू सुद्धा ज्ञान प्राप्त केलेस , ते कुठल्यातरी स्वफायद्यासाठी . प्रत्यक्ष परशुरामाच्या सान्निध्यात राहून पण तुझे मन शांत नाही झाले . तू स्पर्धा करत राहिलास , कुठेतरी दूर असलेल्या अर्जुना बरोबर . ज्ञान मिळवण्याचा तुझा अर्थच चुकीचा होता . तर ह्या विद्येचे विस्मरण कसे काय होणार नाही अंगराज ?"
कर्ण - कसे काय मी स्पर्धा करू शकत नव्हतो वासुदेव ? मी माझ्या आयुष्यात माझ्याशी कसा काय समझौता करू शकत होतो . ? ह्या समाजाने नेहमीच माझ्यावर अन्याय केला आहे . माझ्या शक्तीला इथे कधीच सन्मान नाही मिळाला . माझ्या आपल्यांनी मला स्वीकारले नाही . सदैव सूतपुत्र म्हणून ह्या समाजाने मला हिणवले आहे . ईश्वराने मला एका घरात कर्म दिले . पण हा समाज एखाद्याचा मुलभूत अधिकारापासून कसा काय वंचीत ठेवू शकतो वासुदेव ?
श्रीकृष्ण - राधेय , बरोबर हा घोर अपराध आहे . जात पात मानणे , संपूर्ण समाजाला ज्ञान , संपत्ती , अधिकार, सन्मान . . यापासून दूर ठेवणे हे मानवतेच्या विरुद्ध आहे .
कर्ण - मग माझा दोष काय वासुदेव ? जर माझ्यात असंतोष जन्माला आला , जर मी स्पर्धा केली , जर मी बलपूर्वक स्वतःचा अधिकार खेचून घेतला तर माझा काय दोष वसुदेव ?
श्री . कृष्ण - हे राधेय , त्रेतायुगात , पृत्वीर चा मुलगा कार्तिविर अर्जुन या क्षत्रिय राजाने , महर्षी जमदग्नी यांची हत्या केली . महर्षींच्या मुलाने काय केले माहित आहे का राधेय तुला ? त्याने आपल्या वेदेनेत सुद्धा विचार केला . . का माझ्या वडिलांची हत्या केली गेली ? कुठे झाला होता अधर्म ? त्याने पूर्ण वेदेनेचे विस्मरण केले , संपूर्ण समाजाच्या वेदेनेची स्वतःची वेदना बनवली . आणि अधर्मी क्षत्रियांचा सर्वनाश करून संपूर्ण आर्यावर्त शुद्ध करण्याचा जीवनमंत्र बनवला . ते जर प्रतिशोध हा विषय डोक्यात घेवून बसले असते तर आज  परशुराम म्हणून ओळखले नसते गेले .
होय राधेय , तुला जे दुक्ख आन अपमान मिळाला तो वास्तवात आहे . पण त्याच्याकडे तू एक संधी म्हणून बघितले असतेस तर तुझा उद्धार झाला असता आणि समजाचा फायदा झाला असता . तुझ्यासारख्या शक्तिमान पुरुषाचा आधार , जर अन्यायग्रस्त आणि पिडीत जनतेला मिळाला असता तर कितीतरी आयुष्य सुखाने भरलेली असती .
राधेय , त्या पिडीत लोकांची वेदना तू अनुभवली होतीस पण तुझे आयुष्य तू त्यांच्यासाठी नाही दिलेस . तू तुझे आयुष्य समर्पित केलेस ते क्रूर दुर्योधनास , ज्याच्या पक्षात फक्त अधर्म होता बाकी काही नाही . आता बघ तुझी स्थिती , तू दुर्योधनाच्या बाजूने उभे राहिलास , पांचालीच्या वस्त्रहरणाच्या पापतील भागीदार बनलास . स्वताच्या मातेचा सन्मान नाही करू शकलास . स्वताच्या भावांच्या मुलांच्या हत्त्या केल्यास , . . . आणि आज स्वतःचा संतोष , धर्म गमावून स्वताच्या भावाच्या हातून मारण्यास उभा आहेस .
कर्ण - तू योग्य बोलत आहेस वासुदेव , पण मी मित्र दुर्योधांच्या उपकरांचे विस्मरण नाही करू शकत .
श्री . कृष्ण - कुठला उपकार राधेय ? . . तुझी मैत्री झाल्यावर , आर्यावर्तातील सर्व सुतपुत्राना विद्येचा अधिकार मिळाला का ? त्याने सर्व पिडीत आणि शोषित समाजाला आपले बनवले . . नाही . . नाही राधेय त्याने फक्त आपल्या लाभासाठी मित्रता केली . तुझ्या ह्रदयातील अर्जुनाच्या रागाशी मित्रता केली . जर तू तुझे दुक्ख विसरून समजतील दुक्खला जवळ केले असतेस तर , दुर्योधांच्या मैत्रीचे खरे स्वरूप तुला कळले असते . जर दुर्योधनाच्या मनात उपकाराची भावना असती तर तू , त्याचा लाभ समजला दिला असतास त्याला सर्व अधर्म आणि अपराधां पासून मुक्त केले असतेस .
