Monday, 25 January 2016

आयकर विषयी विशेष माहिती

आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काही नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.
1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज  व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,
राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty  इत्यादी .
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात

आयकर इतर सवलती
1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची  करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना  30,000रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च आता 50,000 ऐवजी 75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी 1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वया पेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणे आवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.

अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो.

Monday, 18 January 2016

सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट ने राबवलेले ज्ञानरचनावादी उपक्रम

सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट ने राबवलेले ज्ञानरचनावादी उपक्रम
         ������������             

१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
१)धुळपाटीवर लेखन
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

वाचन म्हणजे फक्त अक्षरांचे उच्चार करणे नाही.
वाचन म्हणजे सांकेतिक चिन्हांच्या आधारे शब्दांचा उच्चार करुन शब्दात दडलेला अर्थ समजुन घेणे.म्हणजेच लिखित मजकुराचा अर्थ कळणे आहे.
वाचनपुर्वतयारी

१)नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे
२)डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.
३)बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात समजणे.
४)दृश्य शब्दसंग्रह

उपक्रम ��
१)मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्‍या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा.
मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल.

२)वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस
३)परिचयाच्या चित्रांचा वापर करुन पुढील खेळ घेणे.
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा.चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

४) दहा शब्द झाले की वाक्यवाचन सुरु करावे.हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे.नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.

��अक्षरपरिचय कसा शिकवावा?
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा क शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा.आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा.आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.

    अक्षरदृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेणे.
      ��स्वरचिन्हपरिचय��
पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्‍या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षरपरिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.
 
     ��वाक्यवाचन��
मुले शब्द तयार करु लागली की छैट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत.प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत.मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.

��जोडाक्षराचे वाचन��
एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.र चे चार प्रकार शिकवणे.
परिच्छेद आकलन
दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
प्रकटवाचन��
योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा.शिक्षकांमागोमाग एकएक वाक्य विद्यार्थी वाचतील.पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.
परिच्छेदवाचन शब्दडोंगर वाचन घेणे.अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.

  रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवत आहेत .
   मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे..( Sankalan )

Thursday, 14 January 2016

कृष्णमूर्तींनी मला अंतर्मुख केलं..