तुझ्यावरील उपकराला काही किंमतच नव्हती .
कर्ण - वासुदेव , मी आयुष्यभर पिडीत आणि शोषित लोकांना दान दिले आहे . माझ्याजवळ काही ठेवले नाही .
श्रीकृष्ण - दानाचा लाभ , दान करण्याला होतो , दान प्राप्त करणार्याला होत नाही . तू तुझ्या शक्तीचा उपयोग शोशिताना स्वतंत्र करण्या करिता केला असतास तर सर्वाना लाभ झाला असता राधेय . तू म्हणत आहेस , समाजाने तुझ्यावर अन्याय केला . पण ईश्वराने जी शक्ती तुला दिली त्याचे तू मुल्य कधी जाणलेस नाही .
एक सत्य जाणून घे - जी व्यक्ती समाजासाठी जगते त्याला स्वतःला फायदा होतो पण जो फक्त स्वतासाठी जगतो त्याचा तोटा स्वातला आणि समाजाला होतो . आज कुरुक्षेत्रावर जो विध्वंस चालू आहे त्याला ना दुर्योधन जबाबदार ना शकुनी .
हे पाप फक्त तीन महावीर लोकांचे आहे , एक महारथी भीष्म , गुरु द्रोण आणि तू राधेय .
जर तुम्ही तिघांनी स्वताच्या मानलेल्या धर्माचा त्याग करून समाजाचा विचार केला असतात तर , दुर्योधनास साथ दिली नसती तर हे युद्धाच झाले नसते .
कर्ण - तू योग्य बोलत आहेस वासुदेव . ह्या समाजाला जेवढी हानी अधर्मी लोकांपासून होते त्याच्या पेक्षा जास्त हानी धर्म जाणणाऱ्या निष्क्रिय लोकांपासून होते . या महायुद्धाचे पाप आमच्या डोक्यावर आहे .
श्रीकृष्ण - अजूनही वेळ आहे राधेय , स्वताची दुखे विसर , धर्माची बाजू घे , आणि आपल्या मृत्यूचा स्वीकार कर, यातच समाजाचे आणि तुझे कल्याण आहे राधेय .
कर्ण - मी तुझा आदेश स्वीकारतो वासुदेव , मृत्यूला मी स्वीकारतो . माझी माता कुंतीला सांग , झालंच तर मला क्षमा कर . पांचाली ला सांग तुझ्या अपमानाला कारणीभूत व्यक्ती , शूर होती . वासुदेव तिला माझ्या शोर्याची कल्पना कधीच होणार नाही का ? .
श्रीकृष्ण - राधेय , ज्या वेळी तुझ्या हातात तुझे धनुष्य नाही . तुझ्या रथाचे चाक जमिनीत रुतले आहे आणि तुला तुझी विद्या आठवत नाहीये . अशा वेळेचा फायदा घेवून तुझा वध करायला लागतो आहे , हेच तुझ्या सामर्थ्याचे प्रमाण नाही का ?

Sunday, 21 February 2016

'वाटर थेरपी'

...अनेक आजारांवर रामबाण 'वाटर थेरपी'...
 'वाटर थेरपी; म्हणजेच जलउपचार पद्धत, यात आतड्यांचं शुद्धीकरण केलं जातं, हा उपचार घरच्या घरी करता येतो, यासाठी याला शून्य खर्च येतो, जपानमध्ये 'वाटर थेरपी' प्रचंड लोकप्रिय झाली आहे.पोटाच्या आतड्याचं शुद्धीकरण करणारी थेरपीवाटर थेरपीमुळे चयापचाला वेग येतो, आतडे धुवून निघतात, लठ्ठपणा झटपट कमी होतो. त्वचा अधिक तेजस्वी दिसते, अनेक आजार आटोक्यात आणण्यास वाटर थेरपी फायदेशीर ठरते.ही थेरपी करण्यासाठी तुम्हाला काही साध्या-सोप्या गोष्टी करायच्या आहेत.जपानमध्ये वाटर थेरपी सुरू करतांना, मॉर्निंग वाक केल्यानंतर लगेच पाणी पितात, मॉर्निग वाक न करताही सकाळी उठल्यानंतर पाणी प्या, म्हणजेच जलउपचार पद्धतीला सुरूवात होते. काही वैद्यकीय चाचण्यांवरून जलोपचार म्हणजेच आतड्यांच्या शुद्धीकरणाला महत्वप्राप्त झालं आहे.दुर्धर, दुर्मिळ आजार, नवीन रोग नियंत्रणात आणण्याची क्षमता जलशुद्धीकरणात आहे. जपानीज मेडिकल सोसायटीला यात १०० टक्के यश आलं आहे.खालील आजारांवर वाटर थेरपी प्रभावीडोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, संधीवात, ह्दयाचे जलद ठोके, मिर्गी-अपस्मार, लठ्ठपणा, दमा, टीबी, मेंदुच्या बाहेरील दाह, किडनी, मुत्राशयाचे आजार, उलट्या, जठराची सूज, जुलाब, अपचन, मूळव्याथ, मधूमेह-डायबेटीस, बद्धकोष्ठता, डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार, कॅन्सर, मासिक पाळींचा आजार, कान-नाक आणि घशाचा आजार यावर जलशुद्धीकरण पद्धती प्रभावी ठरली आहे.