कृष्णमूर्तींनी मला अंतर्मुख केलं ते त्यांच्या शाळाविषयक एका धक्कादायक वाक्याने....शाळांविषयी ते म्हणतात, ‘‘शाळा आणि आणि तुरुंग या जगातील दोनच जागा अशा आहेत की जिथे कोणीच स्वत: होऊन जात नाही, तिथे दाखल करावे लागते...’’ हे वाक्य वाचून अक्षरश: आपण हादरून जातो. अरे, हे साधर्म्य आपल्या कसं लक्षात आलं नाही अशीच आपली भावना होते. खरंच शाळेत स्वत: होऊन कुणीच कसं जात नाही... जर पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांच्या इच्छेवर सोडलं... शाळेत येण्याचा आग्रह धरला नाही तर किती मुलं स्वत: होऊन शाळेत टिकतील.... कृष्णजींना तुरुंगाशीच थेट तुलना का करावीशी वाटली असेल...
कोणत्याही शाळेत एक अनुभव हमखास येतो... एरवी शांत असलेली शाळा जेव्हा सुटते तेव्हा प्रचंड गलका होतो आणि मुले आनंदाने ओरडू लागतात... त्यांच्या त्या उत्स्फूर्त गोंगाटाचे रहस्य काय... जेव्हा उद्या शाळेला सुटी आहे, असे शाळेत सांगितले जाते तेव्हाही टाळ्या वाजतात आणि आनंदाचे चित्कार उठतात... ही सारी लक्षणं हेच सांगतात की, शाळेत मुलांना आम्ही डांबून ठेवतो आहोत... आणि रोज शाळा सुटताना ते मुक्तीचा आनंद साजरा करतात. शाळा सुटताना त्यांचा तो गोंगाट काही काळ का होईना त्या सक्तीविरुद्धचे बंड असते. त्यातही मुलं काही ना काही कारण काढून शाळेपासून सुटका करून घेतात ती वेगळीच... एक विदेशी विदुषी म्हणते, ‘‘युद्धात जसा एखादा कुशल सेनापती शत्रूच्या तलवारीचे वार चुकवतो तशी मी बालपणी शाळा चुकवत होते’’ .... किती प्रांजळ आणि प्रातिनिधिक वर्णन आहे हे. मुळात शाळा मुलांना इतक्या नकोशा का वाटत असतील... मुलांना बागेत जायची जितकी ओढ वाटते तितकी ओढ शाळेची का वाटत नसावी? आपले बालपणीचे दिवस जिवंत केले तर वेगळे काय आठवते... स्वत: कृष्णमूर्तींच्या शाळेचे दिवस फारसे आनंददायक नव्हते. ते शिक्षकांचे फारसे प्रिय नव्हते... ते अबोल होते. अनेकदा ते घरात जुनी घड्याळे उचकत आणि पुन्हा जोडण्यात रमत. त्यात ब-याचदा त्यांची शाळाही चुकत असे किंवा तेच चुकवत असत. टागोरांचे बालपण असेच आहे. तिसरीत टागोर शाळा सोडतात.
अण्णाभाऊ साठे हे केवळ 3 दिवस शाळेत जातात आणि शिक्षकांनी मारल्याने शाळा सोडतात... पुढे साहित्यसम्राट होतात... अशा नापास मुलांनीच इतिहास घडवल्याची शेकडो उदाहरणे आहेत... याचा अर्थच असा की, शाळा या प्रतिभा फुलवण्याचे काम अपवादानेच करतात. टागोर जर आमच्या महाविद्यालयापर्यंत शिकले असते तर त्यांची प्रतिभा अशीच फुलली असती का.... असा विचार करून बघावा लागेल....
या प्रकाशात कृष्णमूर्ती म्हणतात ते पटते. आमच्या शाळा मुलांना आकर्षित करत नाहीत. त्या बालककेंद्री नाहीत. तिथली शिस्त ही आमच्या तुरुंगाची आठवण करून देते. या शिस्तीने मारहाणीने हजारो मुलांची शिक्षणातून गळती झाली आहे.

मोठ्या माणसांच्या अहंकार सुखावण्याची केंद्र म्हणजे शाळा झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही... ती मोठ्यांची गरज आहे, मुलांची नाही. औरंगजेबाने त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकले. नंतर त्यालाच बापाची दया आली. त्याने बापाला निरोप पाठवला की, तुला काय हवंय... बाप म्हणाला, ‘‘रोज काही मुलं पाठवत जा. त्यांची शाळा भरवेन. त्यांना कुराण शिकवीन...
रजनीशांचं यावरचं भाष्य फार सुंदर आहे. ते म्हणतात की, तुरुंगात गेला तरी त्याला राजाच व्हायचं होतं. त्याला रोज मुलांचा दरबार भरवून राजेपणाचा गेलेला आनंद मिळवायचा होता. हुकूमत गाजवायची होती... या मोठ्या माणसांना आपल्या अहंकार सुखावण्यासाठी, हुकूमत गाजवण्याची शाळा ही हक्काची जागा वाटते आहे का. याचे हो किंवा नाही उत्तर न देता स्वत:ची पडताळणी करायला हवी. हे पालकांच्या बाबतीतही तितकेच खरे आहे. आमची मुले ही आमच्या अहंकारविस्ताराची, अहंकार गाजवायची ठिकाणे आहेत का हे तपासायला हवे. अशामुळे शाळांइतकीच घरंही मुलांसाठी तुरुंग बनले आहेत. स्वत:च्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन आम्हाला निरपेक्ष प्रेम करावे लागेल. प्रेम हीच घराची आणि शाळेची भाषा बनवावी लागेल. तेव्हाच शाळा आणि तुरुंगातील साहचर्य संपेल. कृष्णमूर्तींना एका वाक्यात इतकं सारं म्हणायचंय...( संकलन )

Friday, 8 January 2016

छत्रपती शिवाजी राजे भोसले.

छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी- १. सई बाई (निंबाळकर) २. सोयराबाई (मोहिते) ३. पुतळाबाई (पालकर) ४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव) ६. सगुणाबाई (शिर्के) ७. गुनवातीबाई (ईन्गले) ८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,
आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:
अहमदनगर जिल्हा 1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला 2. पेडगावचा बहादूरगड 3. रतनगड
औरंगाबाद जिल्हा 1. देवगिरी-दौलताबाद.  
कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा) 1. अवचितगड 2. उंदेरी 3. कर्नाळा 4. कुलाबा 5. कोथळीगड (पेठचा किल्ला) 6. कोरलई 7. कौला किल्ला॑ 8. खांदेरी 9. घोसाळगड 10. चंदेरी 11. तळेगड 12. तुंगी 13. धक 14. पेब 15. प्रबळगड 16. बिरवाडी 17. भिवगड 18. मंगळगड-कांगोरी 19. मलंगगड 20. माणिकगड 21. मानगड॑ 22. रतनगड 23. रायगड 24. लिंगाणा 25. विशाळगड 26. विश्रामगड 27. सांकशी 28. सागरगड 29. सुरगड 30. सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा 1. पन्हाळा 2. पावनगड 3. बावडा 4. भूधरगड 5. रांगणा 6. सामानगड
गोंदिया जिल्हा 1. गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर जिल्हा 1. किल्ले चंद्रपूर 2. बल्लारशा
जळगाव जिल्हा 1. अंमळनेरचा किल्ला 2. कन्हेरगड 3. पारोळयाचा किल्ला 4. बहादरपूर किल्ला
ठाणे जिल्हा 1. अर्नाळा 2. अशीरगड 3. असावगड 4. अलिबाग 5. इंद्रगड 6. उंबरगांव 7. कल्याणचा किल्ला 8. कामनदुर्ग 9. काळदुर्ग 10. केळवे-माहीम 11. कोंजकिल्ला 12.गंभीरगड 13. गुमतारा 14. गोरखगड 15. जीवधन 16. टकमक 17. ठाणे किल्ला 18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला 20. तारापूर 21. धारावी 22. दातिवरे 23. दिंडू 24. नळदुर्ग 25. पारसिक 26. बल्लाळगड 27. बळवंतगड 28. बेलापूर 29. भवनगड 30. भैरवगड 31. भोपटगड 32. मानोर 33. माहुली 34. व्ररसोवा 35. वसईचा किल्ला 36. शिरगांवचा किल्ला
37. संजान 38. सिद्धगड 39. सेगवाह

नागपूर जिल्हा 1. आमनेरचा किल्ला 2. उमरेडचा किल्ला 3. गोंड राजाचा किल्ला 4. नगरधन(रामटेक)(भुईकोट  किल्ला) 5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा 1. अंकाई 2. अचलगड 3. अंजनेरी  4. अलंग  5. अहिवंत 6. इंद्राई 7. कंक्राळा 8. कंचना 9. कन्हेरा 10. कर्हेगड 11. कावनई
12. कुलंग 13. कोळधेर 14. गाळणा 15. घारगड 16. चांदोर 17. जवळ्या 18. टंकाई 19. त्रिंगलवाडी 20. त्रिंबक 21. धैर 22. धोडप 23. पट्टा
24. बहुळा 25. ब्रह्मगिरी 26. भास्करगड 27. मार्किंडा 28. मुल्हेर 29. रवळ्या 30. राजधेर 31. रामसेज 32. वाघेरा 33. वितानगड 34. हर्षगड 35. हातगड