                               अशी सुरू करा 'वाटर थेरपी'
                       १) सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी कमीत कमी अर्धा लीटरच्या वर पाणी प्या. मात्र त्याचं प्रमाण एकावेळेस ६०० मिलीपेक्षा जास्त ठेऊ नका. हे प्रमाण पहिल्या दिवसापासून हळूहळू वाढवा, म्हणजे पहिल्या दिवशी एक ग्लास, तिसऱ्या दिवशी दोन ग्लास याप्रमाणे.. पाण्यात फ्लुओराईडचं प्रमाण नको, पाण्यात फ्लुओराईडचं नाही याची खात्री करा, म्हणजेच शुद्ध पाण्याचा वापर करा.
                       २) पाणी पिल्यानंतर ४५ मिनिटांनी ब्रश करा, तोंड धुवा. त्यानंतर मात्र आणखी ४५ मिनिटांचा अवकाश ठेवा.
                        ३) यानंतर ४५ मिनिटं झाल्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकतात.
                        ४) नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यानंतर लगेच पाणी पिऊ नका, प्रत्येक वेळी पाणी २ तासानंतर प्या. 
                        ५) हे दररोज करा, शून्य पैशात तुमची वाटर थेरपी ट्रीटमेंट सुरू झाली आहे असे समजा.
 सूचना - ज्यांचं वय जास्त आहे, किंवा जे नेहमी आजारी असतात, त्यांनी अर्धा लीटर पाणी ऐवजी, चार ग्लास पाणी पिणे चांगले असेल. 
                        6)जे इतर आजारांवर उपचार घेत असतील, त्यांनी ही थेरपी त्या दरम्यान केल्यास त्यांना फायदा होईल, मात्र त्यांनी एकदा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
                  पाहा खालील आजार नियंत्रणात आणण्यासाठी किती दिवस लागतील?१) उच्च रक्तदाब - ३० दिवस२) पोटाचे आजार (गॅस्ट्रिक) - १० दिवस३) डायबेटीस - ३० दिवस४) बद्धकोष्ठता (मलावरोध) - १० दिवस५) कॅन्सर - १८० दिवस (मोठा फरक दिसेल) ६) टीबी - ९० दिवस ७) संधिवातच्या रूग्णांनी ही ट्रिटमेंट पहिल्या आठवड्यात ३ दिवस, तिसऱ्या आठवड्यात ३ दिवस करावी, मात्र त्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. या उपचार पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. ही पद्धत तुम्ही रोज अंगीकारली तर तुमच्या आरोग्याला मोठा फायदा होईल.
 

                         लसूण, चिरतारूण्य, हृदयविकार आणि बरंच काही... मुंबई : लसूण आणि तारूण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकतं, पण लसूण आणि आरोग्याचा देखील मोठा संबंध आहे. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण लसणात अॅलिसिन नावाचं रसायन असते, लसूण अॅन्टिबायोटिकचेही काम करतो.लसणीमुळे कोलेस्टेरॉल कमी होतो, आणि तुम्ही रक्ताच्या गुठड्यांपासून दूर राहतात, यामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो. लसूण हा खरा तर हृदयरोग प्रतिबंधक आहे. लसूण रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलचा थर काढून टाकतो, रक्त पातळ करतो, गुठड्या काढून काढतो, लसणात सल्फरचे संयुग असते, हे संयुग कॅन्सरचा प्रभावी सामना करत असतं. एवढंच नाही शरीरातील पेशींना कॅन्सरशी लढण्यास चालना मिळते, ती लसणातील घटकांमुळे, तसेच आपोआप रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असते. लसणीमुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. यामुळेच शरीराला नवतारूण्य प्राप्त होते, सहनशक्ती वाढण्यासही मदत होते. रोज जेवतांना एक लसणीची पाकळी खाल्ली तर त्यांचा उत्तम परिणाम शरीरावर होतो, पण रोज दोन पाकळ्या खाणेही वाईट नाही.(संकलन)