पुणे जिल्हा 1. कुवारी 2. चाकण 3.चावंड 4. जीवधन 5. तिकोना 6. तुंग 7. नारायणगड 8. पुरंदर 9. प्रचंडगड (तोरणा) 10. मल्हारगड 11. राजगड 12. राजमाची 13. विचित्रगड 14. विसापूर 15. लोहगड 16. शिवनेरी 17. सिंहगड 18. हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे 1. अंजनवेल 2. आंबोळगड 3. आवर किल्ला 4. कनकदुर्ग 5. कुडाळचा किल्ला 6. कोट कामते 7. खारेपाटण 8. गोवळकोट 9. गोवा 10. जयगड 11. दुर्ग रत्नागिरी 12. देवगड 13. नांदोशी 14. निवती 15.पालगड 16. पूर्णगड 17. प्रचितगड 18. फत्तेगड 19. बाणकोट 20. बांदे 21. भगवंतगड 22. भरतगड 23.भवनगड 24. भैरवगड 25. मंडणगड 26.मनसंतोषगड 27. मनोहरगड
28. महादेवगड 29. महिपतगड 30. यशवंतगड 31. रसाळगड 32. राजापूरचा किल्ला 33. रायगड 34. विजयगड 35. विजयदुर्ग-घेरिय
36. वेताळगड 37. सर्जेकोट 38. साठवली 39. सावंतवाडीचा किल्ला 40. सिंधुदुर्ग 41. सुमारगड 42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा 1. तेरदाळ 2. दोदवाड 3. मंगळवेढे 4. शिरहट्टी 5. श्रीमंतगड 6. सांगली 7. येलवट्टी
सातारा जिल्हा 1. अजिंक्यतारा 2. कमालगड 3. कल्याणगड 4. केंजळगड 5. चंदन 6. जंगली जयगड 7. गुणवंतगड 8. प्रचितगड
9. प्रतापगड 10. पांडवगड 11. बहिरवगड 12. भूषणगड 13. भोपाळगड 14. मकरंदगड 15. मच्छिंद्रगड 16. महिमंडणगड
17. महिमानगड 18. सज्जनगड 19. संतोषगड 20. सदाशिवगड 21. सुंदरगड 22. वर्धनगड 23. वंदन 24. वसंतगड 25.वारुगड
26. वैराटगड

संकलन विनंती: पुढे पाठवा...

Sunday, 3 January 2016

----•● English उच्चारसाधर्म्य शब्द •●---

1) fair - यात्रा, गोरा,
fare - भाडे

2) week - आठवडा,
wick - बत्ती , काकडा ,
weak - अशक्त

3) cell - विजेरीचा सेल , पेशी , कोठडी
sell - विकणे
sail - तरंगत जाणे

4) celler - तळघर
seller -विक्रेता

5) once - एकदा
one's - एखाद्याचा

6) sit - बसणे
seat - आसन

7) wet - ओला
weight - वजन
wait - वाट पाहणे

8) test - चाचणी
taste - चव

9) roe - मृगी , हरिणी ( मादी)
row - रांग , ओळ।, वल्हवणे
raw - कच्चा

10) feet - पाऊले
fit - योग्य
feat - पराक्रम , योग्यता

11) thrown - फेकलेला ( throw चे भूतकाळी रूप)
throne - सिंहासन

12)held - धरला (hold चे भूतकाळी रूप)
hailed - जयजयकार केला

13) career - व्यवसाय
carrier - वाहून नेणे

14) our - आमचा, आमची , आमचे
hour ( अवर) तास

15) bare - उघडा
bier - तिरडी, शव वाहून नेण्याची चौकट
bear - अस्वल , सहन करणे

16) road - रस्ता
rod - गज, दांडा
rode- आरुढ झाला ( ride चा भूतकाळ)

17)meat - मटण
meet - भेटणे

18)leave - सोडणे
live - राहणे

19)piece - तुकडा
peace - शांतता

20)hail - गारा, अभिवादन
hale - तगडा, स्वस्थ
hell - नरक

21) principle - तत्त्व
principal - प्राचार्य

22) manager - व्यवस्थापक
manger - गव्हाण , गोठा

23) letter - पत्र, अक्षर
later - नंतर

24) dip -बुडविणे, बुडणे
deep - खोल

25) quite - अगदी, जोरदार
quiet - शांत
quiot - लोखंडी कडी

26) deed - कृत्य
did - केले

27) expect - अपेक्षा करणे
aspect - पैलू, स्वरूप

28) feel - वाटणे, स्पर्श करणे
fill - भरणे

29) floor - जमीन
flour- पीठ
flower - फूल

30)waste - रद्दी, वाया गेलेले
waist - कमर , कंबर
west - पश्चिम
vest - बनियन

31) fell - पडणे
fail - नापास

32) story - गोष्ट
storey- मजला

33) slip - घसरणे
sleep - झोपणे

34)in - आत, मध्ये
inn - खानावळ
yean - शेळी ,मेंढीने पिल्लूला जन्म देणे

35) whole - संपूर्ण
hole - छिद्र
vole - उंदराच्या जातीचा प्राणी

36)hit - टोला मारणे
heat - उष्णता

37) of - चा, ची चे
off - बंद करणे

38) self - स्वत:चा
shelf - मांडणी , फडताळ

39) sheep - मेंढी
ship - जहाज
sheaf - गवताची पेंढी

40) beat - मारणे , पराभूत होणे
bit - चावला ( bite चे भूतकाळी रूप)
beet - चुकंदर
a bit - थोडेसे

41) wander - भटकणे
wonder - आश्चर्य

42) rich - श्रीमंत
reach - पोहचणे

43) deed - कृत्य
did - केले

44) so - म्हणून, इतका, तर,
sow - पेरणे
saw - पाहिला, करवत

45) rain - पाऊस
reign - शासन , राज्य
rein - लगाम
wren - रेन पक्षी ( युरोप)

46) lives - राहतो
leaves - पाने, सोडून जातो

47) liver - यकृत
lever - तरफ

48) tent - तंबू
taint - कलंक , दोष

49) wedge - पाचर,
wage -पगार, वेतन, खंड

50 ) neat - व्यवस्थित
nit - लीख
knit - विणणे

51) list - यादी
least - कमीत कमी, किमान

52) horde - भटकी जमात
hoard - साठा करणे ,

53) jealous - मत्सरी
zealous - उत्साही

54) metal - धातू , रूळ
mettle - धैर्य, शक्ती , स्फूर्ती

55) to - च्याकडे , च्यापर्यंत, च्या तुलनेने
too - सुद्धा
two- दोन

56) lip - ओठ
leap - उडी मारणे

57) sun - सूर्य
son - पुत्र, मुलगा

58) pray - प्रार्थना
prey - भक्ष्य

59) dear - आदरणीय, प्रिय
deer - हरिण

60) root - मूळ
route - मार्ग

61)full - पूर्ण भरलेला
fool - मूर्ख

62) sum - रक्कम , बेरीज
some - काही , थोडे

63) lesson - धडा , पाठ
lessen - कमी करणे

64) night - रात्र
knight - सरदार

65) sin - पाप
seen - पाहीले
scene - दृश्य, देखावा

66) gate - फाटक
get - मिळणे, मिळवणे
gait - चाल ( चालण्याची पद्धत)

67) male - पुरूष
mail - टपाल, कवच

68) higher - अधिक उंच
hire - हप्ता , भाड्याने घेणे

69) let - परवानगी देणे
late - उशीर

70) tell - सांगणे
tale - गोष्ट
tail - शेपूट

71) new - नवा
knew - माहीत होते (know चे भूतकाळी रूप)

72) bore - छिद्र करणे
boar - रानडुक्कर

73) vice - दुर्गुण, पकड, उप, दोष
voice - आवाज , प्रयोग

74) thirst - तहान
thrust - खुपसणे

75) steel - पोलाद
steal - चोरणे
still - अद्यापपर्यंत,स्थिर , शांत , स्तब्ध

76) addition - वाढ, बेरीज
edition - आवृत्ती, प्रकाशित पुस्तकाचे स्वरूप

77) chick - पक्ष्याचे पिल्लू
cheek - गाल

78) it - तो, ती ते
eat - खाणे

79) stationery - लेखन साहित्य
stationary - स्थिर , न हलणारा

80) tick - चूक की बरोबर त्याची खूण ( Mark) करणे, कुत्रा व मेंढी यांच्या रक्तावर पोसणारा गोचिडीसारखा कीटक,
घडयाळाचा टक्‌ टक्‌ असा आवाज, टक्‌ टक्‌ असा आवाज करणे, गादी, लोड, उशी इ.ची खोळ, आर्थिक पत
teak - सागवाणी लाकूड, साग
tic - स्नायू आखडणे

81) forth - पुढे, बाहेर
fourth - चौथा

82) ear - कान , धान्याचे कणीस
year - वर्ष

83) air - हवा
heir (एअर) - वारस, उत्तराधिकारी

84) yes - होय
ace - पत्त्यातील एक्का, अतिशय कुशल, तरबेज, निष्णात

85) red - लाल
read - वाचले ( read चे भूतकाळी रूप)
raid - अचानक केलेला हल्ला

86) abate - ( वारा, पूर, दु:ख) कमी होणे , शेवट करणे
abet - वाईट कृत्यास साथ देणे, गुन्ह्याला प्रोत्साहन देणे

87) ball - चेंडू
bawl - मोठ्याने असभ्यपणे ओरडणे

88) team - संघ
teem - मुसळधार पाऊस कोसळणे

89) check - तपासणे, ताबा, अडथळा
cheque - धनादेश, चेक

90) pen - लेखणी , खुराडे
pain - दु:ख, वेदना
pane - काचेचे तावदान

91) not - नाही
knot - गाठ

92) naughty - खोडकर
knotty - अवघड, गहन

93) miner - खाणकामगार
minor - अल्पवयीन, कमी महत्त्वाचा

94) vacation - सुट्टी
vocation - व्यवसाय

95) plane - विमान, रंधा, विमानाचे पंख
plain - मैदान, सपाट पृष्ठभाग

96) date - तारीख , खजूर
debt - (डेट) - कर्ज,ॠण

97) wine - दारू, मद्य
vine - द्राक्षांचे वेल

98) site - खुली जागा, स्थळ
sight - दृष्टी

99)mill - चक्की, गिरणी
meal - दिवसभरातील कोणत्याही वेळचे जेवण

100 ) well - विहीर
wail - आक्रोश
wale - चाबकाचा, छडीचा वळ

101)bridal - ब्राईडल - विवाहानिमित्त  दिलेली  मेजवाणी, विवाहोत्सव
   bridle - ब्राईडल - घोड्याचा  लगाम

102) price - प्राईस - किंमत
     prize - प्राईझ - बक्षिस

103) toe - टो - पायाचे बोट, बुटाच्या  टोकाचा  भाग
    tow - टो - साखळीने  ओढणे

104)rest - रेस्ट - आराम
   wrest - रेस्ट - बळकावणे, हिसकावणे

105)men - मेन - माणसे 
   main - मेन - मुख्य 
   mane - मेन - आयाळ, मानेवरील  केस

106) desert - वाळवंट, ओसाड  प्रदेश
    dessert - जेवणानंतरचा  फलाहार, मिष्टान्न

107) counsel - उपदेश, सल्ला
     council - परिषद, सभा, सल्लागार मंडळ

108) course - दिशा, मार्ग, ओघ,अभ्यासक्रम, मालिका
    coarse - जाडेभरडे

109) duel - द्वंद्वयुद्ध
    dual - दुहेरी, संयुक्त

110) bell - बेल, घंटा
    belle  - सुंदर तरूणी
    bale - गठ्ठा
    bail - जामीन, क्रिकेट खेळातील  स्टंपवरील  बेल

111) grin - दात  काढून  हसणे, दात  विचकणे
  green - हिरवा

112) shed - छप्पर
     shade - सावली, छाया

113) illegible - वाचण्यास  अवघड
    eligible - पात्र, लायक

114) canon - चर्चने केलेला  कायदा
    cannon - तोफ (जुन्या  प्रकारची), विमानावरील तोफ, तोफेचा मारा करणे

115) corps - लष्करी  तुकडी
     corpse - प्रेत

116) hart - हार्ट - हरण( नर)
    heart - हार्ट - हृदय
    hurt - हर्ट - मानसिक किंवा शारीरिक दु:ख, जखम , इजा

117) personal - पर्सनल - व्यक्तीगत, खाजगी
    personnel - पर्सनेल - कार्यालय किंवा  कारखान्यातील  कर्मचारी वर्ग

118) fever -  फिव्हर - ताप, ज्वर
    favour - फेव्हर - अनुग्रह, आवडता, सद्भाव

119) difference - डिफरन्स - अंतर, फरक, भिन्नता, भेद
    deference - डेफरन्स - आदर, मानमर्यादा,सन्मान

120)physic - फिझिक - औषध
   physique - फिझीक - शरीराची ठेवण, शारीरिक बांधणी

121)umpire - अम्पायर - पंच
    empire - एम्पायर - साम्राज्य

122) veracious - व्हरेशस - सत्यवचनी
    voracious - व्होरेशस - खादाड, खूप आधाशी

123) am - आहे
    yam - रताळे
124) don - सभ्य  गृहस्थ
    dawn - पहाट

125) role - रोल - भूमिका
    roll  - रोल - गुंडाळणे

126) pip - पिप - संत्री मौसंबी  सफरचंदची बी, पत्त्यावरील बदाम, किलवर इ.ची  ठिपका, फाशांवरील  ठिपका
  peep - पीप - डोकावून  पाहणे

127) nice - नाईस - छान
    niece - नीस - भाची , पुतणी

128) fur - फर - लोकर, मांजर ससा इ.प्राण्यांच्या अंगावरील  केस
    fir - फर - देवदार  वृक्ष

129) hill - हिल - टेकडी
    heel - हील -  टाच
    heal - हील - जखम  भरून  आणणे, रोगमुक्त करणे

130) be - बी  - असणे , होणे, घडणे
    bee - बी - मधमाशी

131) eight - एट - आठ
    ate - एट- खाल्ले ( eat चे  भूतकाळी रूप)
    yet - येट - अद्यापपर्यंत

132) each - ईच - प्रत्येक
     itch - इच - खाज, खरूज
     etch - एच - कोरणे

133) fist - फिस्ट - मूठ
    feast - फीस्ट - मेजवाणी

134) pull - पुल - ओढणे, खेचणे
    pool - पूल - लहान तलाव, डबके, डोह

135) sick - सिक - आजारी
     seek - सीक - शोधणे, सापडविणे
  

136) which - विच - कोणता?  कोणती?  कोणते?
    witch - विच - चेटकीण, जादुगारीण

137) met - मेट - भेटला
     mate - मेट - मित्र, सोबती, मात  करणे

138) dim - डिम - अंधुक,अस्पष्ट, निस्तेज
    deem - डीम - नेमून देणे, मानने, समजणे

139) skim - स्किम - मलम  लावणे, द्रवाच्या पृष्ठभागावरून वरच्यावर वर  काढून  घेणे.
  scheme - स्कीम - युक्ती, योजना, पद्धतशीर रचना

140) lid - लिड -झाकण, झाकणे, डोळ्याची  पापणी
    lead - लीड - आघाडी, नेतृत्व करणे
    lead - लेड - शिसे 

141) ege - एज - वय
    edge - एज - काठ , किनारा, कडा, धार, तीक्ष्ण बाजू

142)  gem - जेम  - रत्न
     game - गेम  - खेळ

143) tins - टिन्स - कथीलने कल्हई केलेले  पत्र्याचे  डबे 
   teens - टीन्स - १३ ते १९ हे  अंक, १३ ते १९ दरम्यानच्या  वयाचा

144) soul - सोल - आत्मा, जीव, चैतन्य, तत्त्व
    sole - सोल - पाऊल, पायमोजा व  बूट यांचा  तळवा, एकुलता एक
    sol - सोल - सूर्य (ग्रीक नाव) (काव्यप्रकारात  वापर)

145) rote - रोट - घोकंपट्टी करणे, पाठ करणे
    rota - रोट - पाळीपाळीने करावयाच्या  कामाची  यादी 
   wrote - रोट - लिहिले  (write चे  भूतकाळ)
=======================